Author: Ramchandra Bari

जिल्हाधिकारी कार्यालयात आरोग्य व पोषण विषयावर कार्यशाळा संपन्न

नंदुरबार (जिमाका वृत्तसेवा) : ‘न्युट्रिशन इंडिया’ कार्यक्रम अंतर्गत जिल्हाधिकारी कार्यालयात आरोग्य व पोषण विषयावर कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले. कार्यशाळेचे उद्घाटन खासदार डॉ.हिना गावीत यांच्या हस्ते झाले.  यावेळी आमदार डॉ.विजयकुमार गावीत, जिल्हाधिकारी डॉ.राजेंद्र भारुड ,महाराष्ट्र ग्राम सामाजिक अभियानाचे कार्यक्रम अधिकारी निलेश गंगावणे, कुपोषण मुक्त नंदुरबार अभियानाच्या प्रमुख डॉ.नवनीता रुद्रा आदी उपस्थित होते.             यावेळी खासदार डॉ.हिना गावीत म्हणाल्या की, नंदुरबार जिल्ह्यातील आदिवासी बहूल भागातील बालक आणि महिलांच्या आरोग्य व पोषणसंबंधी सेवांमध्ये सुधारणा घडवून आणण्यासाठी महाराष्ट्र ग्राम सामाजिक परिवर्तन अभियान आणि प्लॅन इंडिया यांच्या संयुक्त विद्यमाने 2019 मध्ये न्युट्रिशन इंडिया कार्यक्रम हा पथदर्शी प्रकल्प नंदुरबार व अमरावती जिल्ह्यात सुरु आहे. जिल्ह्यात...

Read More

बर्ड फ्लू संसर्ग केंद्रापासून अडीच किमी परिसर बाधित क्षेत्र घोषित

नंदुरबार (जिमाका वृत्तसेवा) : नवापूर तालुक्यातील परिसरातील 3 पोल्ट्री फार्ममधील अहवाल पॉझिटीव्ह आले असल्याने जिल्हाधिकारी तथा जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे अध्यक्ष डॉ.राजेंद्र भारुड यांनी  संसर्ग केंद्रापासून अडीच किलोमीटरचे त्रिज्येतील क्षेत्र बाधित क्षेत्र म्हणून घोषित केले आहे. नवापूरमधील मुस्तबा पोल्ट्री फार्म, सफा पोल्ट्री फार्म, डॉन बी पोल्ट्री फार्म अशा तीन पोल्ट्रीमधील नमुना अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. बाधित पोल्ट्री फार्मच्या केद्रबिंदू पासून अडीच किमी त्रिज्येत रिची पोल्ट्री फार्म, पॅराडाइस पोल्ट्री फार्म, अशरफ पोल्ट्री फार्म आणि पायोनियर पोल्ट्री फार्म येतात.  या क्षेत्रातील सर्व पोल्ट्री फार्म व परसातील कुक्कुट पक्ष्यांचे सर्वेक्षण करुन अहवाल तयार करण्याचे, बाधित क्षेत्रातील सर्व कुक्कुट पक्ष्यांची शास्त्रोक्त पद्धतीने कत्तल...

Read More

जिल्हा सूचना विज्ञान केंद्रास सीएसआयचा पुरस्कार प्रदान

नंदुरबार (जिमाका वृत्तसेवा) : कम्प्युटर सोसायटी ऑफ इंडिया संस्थेतर्फे स्थानिक प्रशासनात संगणकीय प्रणालीच्या नाविन्यपूर्ण वापरासाठी देण्यात येणारा सीएसआय 2020  पुरस्कार उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री आदित्यनाथ योगी यांच्या उपस्थितीत लखनऊ येथे जिल्हा सूचना  विज्ञान केंद्रास प्रदान करण्यात आला. जिल्हा सूचना विज्ञान अधिकारी  धमेंद्र जैन यांनी हा पुरस्कार स्विकारला. कोरोनाकाळात संगणकीय प्रणालीचा उपयोग करीत आरोग्यदर्शक मॅप आणि प्रतिबंधीत क्षेत्र व रुग्णालयांचे जीआयएस मॅपिंग करण्यासाठी ही निवड करण्यात आली आहे. जिल्हाधिकारी डॉ.राजेंद्र भारुड यांना या यशाबद्दल श्री.जैन व त्यांच्या सहकाऱ्यांचे अभिनंदन केले...

Read More

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

error: Content is protected !!