Author: Ramchandra Bari

नंदुरबार शहरात कोरोनाचा रुग्ण आढळला तीन दिवस शहरातील सर्व व्यवहार बंद

नंदुरबार :- शहरातील 48 वर्षीय एक रुग्ण कोरोना पॉसिटीव्ह असल्याचा अहवाल नुकताच प्राप्त झाला आहे, अशी माहिती नंदुरबारचे जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भारुड यांनी दिली आहे. यामुळे आतापर्यंत एकही कोरोना रुग्ण नसलेल्या नंदुरबार जिल्ह्यालाही कोरोनयुक्त जिल्ह्याचे लेबल लागले आहे.याबाबत जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भारुड यांनी एक ध्वनिफीत जारी केली आहे. नंदुरबार शहरात कोरोनाचा पहिला रुग्ण आढळून आला असून, हा रुग्ण काही दिवसांपूर्वी मालेगाव येथे जाऊन आला होता. हा रुग्ण नंदुरबार शहरातील प्रभाग क्रमांक 10 च्या भागातील रहिवासी आहे. त्यामुळे सुरक्षिततेचा उपाय म्हणून अली साहेब मोहल्ला भागाचा एक किलोमीटर परिसर कंटेंटमेंट झोन म्हणून घोषित करण्यात आला असून, त्याच्या 1 ते 2 किलोमीटर परिसरात कोणत्याही वाहनास अनुमती नसेल, तसेच कोणतेही व्यवहार सुरू राहणार नाहीत. तीन दिवस शहरातील सर्व व्यवहार बंद ठेवण्याचे आदेश देण्यात आले आहेत. नागरिकांनी संचारबंदीचे कठोरपणे पालन करावे, तसेच घाबरून न जाता घरातच राहावे, प्रशासनाने दिलेल्या सूचनांचे पालन करावे, अनावश्यक बाहेर फिरताना आढळल्यास कठोर कारवाई करण्यात येईल, असेही जिल्हाधिकारी डॉ.राजेंद्र भारुड यांनी कळविले आहे. दरम्यान याप्रकरणी संबंधित रुग्णाच्या संपर्कात आलेल्या व्यक्तींचा शोध घेऊन त्यांना विलगिकरण कक्षात ठेवण्यासाठी कार्यवाही सुरू असल्याचे वृत्त...

Read More

जिल्ह्यात रोहयोची वर्षभर पुरतील एवढी कामे जिल्हा परिषद मु.का.अ. श्री विनय गौडा यांची माहिती

नंदुरबार( प्रतिनिधी :- जिल्ह्यातील मजुरांसाठी महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेअंतर्गत वर्षभर पुरतील एवढी कामे मंजूर असून, मजुरांनी गावातच रोजगार उपलब्ध करून घ्यावा व कोरोनाच्या पार्श्वभूमीवर या कामांवर जाताना सोशल डिस्टन्सिंगचे पालन करावे, असे आवाहन जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. विनय गौडा यांनी केले आहे.कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लॉक डाऊन असल्याने सर्वत्र रोजगाराची वाणवा आहे, अनेक स्थलांतरित मजूर आपापल्या गावात परतले आहेत, अश्या सर्व ग्रामिण कुटुंबांना रोजगार उपलब्ध व्हावा, यासाठीजिल्ह्यात उपलब्ध असलेल्या कामांबाबत माहिती देताना नंदुरबार जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी श्री विनय गौडा यांनी सांगितले की, ग्रामीण भागातील मजुरांना आपल्या गावातच काम मिळावे, यासाठी महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेतून जिल्हा परिषद अंतर्गत ग्राम पंचायत यंत्रणा त्याचप्रमाणे राज्य शासनाचा वनविभाग, सामाजिक वनीकरण विभाग, कृषी विभाग, लघुपाटबंधारे विभाग आणि सार्वजनिक बांधकाम विभाग यांच्यामार्फत विविध कामांच्या माध्यमातून निधी उपलब्ध करून दिला जातो. मजुरांनी केलेल्या कामाचा मोबदला थेट त्यांच्या बँक खात्यात जमा केला जातो. यासाठी नंदुरबार जिल्ह्यात 3 लाख 5 हजार 477 एवढे जॉब कार्ड वितरित करण्यात आले असून, त्यापैकी एक लाख 32 हजार 145 जॉबकार्ड कार्यान्वित आहेत. जिल्ह्यात एक लाख 26 हजार 332 जॉब कार्ड पडताळणी करण्यात आलेले असून, त्याअंतर्गत दोन लाख 23 हजार 462 मजूर कार्यान्वित आहेत. आजच्या परिस्थितीत एकट्या जिल्हा परिषदेच्या माध्यमातून जिल्ह्यात वैयक्तिक लाभाच्या योजनांमध्ये प्रधानमंत्री आवास योजना, सिंचन विहीर, शौचालय, शोषखड्डे, गुरांचा गोठा अशी कामे प्रस्तावित असून, सार्वजनिक कामांमध्ये रस्ते, पाझर तलाव गाळ काढणे, अंगणवाडी इमारत बांधकाम, पिण्याच्या पाण्याची विहीर, लहान नाल्यांवर जाळी बंधारे (गॅबीअन...

