Author: Ramchandra Bari

क्षयरुग्ण व कुष्ठरुग्ण रुग्ण शोध अभियानाच्या जनजागृतीचा शुभारंभ

नंदुरबार  (प्रतिनिधी)  – राष्ट्रीय क्षयरोग व कुष्ठरोग निर्मुलन कार्यक्रमांतर्गत संयुक्त कुष्ठरुग्ण व क्षयरुग्ण शोध अभियान दिनांक 1 ते 16 डिसेंबर, 2020 या कालावधीत राबविण्यात येत आहे. या अभियानाबाबत नागरिकांना माहिती देण्यासाठी तयार करण्यात आलेल्या जनजागृती रथाद्वारे शहरी तसेच ग्रामीण भागातील अधिक क्षयरोग रुग्ण आढळणाऱ्या भागात तसेच वाडे, वस्त्या, डोंगरभाग, विटभट्या, ऊसतोड मजुर या भागात क्षयरोग व कुष्ठरोगाविषयी मराठी व आदिवासी बोलीभाषेतून ध्वनिक्षेपक आणि फलकाद्वारे क्षयरोग व कुष्ठरोगाबाबत जनजागृती करण्यात येणार आहे. क्षयरुग्ण व कुष्ठरुग्ण रुग्ण शोध अभियानाबाबत नागरिकांना माहिती देण्यासाठी तयार करण्यात आलेल्या जनजागृती रथाला जिल्हाधिकारी डॉ.राजेंद्र भारुड आणि मुख्य कार्यकारी अधिकारी रघुनाथ गावडे यांनी हिरवी झेंडी दाखवून जनजागृती मोहिमेचा शुभारंभ केला. यावेळी जिल्हा शल्य चिकीत्सक डॉ.रघुनाथ भोये, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.नितीन बोडके, सहायक संचालक तथा जिल्हा क्षयरोग अधिकारी डॉ. अभिजीत गोल्हार, जिल्हा कार्यक्रम समन्वयक शिरीष भोजगुडे...

Read More

गोळीबार सराव असल्याने ईदगाह मैदान परिसरात प्रवेश बंदी

नंदुरबार (जिमाका वृत्तसेवा) : येथील बिलाडी रोड ईदगाह मैदान परिसरात 8 ते 20 डिसेंबर 2020  या कालावधीत वार्षिक गोळीबार सराव घेण्यात येणार असल्याने पोलीस अधिकारी-कर्मचारी यांचेव्यतिरिक्त प्रतिबंधीत क्षेत्रात वरील कालावधीत कोणालाही प्रवेश करता येणार नाही. नागरिकांनी कायदा व सुव्यवस्था अबाधित राहील तसेच जिवित अथवा वित्तहानी होणार नाही याची दक्षता घ्यावी व सदर क्षेत्रात गोळीबाराचे कालावधीत येऊ नये, असे जिल्हादंडाधिकारी डॉ.राजेंद्र भारुड यांनी कळविले...

Read More

रब्बी हंगामासाठी प्रधानमंत्री पिक विमा योजनेचा लाभ घ्यावा

नंदुरबार (जिमाका वृत्तसेवा) : रब्बी हंगामासाठी गहू, हरभरा व उन्हाळी भुईमूग या पिकांसाठी प्रधानमंत्री पिक विमा योजना जिल्ह्यात लागू करण्यात आली असून योजनेचा जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी लाभ घ्यावा असे आवाहन जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी यांनी केले आहे. गहू, हरभरा व उन्हाळी भुईमूग पिक विमासाठी शेतकऱ्यांना 1.50 टक्के प्रमाणे विमा हप्ता भरावा लागणार असून गहूसाठी 562.50 प्रती हेक्टर, ज्वारी 375 प्रती हेक्टर, हरभरा 525 प्रती हेक्टर व उन्हाळी भुईमूग 600 प्रती हेक्टर असून गहुसाठी व हरभरा पिकासाठी 15 डिसेंबर तर उन्हाळी भुईमूगसाठी 31 मार्च पर्यंत पिकविम्याची रक्कम भरावयाची आहे. रब्बी हंगामासाठी नैसर्गीक आपत्ती किड आणि रोग, स्थानिक नैसर्गीक आपत्तीमुळे होणाऱ्या नुकसानीस संरक्षण तसेच पिक पेरणी पासून काढणी पर्यंतच्या कालावधीत पिकांच्या उत्पादनास येणारी घट, जसे नैसर्गीक, आग, विज कोसळणे, गारपीट, चक्रीवादळ, पुर, भुसखलन, दुष्काळ यांना संरक्षण देय आहे. तसेच काढणी नंतर सुकवणीसाठी शेतात पसरवून ठेवलेल्या अधिसूचीत पिकांचे नुकसान झाल्यास वैयक्तिकस्तरावर पंचनामे करुन नुकसान भरपाई निश्चित केली जाणार आहे. रब्बी हंगामासाठी जिल्ह्यासाठी रिलायन्स जनरल इन्शुरन्स कंपनी लि.मुंबई या कंपनीची निवड केली असून योजनेत सहभागी झालेल्या शेतकऱ्यांनी नैसर्गीक आपत्तीची घटना घडल्यापासून 72 तासाच्या आत नुकसानीबाबत विमा कंपनी, संबंधीत बँक, कृषि, महसूल  विभाग किंवा टोल फ्री क्रमांक 18001024088 वर संपर्क...

