Author: Ramchandra Bari

शहादा अहिर सुवर्णकार मंडळाची रौप्य महोत्सव व जीवन गौरव समारंभ संपन्न

शहादा (प्रतिनिधी) :- येथील अहिर सुवर्णकार मंडळाचा रौप्य महोत्सवी गुणगौरव समारंभ जन्मबंध चे संस्थापक अध्यक्ष श्री. प्रभाकर मोरे (मुंबई) यांच्या अध्यक्षतेखाली प्रतिमा पुजन व दिप प्रज्वलनाने प्रारंभ झाला. या प्रसंगी अहमदाबाद अ. सु. मंडळाचे ट्रस्टी चेअरमन व सुप्रसिद्ध उद्योजक श्री. संजय बागुल, श्री. प्रभाकर मोरे, अमळनेरचे विख्यात बिल्डर व शिक्षण संस्थाचालक श्री. रामदास निकुंभ, शहादा अहिर सुवर्णकार मंडळाचे अध्यक्ष प्रा. जीवन जगदाळे, सचिव श्री ज्ञानेश विसपुते यांना जीवन गौरव पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. मंडळाच्या नोंदणीस 25 वर्षे पुर्ण झाल्याने ‘सुवर्ण शलाका’ ही विशेष स्मरणिका प्रकाशित करण्यात आली. ह.भ.प. भालचंद्र दुसाणे (पिंपळनेर), उद्योजक श्री.शशिकांत विसपुते (अंकलेश्वर) , अ.सु.शहादा संस्थापक...

Read More

पोलीस अधिक्षकांची मनोज जैन यांचेकडे सदिच्छा भेट

नंदुरबार (प्रतिनिधी) :- जिल्हा पोलीस अधीक्षक श्री पी. आर. पाटील यांनी शहरातील एम एल टाऊन परिसरातील गणेश मंडळाला भेट देऊन श्री गणेशाची आरती केली. यावेळी जिल्हा पोलीस अधीक्षक श्री पी. आर. पाटील यांचे परिसरातील रहिवाश्यांनी शाल-श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. यावेळी त्यांनी प्रख्यात व्यापारी श्री मनोज जैन यांच्या निवासस्थानी भेट देऊन गणेशोत्सव बाबत व सुरक्षा व्यवस्थेबाबत चर्चा केली. यावेळी नगरसेवक मनीष बाफना यांनी एम.एल. टाऊन परिसरातील गणेशोत्सवा बाबत माहिती...

Read More

राज्यातील आदिवासी भागात शाळांचे शंभर टक्के डिजिटायझेशन करणार; दुर्गम भागातील माणूस उभा  करण्याची क्षमता शिक्षकांमध्ये – डॉ. विजयकुमार गावित

नंदुरबार (जिमाका वृत्तसेवा) – येत्या दोन वर्षात राज्यात आदिवासी भागातील सर्व शाळांचे डिजिटायझेशन करण्यात येणार असून अभावाने ग्रासलेल्या दुर्गम भागात शिक्षणाचा प्रभाव निर्माण करून या भागातील माणूस उभा करण्याची क्षमता फक्त शिक्षकात आहे, असे प्रतिपादन राज्याचे आदिवासी विकास मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ. विजयकुमार गावित यांनी केले आहे.  ते आज जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शिक्षण विभागाच्या वतीने आयोजित वर्ष 2022-23 च्या जिल्हा शिक्षक पुरस्कार वितरण संमारंभात बोलत होते. यावेळी जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा डॉ. सुप्रिया गावित, खासदार डॉ. हिना गावित, जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष सुहास नाईक, शिक्षण सभापती गणेश पराडके, महिला व बालकल्याण सभापती संगीता गावित, समाज कल्याण सभापती शंकर पाडवी, जिल्हा...

Read More

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

error: Content is protected !!