नंदुरबार (जिमाका वृत्तसेवा) : नंदुरबार जिल्ह्यातील विधानसभा मतदारसंघातील नव्याने नाव नोंदणी केलेल्या मतदारांनी ई-एपीक अर्थात इलेक्ट्रॉनिक ओळखपत्र सुविधेचा  लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी डॉ.राजेंद्र भारुड यांनी केले आहे.

भारत निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार 1 जानेवारी 2021 या पुनरिक्षण कार्यक्रमांतर्गत मोहिमेत नाव नोंदविलेल्या मतदारांना ई-एपीक डाऊनलोड ही सुविधा उपलब्ध करुन देण्यात आली  आहे.