Author: Ramchandra Bari

कोरोना मदत निधीसाठी खापर ग्रामस्थांकडून 55 हजार

अक्कलकुवा (प्रतिनिधि) :- तालुक्यातील खापर ग्रामस्थांकडून मुख्यमंत्री सहायता निधि मध्ये ५५,५५५ रु मदत म्हणून देण्यात आले आहेत. जगभरासह देशात व राज्यात कोरोना विषाणूचा पादुर्भाव वाढला आहे. या विषाणुचा संसर्ग रोखण्यासाठी केंद्राबरोबरच राज्य शासनाद्वारे युद्धपातळीवर प्रयत्न केले जात आहेत. त्याअनुषंगाने अक्कलकुवा तालुक्यातील खापर येथील ग्रामस्थांना मुख्यमंत्री सहायता निधिसाठी सोशल मिडिया व्हाट्सएप्प व फेसबुकच्या माध्यमानतुन निधि संकलनासाठी माजी उपसरपंच ललित जाट व लक्ष्मण वाडिले यांनी आवाहन केले होते. यावेळी खापर गावातील सर्व पक्षीय, सर्व धर्मीय, जेष्ठ, युवक व महिलांनी सकारत्मक प्रतिसाद देत मोलाच्या हातभार लावला व आपल्या यथाशक्ति निधि संकलन करण्यात आली. ग्रामस्थान कडून एकूण ५७,९१५रु एवढी निधि जमा झाली होती. त्यातून ५५,५५५रु (पंचवान हजार पाचशे पंचवान रूपये) मुख्यमंत्री सहायता निधि मध्ये आरटीजीएस च्या माध्यमाने देण्यात आली. तसेच उर्वरित रक्कम २३६०रु खापर येथील विलगिकरण केंद्रातील लोकांच्या जेवणाच्या व्यवस्थेत मदत करण्यात आली आहे.ग्रामस्थांनी केलेल्या या निधी संकलनाबाबत निवासी नायब जिल्हाधिकारी धनंजय गोगटे यांच्या कड़े मुख्यमंत्री सहायता निधिची व दात्यांची संपूर्ण माहिती सोपवण्यात आली. यावेळी माजी उपसरपंच ललीत जाट, लक्ष्मण वाडिले, अक्षय सोनार आदि उपस्थित...

Read More

नंदुरबारकरांसाठी शुभवार्ता 21 संशयित व्यक्तींचे कोरोना अहवाल निगेटीव्ह

नंदुरबार – कोरोना चाचणीसाठी प्रयोगशाळेत पाठविण्यात आलेल्या 21 संशयित व्यक्तीचे अहवाल निगेटीव्ह आले आहेत. यापैकी 4 व्यक्ती कोरोनाग्रस्त रुग्णाच्या कुटुंबातील आहेत, या सर्व व्यक्तींवर जिल्हा शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत, अशी माहिती जिल्हाधिकारी डॉ.राजेंद्र भारुड यांनी दिल्याचे वृत्त संस्थांनी प्रसिद्धीस दिले आहे.नंदुरबार येथून एकूण 35 संशयित व्यतींच्या स्वॅबचे नमुने तपासणीसाठी प्रयोगशाळेकडे पाठविण्यात आले होते. त्यापैकी 21 निगेटीव्ह आले आहेत. निगेटीव्ह रुग्णापैकी जिल्ह्यातील वडफळी आणि अंबाबारी येथील 7 व्यक्ती असून, नंदुरबार शहरातील अलीसाहाब मोहल्ला भागातील इतर दोन व कोरोना बाधिताने तपासणी केलेल्या खाजगी रुग्णालयातील तीन व्यक्तींचा यात समावेश आहे. 14 संशयित व्यक्तींचे अहवाल प्रलंबित आहेत. संशयित रुग्णांना क्वॉरंटाईन करण्यात आले असून, त्यांची नियमित वैद्यकीय तपासणी होत आहे. कोरोनाग्रस्त रुग्णावर निर्धारीध पद्धतीनुसार उपचार सुरू असून त्याची प्रकृती स्थिर आहे. प्रशासनातर्फे शहरातील प्रभाग क्र.10 सील करण्यात आला असून, या भागात दिवसातून पाचवेळा फवारणी करण्यात आली आहे.कोरोनाचा संसर्ग पसरू नये यासाठी प्रशासनातर्फे आवश्यक खबरदारी घेण्यात येत असून, शहरातील सर्व व्यवहार तीन दिवसासाठी बंद ठेवण्यात आले आहेत. अत्यावश्यक सेवा नेहमीप्रमाणे सुरू आहेत. मात्र भाजीपाला, फळे विक्रीवर 20 तारखेपर्यंत बंदी राहणार आहे. 20 एप्रिलनंतर काही निर्बंध शिथिल होणार असले तरी कंटेंटमेंट झोनमधील कोणत्याही व्यक्तीला बाहेर जाण्याची अनुमती असणार नाही, असे जिल्हा प्रशासनातर्फे कळविण्यात आले असल्याचे वृत्त संस्थांनी म्हटले...

