Author: Ramchandra Bari

टंचाईची परिस्थिती निर्माण झाल्यास पेयजलास सर्वोच्च प्राधान्य; टंचाईवर मात करण्यासाठी प्रत्येक यंत्रणेने सुक्ष्म नियोजन करावे -पालकमंत्री डॉ. विजयकुमार गावित

नंदुरबार (जिमाका वृत्त) गतवर्षीच्या तुलनेत आजपर्यंत जिल्ह्यात झालेल्या पावसाची टक्केवारी कमी असून टंचाईची परिस्थिती निर्माण झाल्यास पेयजलास सर्वेाच्च प्राधान्य देण्यात यावे, तसेच टंचाईवर मात करण्यासाठी प्रत्येक यंत्रणेने सुक्ष्म नियोजन करण्याच्या सूचना आज राज्याचे आदिवासी विकास मंत्री तथा पालकमंत्री डॉ. विजयकुमार गावित यांनी दिल्या आहेत. ते आज जिल्हाधिकारी कार्यालयात टंचाई संदर्भात आयोजित आढावा बैठकीत बोलत होते. यावेळी जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा डॉ. सुप्रिया गावित, जिल्हाधिकारी मनीषा खत्री, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी एम. सावनकुमार अप्पर जिल्हाधिकारी धनंजय गोगटे, निवासी उपजिल्हाधिकारी सुधीर खांदे,सहाय्यक जिल्हाधिकारी मंदार पत्की, जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी राकेश वाणी, तसेच सर्व तालक्यांचे तहसीलदार, गटविकास अधिकारी, नगरपरिषदांचे मुख्याधिकारी तसेच सर्व...

Read More

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

error: Content is protected !!