Author: Ramchandra Bari

जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांचा नंदुरबार जिल्हा दौरा कार्यक्रम

नंदुरबार (जिमाका वृत्तसेवा) :राज्याचे जलसंपदा व लाभक्षेत्र विकासमंत्री जयंत पाटील हे नंदुरबार जिल्हा दौऱ्यावर येत असून त्याचा दौरा कार्यक्रम पुढीलप्रमाणे आहे. बुधवार 10 फेब्रुवारी 2021 रोजी  सकाळी 11.30 वाजता साक्री येथून मोटारीने नंदुरबारकडे प्रयाण. दुपारी 12 ते 12.45 वाजता नंदुरबार येथे आगमन व नंदुरबार जिल्हा जलसंपदा विभागाच्या अधिकाऱ्यांसमवेत बैठक. 12.45 ते 1.30 वाजेपर्यंत राखीव. दुपारी 1.30 ते 2.15 राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी, नंदुरबार जिल्हा कार्यकारिणी बैठकीस उपस्थिती. 2.15 ते 2.45 नंदुरबार विधानसभा मतदारसंघ आढावा बैठक, 2.45 ते 3.30 अक्कलकुवा विधानसभा मतदारसंघ आढावा बैठक, 3.30 ते 4.15 शहादा विधानसभा मतदारसंघ आढवा बैठक, 4.15 ते 5 नवापूर विधानसभा मतदारसंघ आढावा बैठक. सायंकाळी 5 वाजता नंदुरबार येथून शिंदखेडाकडे...

Read More

बर्ड फ्लूच्या पार्श्वभूमीवर योग्यरितीने सर्वेक्षण करा

नंदुरबार  – नवापूर तालुक्यात बर्ड फ्लूचा पा्रदुर्भाव लक्षात घेता पशुसंवर्धन विभागाने परिणामकारक व योग्यरितीने सर्वेक्षण करावे आणि पोल्ट्री फार्ममधील पक्ष्यांच्या संख्येची नोंद घ्यावी, असे  निर्देश जिल्हाधिकारी डॉ.राजेंद्र भारुड यांनी दिले आहेत.   वन विभागाच्या मदतीने स्थलांतरित पक्ष्यांच्या मार्गांची माहिती घेण्यात यावी आणि वन्यजीव अभयारण्य, राष्ट्रीय उद्याने, जलाशय, पाणथळ जागेत स्थलांतरित व जंगली पक्षी यांच्या वास्तव्याचा शोध घेण्यात यावा.  वन विभागाच्या साह्याने स्थलांतरित व वन्य पक्ष्यांचे नमुने घ्यावे. पक्षी विक्रेता केंद्र ठिकाणे व तेथील पक्ष्यांची संख्येबाबत माहिती घेण्यात यावी. बर्ड फ्लू प्रभावित राज्यातील शेजारच्या सीमावर्ती भागांची माहिती घेण्यात यावी. व्यावसायिक व परसातील पोल्ट्री फार्ममधील पक्ष्यांचे नमुने तातडीने घ्यावे. पक्ष्यांच्या अचानक...

Read More

जैव सुरक्षा उपाययोजनेची माहिती पोल्ट्री व्यावसायिकांना द्या-सचिंद्र प्रताप सिंह

नंदुरबार – नवापूरमध्ये दुसऱ्यांदा बर्ड फ्लूचा प्रादुर्भाव झाला असल्याने यापुढे अशी परिस्थिती निर्माण होऊ नये यासाठी  पशुसंवर्धन विभागातील अधिकाऱ्यांनी जैव सुरक्षा उपाययोजनांबाबत पोल्ट्री व्यावसायिकांना सविस्तर माहिती द्यावी आणि पोल्ट्री फार्ममध्ये मार्गदर्शक सुचनेननुसार उपाययोजना होत असल्याची खात्री करावी, असे निर्देश पशुसंवर्धन आयुक्त सचिंद्र प्रताप सिंह यांनी दिले. नवापूर येथे बर्ड फ्लूबाबत आयोजित बैठकीत ते बोलत होते. यावेळी जिल्हाधिकारी डॉ.राजेंद्र भारुड, मुख्य कार्यकारी अधिकारी रघुनाथ गावडे, अपर पोलीस अधीक्षक विजय पवार, सहायक जिल्हाधिकारी वसुमना पंत, पशुसंवर्धन सहआयुक्त डॉ.एस.एस.राऊतमाने, उप मुख्य कार्यकारी अधिकारी शेखर रवंदळ, पशुसंवर्धन उपायुक्त डॉ.के.टी.पाटील, जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी उमेश पाटील,   तहसीलदार उल्हास देवरे, मंदार कुलकर्णी आदी उपस्थित होते. श्री.सिंह...

Read More

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

error: Content is protected !!