Read More

नंदुरबार शहरातील भाग क्र.10 परिसर प्रतिबंधीत क्षेत्र

नंदुरबार -‍  शहरातील भाग क्र.10 येथील एका व्यक्तीला कोरोनाचा संसर्ग झाल्याचा अहवाल प्राप्त झाल्याने जिल्हाधिकारी डॉ.राजेंद्र भारुड यांनी भाग क्र. 10 मधील हाट दरवाजा, गुजर गल्ली, कुंभारवाडा, दवे इंजिनिअर परिसर येथून बालाजी वाडा परिसर, मण्यार मोहल्ला, खिलाफत चौक, सुतार मोहल्ला, घोडापीर मोहल्ला, इलाही चौक, बागुल राईस मिल परिसर, अलीसाहब मोहल्ला, कसाई मोहल्ला, करिम मंजील आणि दखणी गल्ली हे प्रतिबंधात्मक क्षेत्र म्हणून जाहीर केले आहे. या परिसराच्या उत्तरेकडील मेवालाल सेठ यांचे वखार पासून दक्षिणेस मुख्य रस्त्याचे जेपीएन हॉस्पीटल, जुने कोर्ट ते मंगळबाजार, मराठा व्यायामशाळा, सिद्धीविनायक चौक ते शिवाजी रोडपर्यंत भाग बफर झोन म्हणून जाहीर करण्यात आला आहे. त्यासोबत पुर्वेकडील बंधरहट्टी भिलाटी, गुरव गल्ली, योगेश्वरी माता मंदीर, स्वामी विवेकानंद हायस्कुल, धानोरा नाका, पाताळगंगा नदी पावेतो, रज्जाक पार्क, लहान माळीवाडा भिलाटी, दक्षिणेकडील रज्जाक पार्क, बिफ मार्केट, मेहतर वस्ती, गोंधळ गल्ली, भरवाड वस्ती, मरीमाता मंदीर, दालमिया, पटेल छात्रालय ते संत रोहिदास चौक ते हाट दरवाजा, तेथून पाण्याची टाकी, नुतन शाळा, मेवालाल सेठ यांची वखार आणि पश्चिमेकडील बंधरहट्टी भिलाटी, न.पा.शाळा, काळी मस्जीद, सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यालय, मटन मार्केट, जळका बाजार, दोषाह तकीया, दादा गणपतीपर्यंतचे क्षेत्रदेखील बफर झोन म्हणून जाहीर केले आहे. प्रतिबंधात्मक क्षेत्रात कोणालाही ये-जा करता येणार नाही. सर्व प्रकारच्या वाहनांना या क्षेत्रात प्रतिबंध असेल. अत्यावश्यक सेवा सुरळीत राहण्यास मुभा राहील. अशी सेवा पुरविणाऱ्यांची तपासणी करणे बंधनकारक राहील. अत्यावश्यक सेवेसाठी संबंधितांना सुरक्षा पास उपलब्ध करून देण्यात येतील. प्रतिबंधीत क्षेत्रात येण्याजाण्याच्या ठिकाणी उष्म चाचणी करणे आवश्यक राहील. आरोग्य सेवकांनी ये-जा करणाऱ्या सर्वांची छाननी करावी.प्रतिबंधात्मक क्षेत्रातून...

