Author: Ramchandra Bari

कोरोना बाधितांच्या बरे होण्याचा दर 79 टक्क्यापर्यंत पोहोचला

नागरिकांना वेळीच उपचार घेण्याचे जिल्हाधिकाऱ्यांचे आवाहन नंदुरबार: जिल्हा प्रशासनाने कोरोना बाधितांच्या उपचारासाठी निर्माण केलेल्या सुविधांमुळे बरे होणाऱ्यांच्या दरात सातत्याने वाढ होत असून  तो 80 टक्क्यापर्यंत पोहोचला आहे. मृत्यूदरही 2.3 पर्यंत कमी झाला आहे. जिल्ह्यात पुरेशा प्रमाणात उपचाराच्या सुविधा आणि बेड्सची व्यवस्था करण्यात आली असून नागरिकांनी आजाराची लक्षणे दिसताच त्वरीत उपचार घेण्याचे आवाहन जिल्हाधिकारी डॉ.राजेंद्र भारुड यांनी केले आहे. जिल्हा शासकीय रुग्णालयात आरटीपीसीआर लॅब सुरू झाल्यानंतर संशयित व्यक्तींची तातडीने तपासणी करण्यात येत असून त्याचा अहवालही वेळेवर प्राप्त होत असल्याने बाधितांवर वेळेवर उपचार करणे शक्य होत आहे. 8 खाजगी ठिकाणीदेखील उपचाराची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. तालुक्याच्या ठिकाणी आणि ग्रामीण...

Read More

ऑगस्ट महिन्यातील नुकसानीबाबत 26 हजार शेतकऱ्यांचे पंचनामे

नंदुरबार : ऑगस्ट महिन्यात सततच्या पावसामुळे झालेल्या पिकांच्या नुकसानीचे पंचनामे करण्यात आले असून त्याचा अहवाल शासनाकडे पाठविण्यात आला आहे.  नुकसानग्रस्तांना मदतीसाठी 7 कोटी 75 लक्ष रुपयांची मागणी शासनाकडे करण्यात आली आहे. ऑगस्ट महिन्यात  पावसामुळे जिल्ह्यातील 26 हजार 461 शेतकऱ्यांकडील  11 हजार 242 हेक्टरवरील पिकांचे 33 टक्क्यापेक्षा जास्त नुकसान झाले आहे. नंदुरबार तालुक्यातील 283 हेक्टर, नवापूर 3918 हे., अक्कलकुवा 2599 हे., शहादा 1190 हे., तळोदा 125 हे. आणि  अक्राणी तालुक्यात 3125 हे. क्षेत्रातील पिकांचे 33 टक्क्यापेक्षा जास्त नुकसान झाले आहे. यात जिरायती व फळपिके सोडून इतर बागायती पिकांचा समावेश आहे. नुकसानीचा अहवाल कृषी आयुक्तालयाकडे पाठविण्यात आला आहे. सप्टेंबर महिन्यातील नुकसानीचे पंचनामे  सप्टेंबर महिन्यात झालेला सततचा पाऊस व वादळी वाऱ्यामुळे 8234 शेतकऱ्यांच्या शेतात 4364 हेक्टर क्षेत्रातील पिकांचे प्राथमिक अहवालानुसार नुकसान झाल्याचा अंदाज वर्तविण्यात आला आहे.  नुकसान झालेल्या पिकांचे तातडीने पंचनामे  करण्याचे निर्देश जिल्हाधिकारी डॉ.राजेंद्र भारुड यांनी दिले आहेत. त्यानुसार पंचनाम्याचा प्राथमिक अहवाल प्राप्त झाला असून लवकरच अंतिम अहवाल  शासनाला पाठविण्यात येणार आहे. प्राथमिक अहवालानुसार नंदुरबार तालुक्यात 1170 शेतकऱ्यांचे 985 हेक्टर, नवापूर 5123 शेतकऱ्यांचे 1828 हे., अक्कलकुवा 210 शेतकऱ्यांचे 60 हेक्टर, शहादा 351 शेतकऱ्यांचे 261 हे. आणि अक्राणी तालुक्यात 1380 शेतकऱ्यांच्या 1230 हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाले आहे.  यात प्रामुख्याने कापूस, ऊस, मका,सोयाबीन , मिरची, तूर, भात आणि ज्वारी पिकांचा समावेश...

Read More

‘माझे कुटुंब, माझी जबाबदारी’ उपक्रमाला मुकाअ विनय गौडा यांची भेट

नंदुरबार (प्रतिनिधी) :- सामाजिक स्तरावर पसरत चाललेली कोरोनाची साखळी तोडण्यासाठी नागरिकांच्या मनातील संभ्रम व भीती दूर होणे अत्यंत गरजेचे आहे, त्यामुळे जिल्हा परिषद प्रशासनातर्फे ‘माझे कुटुंब माझी जबाबदारी’ या उपक्रमांतर्गत होणाऱ्या सर्वेक्षण कार्याला सर्वांनी सहकार्य करावे, असे आवाहन नंदुरबार जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी श्री विनय गौडा यांनी केले. नवापूर तालुक्यातील कडवान येथे त्यांनी नागरिकांशी संवाद साधला.संपूर्ण जगभरात कोरोना (covid-19) या आजाराने थैमान घातले आहे. सुरुवातीला व्यक्तीपासून व्यक्तीपर्यंत प्रसार होत असलेला हा आजार आता सामूहिक स्तरावर पसरू लागला आहे. त्यामुळे कोरोना बाधितांची संख्या दिवसेंदिवस वाढत चालली आहे. ही साखळी तोडण्यासाठी जनजागृती करणे व नागरिकांचे कोरोना सर्वेक्षण करण्यासाठी शासनाने ‘माझे...

Read More

आरोग्य साक्षर महाराष्ट्र घडविण्याचा मानस-मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे नाशिक विभागातील पालकमंत्री व अधिकाऱ्यांशी साधला संवाद नंदुरबार : -‘माझे कुटुंब माझी जबाबदारी’ ही केवळ मोहिम नसून या उपक्रमाच्या माध्यमातून आरोग्य साक्षर महाराष्ट्र घडविण्याचा शासनाचा मानस आहे. आपले कुटुंब, गाव, शहर, जिल्हा आणि महाराष्ट्रावर प्रेम करणारा प्रत्येकाने या मोहिमेत सहभागी व्हावे, असे आवाहन आज राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केले आहे. नाशिक विभागातील सर्व जिल्ह्यांचे पालकमंत्री व अधिकाऱ्यांशी व्हिडीओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून संवाद साधताना ते बोलत होते. जिल्ह्याचे पालकमंत्री ॲड के.सी.पाडवी , जिल्हाधिकारी डॉ.राजेंद्र भारुड, अपर जिल्हाधिकारी महेश पाटील, अपर पोलीस अधीक्षक चंद्रकांत गवळी, जिल्हा शल्य चिकीत्सक  डॉ.रघुनाथ भोये, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.नितीन बोडके, तहसीलदार उल्हास देवरे आदी...

Read More

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

error: Content is protected !!