शिवभोजन योजनेमुळे गरजूंना मिळाले अल्पदरात भोजन
नंदुरबार (जिमाका वृत्तसेवा) : राज्य शासनाच्या शिवभोजन योजनेमुळे कोरोना संकटाच्या काळात गरीब व गरजू नागरिकांना अल्पदरात भोजन उपलब्ध होत आहे. जिल्ह्यातील 13 शिवभोजन केंद्राच्या माध्यमातून आतापर्यंत साडेतीन लाखापेक्षा अधिक थाळ्यांचे वितरण करण्यात आले आहे. ग्रामीण भागातील नागरिक कामानिमित्त शहरात येत असतात. अशावेळी त्यांना भोजनासाठी अधिक खर्च करावा लागतो. हा खर्च कमी करण्यासाठी 1 जानेवारी 2020 पासून शिवभोजन योजना सुरू करण्यात आली. 2 चपात्या, 1 भाजी आणि वरण-भात समाविष्ट असलेल्या थाळीचा दर शहरी भागासाठी 50 रुपये आणि ग्रामीण भागासाठी 35 रुपये निश्चित करण्यात आला. सुरूवातीस 10 रुपये प्रति थाळी याप्रमाणे भोजन वितरीत करण्यात आले. त्याला चांगला प्रतिसादही मिळाला. शिवभोजन ॲप्लिकेशनच्या...
Read More