दररोज किमान 300 स्वॅब नमुने तपासणीसाठी घ्या- डॉ.राजेंद्र भारुड
नंदुरबार (जिमाका वृत्तसेवा) :कोरोनाची संपर्क साखळी कमी कालावधीत खंडीत करण्यासाठी दररोज किमान 300 स्वॅब घेण्याचा प्रयत्न आरोग्य यंत्रणेने करावा आणि मृत्यूदर नियंत्रित करण्यासाठी आवश्यक उपाय योजावेत, असे निर्देश जिल्हाधिकारी डॉ.राजेंद्र भारुड यांनी दिले. कोरोनाबाबत आयोजित ऑनलाईन आढावा बैठकीत ते बोलत होते. बैठकीस मुख्य कार्यकारी अधिकारी विनय गौडा, अपर जिल्हाधिकरी महेश पाटील, जिल्हा शल्य चिकीत्सक डॉ.रघुनाथ भोये, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.एन.डी.बोडके आदी उपस्थित होते. डॉ.भारुड म्हणाले, नंदुरबार तालुक्यातून 125, शहादा येथून 100 आणि तळोदा व नवापूर येथून 70 स्वॅब घेण्यात यावेत. ज्येष्ठ नागरिक आणि अतिजोखमीच्या व्यक्तिंमध्ये साधारण लक्षणे आढळल्यास त्वरीत स्वॅब घेवून उपचार सुरू करण्यात यावेत. त्यासाठी मोबाईल टीमचा उपयोग...
Read More