Read More

मध केंद्र योजनेसाठी पात्र लाभार्थ्यांनी अर्ज सादर करावे

नंदुरबार (जिमाका वृत्तसेवा) :  महाराष्ट्र राज्य खादी व ग्रामोद्योग मंडळामार्फत मध केंद्र योजनेसाठी पात्र व्यक्ती, संस्थाकडून अर्ज मागविण्यात  आले आहेत. मध केंद्र योजना सुरु करण्यासाठी पात्र लाभार्थ्यांना 50 टक्के अनुदान स्वरुपात देण्यात येईल व 50 टक्के स्वगुंतवणुक करावी लागेल. मध उद्योगाबाबत, मधमाशा संरक्षक व संवर्धन याबाबत मोफत प्रशिक्षण महामंडळामार्फत देण्यात येईल. वैयक्तिक मधपाळ प्रशिक्षणासाठी अर्जदार साक्षर असावा आणि वय 18 वर्षापेक्षा जास्त असावे. स्वत:ची शेती असल्यास प्राधान्य देण्यात येईल. मंडळाने निश्चित केलेल्या ठिकाणी प्रशिक्षण घेणे अनिवार्य राहील. केंद्र चालक प्रगती‍शील मधपाळ, संस्था, व्यक्तिंना प्रशिक्षण घेण्यासाठी  अर्जदार किमान 10 वी पास असावा आणि वय 21 वर्षांपेक्षा जास्त असावे. अर्जदार व्यक्तिंच्या नावे किंवा त्या व्यक्तीच्या कुटुंबातील कोणत्याही व्यक्तीच्या नावे किमान एक एकर शेतजमीन किंवा भाडे तत्वावर शेतजमीन असावी. लाभार्थ्यांकडे मधमाशा पालन, प्रजनन व मध उत्पादनाबाबतीत लोकांना प्रशिक्षण देण्याची क्षमता व सुविधा असावी. केंद्र चालक, संस्थाना प्रशिक्षण घेण्यासाठी संस्था नोंदणीकृत असावी. संस्थेच्या नावे  मालकीची किंवा 10 वर्षासाठी भाडे तत्वावर एक एकर शेतजमीन किंवा प्रशिक्षण केंद्र चालविण्यासाठी संस्थेच्या नावे अथवा भाडे तत्वावर घेतलेली 1000 चौ.फुट क्षेत्राची सुयोग्य इमारत असावी. संस्थेकडे मधमाशा पालन प्रजनन व मध उत्पादनाबाबतीत लोकांना प्रशिक्षण देण्याची क्षमता असलेले सेवक असावे. लाभार्थी निवड प्रक्रियेनंतर प्रशिक्षणापुर्वी मध व्यवसाय सुरु करणेसंबंधी मंडळास बंधपत्र लिहून देणे अनिवार्य असेल, तसेच मंडळाने निश्चित केलेल्या ठिकाणी संबंधीताना प्रशिक्षण घेणे अनिवार्य असेल. उत्पादीत झालेले मध हे शासनाच्या हमी भावाने खरेदी करण्यात येईल. अधिक माहितीसाठी महाराष्ट्र राज्य खादी व ग्रामोद्योग मंडळ, दुसरा मजला रुम नं 222, मध्यवर्ती प्रशासकीय इमारत,...

Read More

यूपीएससीच्या पूर्वपरीक्षेत पात्र अनुसूचित जातीच्या उमेदवारांना 50 हजाराचे अर्थसहाय्य

नंदुरबार (जिमाका वृत्तसेवा) : संघ लोकसेवा आयोगातर्फे नागरी सेवा पूर्व परिक्षा 2020 चा निकाल 23 ऑक्टोंबर रोजी आयोगाच्या संकेतस्थळावर घोषित करण्यात आला असून उत्तीर्ण झालेल्या अनुसूचित जातीच्या  विद्यार्थ्यांना मुख्य परिक्षेकरिता एकरकमी 50 हजार रुपयाचे अर्थसहाय्य डॉ.बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था पुणे (बार्टी ) मार्फत देण्यात येणार आहे. बार्टीच्या संकेतस्थळावर यासाठीचे निकष आणि अर्ज उपलब्ध असून अर्जासोबत आवश्यक ते कागदपत्रे जोडून बार्टीच्या ई-मेल वर 8 डिसेंबर 2020  सायंकाळी 5.30 वाजेपर्यंत पाठवावे . या योजनेचा अधिकाधिक उमेदवारांनी लाभ घ्यावा, असे आवाहन डॉ.बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्थेचे महासंचालक धम्मज्योति गजभिये यांनी केले...

Read More

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

error: Content is protected !!