नंदुरबार (प्रतिनिधी) :-कुष्ठरुग्ण व क्षयरुग्ण शोध अभियाना अंतर्गत जिल्हयातील आरोग्य सेवक, आरोग्य सेविका आणि आशा कार्यकर्त्या व स्वयंसेवक यांच्याद्वारे कुष्ठरुग्ण व क्षयरुग्ण शोध अभियाना अंतर्गत एकुण 17,72,527 इतक्या लोकसंख्येतील 3,29,000 घरांपर्यंत 1,284 पथके पोचणार असून घरोघरी भेट देऊन क्षयरोगाच्या व कुष्ठरोगाच्या लक्षणांची माहिती देणे व तसेच संशयित क्षयरुग्ण आढळल्यास त्यांची थुंकी नमुने घेऊन जवळच्या तुक्ष्मदर्शक केंद्रात तपासणी करीता देऊन आवश्यकतेनुसार एक्स रे तपासणी व सिबीनॅट मशिनव्दारे तपासणी करण्यांत येणार आहे. व  संशयित कुष्ठरुग्ण आढळल्यास जवळील आरोग्य केंद्रात त्याची तपासणी करून घेण्यात येणार आहे. जिल्हयातील निवड केलेल्या अतिजोखमीचा भागात ही मोहिम राबवुन रुग्ण शोधले जाणार आहेत. या मोहिमेत आढळलेल्या रुग्णांना त्वरीत उपचार देण्यात येणार आहे.

सदर संयुक्त कुष्ठरुग्ण व क्षयरुग्ण शोध अभियानासाठी जिल्हास्तरीय समन्वय समिती गठित करण्यात आली असून सदर समितीची सभा दि. 27/11/2020 रोजी  मा. जिल्हाधिकारी, डॉ. राजेंद्र भारुड यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हाधिकारी कार्यालय, नंदुरबार येथे संपन्न झाली.  बैठकीस मुख्य कार्यकारी अधिकारी रघुनाथ गावडे, जिल्हा शल्य चिकीत्सक डॉ.रघुनाथ भोये, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.नितीन बोडके, डॉ.राजेश वळवी, सहायक संचालक तथा जिल्हा क्षयरोग अधिकारी डॉ. अभिजीत गोल्हार आदी उपस्थित होते.

सदर सभेत मा. जिल्हाधिकारी, डॉ. राजेंद्र भारुड यांनी अभियान  यशस्वी होणेसाठी मार्गदर्शन केले. तसेच  गेल्या पाच वर्षात क्षयरुग्ण व कुष्ठरुग्ण अधिक आढळलेल्या गावातील प्रत्येक घरात आरोग्य तपासणी करावी, असे निर्देश जिल्हाधिकारी डॉ.राजेंद्र भारुड यांनी दिले. सदर सभेस जिल्हा कार्यक्रम समन्वयक (सुराक्षनिका) श्री. शिरीष भोजगुडे, जिल्हा कार्यक्रम सन्वयक (DAPCU) नितीन मंडलीक, डी.पी.एस राहुल वळवी, पी.पी.एम. समन्वयक समुवेल मावची, सांखिकी  अन्वेशक प्रविण सानप, डि.इ.ओ रामचंद्र बारी, टी बी समुपदेशक महेश सोनी, एन. एम. ए. जे. डी वळवी, सांखिकी  अन्वेशक प्रताप पावरा आदी  उपस्थित होते.