Author: Ramchandra Bari

नंदुरबार जिल्ह्यातील सर्व टपाल कार्यालयात तिरंगा ध्वज नागरिकांना खरेदी करता येणार

नंदुरबार ( जिमाका वृत्त) : नंदुरबार जिल्ह्यातील सर्व टपाल कार्यालयात तिरंगा ध्वज विक्रीसाठी उपलब्ध असून तो नागरिकांना खरेदी करता येणार असल्याचे धुळ्याच्या डाक विभागाचे प्रवर अधिक्षक यांनी प्रसिद्धी  पत्रकान्वये कळविले आहे. ज्या नागरिकांना तिरंगा ध्वज हवा असेल त्यांना आपल्या नजिकच्या टपाल कार्यालयातून घेता येणार आहे. तसेच ज्या संस्था, शाळा, महाविद्यालये, शासकीय कार्यालयांना जास्त संख्येने तिरंगा ध्वज हवे असल्यास त्यांनी आपली मागणी नजिकच्या टपाल कार्यालयात नोंदवावी जेणेकरुन तिरंगा ध्वज सहज मिळू शकतील, या  सेवेचा जिल्ह्यातील नागरिकांनी लाभ घ्यावा असेही आवाहन  प्रवर अधिक्षक, डाकघर, धुळे विभाग धुळे यांनी प्रसिद्धी पत्रकान्वये केले...

Read More

युवकांमधील नाविन्यपूर्ण कौशल्यांसह स्टार्टअपला पाठबळ देण्यासाठी महाराष्ट्र स्टुडंट इनोव्हेशन चॅलेंज चे आयोजन; जिल्ह्यातील संस्थांनी १५ तर युवकांनी ३१ ऑगस्टपर्यंत ऑनलाईन सहभाग नोंदवावा -विजय रिसे

नंदुरबार ( जिमाका वृत्त) : महाराष्ट्र राज्य नविन्यता परिषदेमार्फत राज्यातील महाविद्यालयीन विद्यार्थ्यांच्या नवकल्पनांना मुर्त स्वरुप देण्यासाठी विभागामार्फत “महाराष्ट्र स्टुडंट इनोव्हेशन चॅलेंज” चे आयोजन करण्यात आले आहे. यात सहभागासाठी संस्थांनी १५ ऑगस्ट व युवकांनी त्यांच्या संबंधीत संस्थेमार्फत ३१ ऑगस्ट २०२३ पर्यंत ऑनलाईन अर्ज करावेत, असे आवाहन कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता चे सहायक आयुक्त विजय रिसे यांनी शासकीय प्रसिद्धी पत्रकान्वये केले आहे.  यात सहभागी होण्याकरीता www.msins.in अथवा www.schemes.msins.in या संकेतस्थळाला भेट देवून नोंदणी करता येणार आहे. महाराष्ट्र स्टुडंट इनोव्हेशन चॅलेंज हा तरुण उद्योजकांचा शोध घेवून त्यांची स्टार्टअपची स्वप्ने साकारण्यासाठी संभाव्य पाठबळ देण्याचा एक उपक्रम आहे. महाराष्ट्रातील कोणत्याही शैक्षणिक संस्था व विद्यार्थी या इनोव्हेशन चॅलेंजकरीता अर्ज करण्यास पात्र आहेत.  केंद्र शासनाच्या निर्देशानुसार राज्यात महाराष्ट्र राज्य नाविन्यता परिषदेची स्थापना करण्यांत आली आहे. महाराष्ट्र राज्यात नाविन्यता परिषदेमार्फत सतत नवनवीन उपक्रम राबविण्यात येत असतात. देशातील युवकांमधील सृजनशिलता विकसीत करुन त्यांच्यातील प्रतिभेच्या माध्यमातुन नवनिर्मिती करणे. त्याकरीता पोषक वातावरण तयार करणे, नवनवीन कार्यपद्धती, निर्मिती पध्दती, वितरण प्रणाली या बाबींच्या अंतर्भवासह गमिमान व संवेनदशील पद्धतीने व्यवस्थापन, शासन व्यवस्था निर्माण करणे व त्या माध्यमातुन सर्वसामान्य माणसाचे जीवन सुकर करणे हा या परिषदेचा मुख्य उद्देश आहे. जिल्ह्यातील सर्व महाविद्यालये तसेच महाविद्यालयांतील जास्तीत जास्त विद्याथ्यांनी या चॅलेंज मध्ये सहभाग घ्यावा, असे आवाहनही कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता चे सहायक आयुक्त श्री. रिसे यांनी शासकीय प्रसिद्धी पत्रकान्वये केले...

Read More

महसूल सप्ताहाच्या औचित्याने जिल्हाधिकारी यांच्या हस्ते अनाथ बालकांना प्रमाणपत्राचे वितरण

नंदुरबार (जिमाका वृत्त) : महसुल विभागामार्फत 1 ते 7 ऑगस्ट या कालावधीत महसूल सप्ताह राबविण्यात येत असून या सप्ताहाच्या औचित्याने जिल्ह्यातील दोन्ही पालक गमावलेल्या 9 बालकांना जिल्हाधिकारी मनिषा खत्री यांच्या हस्ते जिल्हाधिकारी कार्यालयात अनाथ प्रमाणपत्र वितरीत करण्यात आले. यावेळी निवासी उपजिल्हाधिकारी सुधीर खांदे, जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी राजेंद्र बिरारी, परिविक्षा अधिकारी ( बाल विकास), सुनिल पवार चिटणीस अनिल गवांदे आदि उपस्थित...

Read More

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

error: Content is protected !!