शेतकऱ्यांना विंधन विहिरीसाठी अर्ज करण्याचे आवाहन
नंदुरबार (जिमाका वृत्तसेवा) : सन 2014-15 आर्थिक वर्षासाठी केंद्रशासनाकडील विशेष केंद्रीय सहाय्य योजनेअंतर्गत ट्युबवेल व पंपसेट योजनेसाठी अनुसूचित जमातीच्या शेतकऱ्यांना योजनेचा लाभ देण्यात येणार असून यासाठी इच्छुक व पात्र लाभार्थ्यांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत. या योजनेसाठी लाभार्थी अनुसूचित जमातीचा असावा, शेतकरी दारिद्र्य रेषेखालील असावा अथवा उत्पन्न दोन लाखाच्या आत असावे. लाभार्थ्याकडे किमान एक एकर जमीन असावी, 7/12 उतारा स्वत:च्या नावांचा असावा. शेताजवळ विद्युत पुरवठा असणे आणि जमीन विकणार नसल्याचे हमीपत्र आणि लाभार्थ्यांने स्वत: श्रमदान करणे आवश्यक आहे. अर्जासोबत या योजनेचा इतर योजनेतून लाभ घेतला नसल्याचे हमीपत्र, पासपोर्ट फोटो, जातीचा दाखला, दारिद्र्य रेषा, उत्पन्नाचा दाखला जोडावा. 7/12 उतारा, आधार कार्ड, बँक खाते क्रमांक आधार लिंक असावे. रहिवाशी दाखला, ग्रामसभा ठराव इत्यादी जोडणे आवश्यक आहे. अर्ज वाटप व स्विकृत एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प, कार्यालय, नवापूर रोड, नंदुरबार या ठिकाणी होणार असून 4 डिसेंबर 2020 सायं. 6 वाजेपर्यंत अर्ज स्विकारण्यात येणार आहेत, असे प्रकल्प अधिकारी नंदुरबार यांनी कळविले...
Read More