नंदुरबार (जिमाका वृत्तसेवा) : जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी एकात्मिक फलोत्पादन विकास अभियानांतर्गत  वैयक्तिक शेततळे अस्तरीकरण ही योजना पाण्याचा साठा निर्माण करणे व साठविलेले पाणी झिरपून वाया जाऊ नये तसेच पाणीटंचाईच्या काळात फळबागा जगविण्यासाठी साठविलेल्या पाण्याचा उपयोग व्हावा या उद्देशाने 50 टक्के अनुदानावर ही योजना राबविण्यात येत असून ज्या शेतकऱ्यांनी स्वखर्चाने अथवा विविध शासकीय योजनेतून शेततळे खोदकाम केले आहे अशा पात्र शेतकऱ्यांनी  लाभ घेण्यासाठी  https://mahadbtmahait.gov.in  या संकेतस्थळावर ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावे. अधिक माहितीसाठी मंडळ कृषी अधिकारी व तालुका कृषी अधिकारी कार्यालयाशी संपर्क साधावा, असे आवाहन जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी निलेश भागेश्वर यांनी केले आहे.