Read More

‘हिरा एक्झीक्युटीव्ह’ हॉटेल कोरोना योध्यांसाठी नि:शुल्क

नंदुरबार (प्रतिनिधी) :- कोविड-19 चा प्रादुर्भाव रोखण्यासाठी परिश्रम करणारे वैद्यकीय अधिकारी, परिचारीका, स्थलांतरीत अधिकारी, पोलीस प्रशासनातील अधिकारी-कर्मचारी या योध्यांसाठी माजी आमदार शिरीष चौधरी यांनी हॉटेल हिरा एक्झीक्युटीव्ह येथील ५० रुम्सची व्यवस्था मोफत उपलब्ध करून दिली आहे. त्यांनी या संदर्भातील संमती पत्र प्रशासनाला दिले आहे. संपूर्ण जगात कोरोनाने थैमान घातला आहे. भारतातही या विषाणूची मोठ्या प्रमाणात लागण वाढत आहे. अश्या परिस्तिथीत पोलीस, डॉक्टर, नर्सेससाठी अहोरात्र काम करत आहेत. आपल्या जीवाची पर्वा न करता नागरिकांसाठी स्वतःच्या घराबाहेर राहत आहेत. थोडासा विसावा घ्यायचा तर कुठे घ्यावा ? हा प्रश्न नित्याचाच झाला आहे. अश्या परिस्थितीत अनेक दानशूर व्यक्ती काही न काही योगदान देतांना दिसत आहेत.माजी आमदार शिरीष चौधरी यांनी यापूर्वी अमळनेर येथील त्यांचे निवासस्थान होमक्वारंटाईन व्यक्तींसाठी प्रशासनाला उपलब्ध करून दिले आहे. आता नंदुरबार येथील त्यांच्या मालकीचे हॉटेल हिरा एक्झीक्युटीव्ह येथे अधिकारी-कर्मचाऱ्याना भोजनाची सेवा करण्याची देखील त्यांनी तयारी दर्शविली आहे. जिल्ह्यात विविध स्तरातून प्रशासनाला मिळत असलेल्या सहयोगाबाबत समाधान व्यक्त करत, कोविड-१९ संदर्भातील उपाययोजना करताना आपण प्रशासनासोबत असल्याचे चौधरी यांनी यावेळी...

Read More

शासनातर्फे मोफत तांदळाचे वितरण सुरू जिल्ह्यात साडेपाच हजार क्विंटल तांदळाचे मोफत वाटप