Read More

नंदुरबार शहरात अनावश्यक बाहेर पडल्यास कारवाई-जिल्हाधिकारी

नंदुरबार दि.18 – शहरातील वॉर्ड क्र.10 भागात कोरोना पॉझिटीव्ह रुग्ण आढळल्याने शहरात संचारबंदीचे कठोरतेने पालन करण्यात येणार असून नागरिकांनी घरातच रहावे. अनावश्यक बाहेर पडल्यास कडक कारवाई करण्यात येईल, असे जिल्हाधिकारी डॉ.राजेंद्र भारुड यांनी कळविले आहे.येत्या 20 एप्रिल मध्यरात्रीपर्यंत वैद्यकीय सुविधा व औषधाची दुकाने वगळता इतर सर्व आस्थापना बंद राहणार आहेत. रुग्णाच्या कुटुंबातील 6 सदस्यांचे स्वॅब घेण्यात आले असून त्यांना क्वॉरंटाईन करण्यात आले आहे. रुग्णाने ज्या खाजगी रुग्णालयात उपचार घेतले होते तेथील एक डॉक्टर आणि इतर पाच कम्रचारी व अन्य तीन जवळचे नातेवाईक अशा एकूण 15 व्यक्तींचे स्वॅब घेऊन त्यांना क्वॉरंटाईन करण्यात आले आहे. जिल्ह्याच्या सीमावर्ती भागातदेखील संचारबंदीचे कठोरतेने पालन करण्याच्या सुचना देण्यात आल्या आहेत. कोरोनाचा संसर्ग पसरू नये यासाठी प्रशासनातर्फे आवश्यक खबरदारी घेण्यात येत आहे. नागरिकांनी घराबाहेर पडू नये. स्वत:ची काळजी घ्यावी. मास्क वापरणे, हात नियमित धुणे, सॅनिटायझरचा वापर आदी उपाययोजनांवर भर द्यावा. खोकला, श्वास घेताना त्रास आणि ताप अशी लक्षणे आढळल्यास त्वरीत रुग्णालयात तपासणी करून घ्यावी. नागरिकांनी घाबरू नये व प्रशासनाच्या सुचनांचे पालन करावे, असे आवाहनही डॉ.भारुड यांनी केले...

Read More

प्रधानमंत्री गरीब कल्याण योजना महिलांना गावातच मिळणार रक्कम

नंदुरबार दि.18- प्रधानमंत्री गरीब कल्याण योजनेअंतर्गत महिलांच्या जनधन बचत खात्यात पुढील दोन महिने 500 रुपये अनुदान जमा होणार असून प्रत्येक महिन्यात जमा होणारी रक्कम त्यांना इंडिया पोस्ट पेमेंट्स बँक व बँक अधिकृत ग्राहक सेवा केंद्राद्वारे घरपोच मिळणार आहे.योजनेअंतर्गत जनधन बँक खातेधारक महिलांना एप्रिल महिन्याचे अनुदान वितरीत करण्यात आले असून मे आणि जून महिन्यातदेखील अनुदान वितरीत करण्यात येणार आहे. कोरोना संसर्ग प्रतिबंधात्मक उपाययोजनेचा भाग म्हणून बँकेतील गर्दी टाळणे आवश्यक असल्याने प्रशासनामार्फत सर्व इंडिया पोस्ट पेमेंट बँक आणि बँक अधिकृत ग्राहक सेवा केंद्राच्या माध्यमातून गावपातळीवर व शहरात वॉर्डनिहाय सेवा देण्यात येत आहे.जिल्ह्यात इंडिया पोस्ट पेमेंट्स बँकची 150 सेवा केंद्र आहेत. तसेच बँक अधिकृत ग्राहक सेवा केंद्रांची संख्या 172 आहे. या सर्वांची यादी तहसीलदार, गट विकास अधिकारी, मुख्याधिकारी यांचेकडे देण्यात येणार आहे. त्यानंतर गावातील व वॉर्डातील लोकप्रतिनिधी व कर्मचाऱ्यांशी चर्चा करून पैसे वाटपाचे वेळापत्रक ठरविण्यात येईल.ग्राहकांना जाहीर दवंडीद्वारे पैसे मिळण्याचा दिवस कळविण्यात येईल. कुठल्याही राष्ट्रीयकृत बँकेत आधार लिंक खाते असलेले सर्व ग्राहक या दोन्ही सेवांच्या माध्यमातून पैसे काढू शकतात. त्यासाठी ग्राहकांनी आपले आधार कार्ड आणि मोबाईल सोबत न्यावे. ग्राहकांना पैसे काढण्यासाठी बँकेत जाण्याची आवश्यकता नसल्याने त्यांचा वेळ व श्रम वाचणार आहे. धुळे-नंदुरबार पोस्टाचे वरीष्ठ अधीक्षक अनंत रसाळ यांच्या मार्गदर्शनाखाली पोस्ट पेमेंटचे काम होणार आहे. पैसे वाटप करताना एकावेळी 4 ते 5 ग्राहकांना परवानगी देण्यात येईल व सोशल डिस्टन्सिंगचे पालन करण्यात येईल. ग्राहक सेवा केंद्रात ग्राहकांना काऊंटरपासून 1 मीटर दूर उभे रहावे. ग्राहक सेवा केंद्रांना आपली यंत्रे वेळोवेळी स्वच्छ करण्याच्या आणि सॅनिटायझरची व्यवस्था...

Read More

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

error: Content is protected !!