नंदुरबार (प्रतिनिधी) -‍  प्रधान मंत्री गरीब कल्याण येाजनेअंतर्गत दोन दिवसात जिल्ह्यातील 22 हजार 305 कार्डधारकांना 5461 क्विंटल मोफत तांदळाचे वाटप करण्यात आले आहे. तर सार्वजनिक वितरण प्रणालीअंतर्गत आतापर्यंत अंत्योदय व प्राधान्य कुटुंबातील 2 लाख 28 हजार 141 कार्डधारकांना 56 हजार 193 क्विंटल धान्य वाटप करण्यात आले आहे. शिधापत्रिकेवर नमूद दोन्ही येाजनेतील सुमारे 11 लाख 25 हजार नागरिकांना 5 किलो तांदळाचे मोफत वितरण करण्यात येणार आहे. कोरोना संकटाच्या पार्श्वभूमीवर अंत्योदय व प्राधान्य कुटुंबातील सदस्यांना वेळेवर धान्य वितरण करण्यासाठी शासनाच्या निर्देशानुसार नियोजन करण्यात  आले आहे. जिल्ह्याला नियमित वितरणासाठी एकूण गव्हाचे 26 हजार 840 क्विंटल आणि तांदुळाचे 37 हजार 820  क्विंटल नियतन प्राप्त झाले आहे. तर प्रधानमंत्री गरीब कल्याण योजनेअंतर्गत 57 हजार 10 क्विटल तांदळाचे नियतन प्राप्त झाले आहे. ई-पॉस मशिनने धान्य वितरीत करताना दुकानदाराला स्वत:चे बायोमेट्रीक उपयोगात आणून वितरण करण्याची अनुमती देण्यात आली आहे. सार्वजनिक वितरण प्रणाली अंतर्गत अंत्योदय लाभार्थ्यास 15 किलो गहू 2 रुपये प्रति किलो दराने व  20 किलो तांदूळ 3 रुपये प्रति किलो दराने दिला जातो. तर 20 रुपये दराने एक किलो साखर देण्यात येते. प्रधान्य कुटुंबातील लाभार्थ्यास 2 किलो गहू व 3 किलो तांदूळ देण्यात येतो.  अक्कलकुवा तालुक्यातील 34 हजार 294 शिधापत्रिका धारकांना ( 8446 क्विंटल), अक्राणी 20 हजार 281 (5150 क्विंटल),  नंदुरबार 56 हजार (13640 क्विंटल), नवापूर 42 हजार 554 (10340 क्विंटल), शहादा 49 हजार 950 (12267 क्विंटल) आणि  तळोदा तालुक्यातील 25 हजार 62 कार्डधारकांना 6350 क्विंटल धान्याचे वितरण करण्यात आले आहे. जिल्ह्यात एकूण 87 टक्के...

Read More

वाळुच्या डंपरमध्ये विमल गुटख्याची वाहतुक चौघे ताव्यात , ३४ लाखाचा गुटखा जप्त

नंदुरबार :- गुजरात राज्यातून महाराष्ट्रात आणलेला सुमारे 34 लाख रुपयांचा गुटखा नंदुरबार पोलिसांनी हस्तगत केल्याने जिल्ह्यात एकच खळबळ माजली आहे. नंदुरबार जिल्ह्यात पोलिसांनी सुरू केलेल्या “ऑपरेशन वॉश आउट” चे सर्व स्तरातून कौतुक केले जात असून, पोलिसांनी ही कार्यवाही सुरू केल्याने अवैध व्यावसायिकांचे धाबे दणाणले आहे .सध्या संपुर्ण जगभरासह भारतात थैमान घातलेल्या कोराणा विषाणुचा प्रादुर्भाव होवु नये म्हणून केंद्र व राज्य सरकारने संपुर्ण भारतात लॉकडाऊन घोषीत केलेले आहे . नंदुरबार जिल्हात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढु नये म्हणून खबरदारीच्या सर्व उपाय योजना राज्य शासन युध्द पातळीवर करीत आहे. यातच महाराष्ट्रात बंदी असलेला विमल गुटखा गुजरात राज्यातुन नंदुरबार जिल्ह्यात आणुन लॉकडाऊनचा फायदा घेवुन त्याची जास्त दरात विक्री होत होता. त्यानुसार आज दिनांक १६ एप्रिल २०२० रोजी गुजरात राज्यातुन निझरमार्गे नंदुरबार येथे मोठया प्रमाणात विमल गुटखा वाहतुक होणार असल्याची बातमी पोलिसांना मिळाली. त्यानुसार तयार करण्यात आलेल्या गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाने दिनांक १५ रोजी रात्री ११ वाजेपासुन निझर रोडवर मन्सुरी टेन्ट हाऊसजवळ सापळा लावला. आज दि . १६ रोजी सुमारे पहाटे ०१ . ३० वाजेच्या सुमारास निझर गावाकडुन एक हायवा डंपर नंदुरबारच्या दिशेने येताना दिसला. म्हणुन स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकातील कर्मचाऱ्यांनी बॅटरीच्या सहाय्याने वाहनास उभे करण्याचा इशारा दिला असता संशयीत वाहन चालकाने वाहन न थांबविता भरधाव वेगाने पुढे निघुन गेला , म्हणुन स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाची खात्री झाल्याने सदर वाहनाचा पाठलाग करुन शिताफीने वाहनाला थांबवुन डंपरमध्ये चालक व सोबत ३ इसम बसलेले दिसले. त्यात आकेश काशिनाथ नाईक वय – २४, २ ) मनिष...

Read More

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

error: Content is protected !!