कर्जमुक्तीमुळे ट्रॅक्टरचे स्वप्न होईल साकार
नंदुरबार (जिमाका वृत्तसेवा) : महात्मा जोतिबा फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेमुळे अक्कलकुवा तालुक्यात वालंबा गावातील मोग्या गाया पाडवी यांचे 80 हजाराचे कर्ज माफ झाले असून डोंगराळ भागात ट्रॅक्टरच्या सहाय्याने आधुनिक तंत्र वापरण्याचा मनोदय त्यांनी व्यक्त केला आहे. अक्कलकुवा तालुक्यातील डोंगराळ भागात वालंबा हे गाव आहे. गावातील वस्ती डोंगरांवर विखुरलेली आहे. शेती करणे अत्यंत कष्टाचे काम तर आहेच शिवाय बहुतांशी निसर्गावर अवलंबून रहावे लागते. दुर्गम भाग असल्याने पारंपरिक शेतीला मर्यादा येतात. अशात निसर्गाची अवकृपा झाली तर पुढच्या वर्षी कर्ज काढण्याशिवाय दुसरा पर्याय नसतो. वालंबा गावातील मोग्या गाया पाडवी यांनादेखील निसर्गाच्या लहरीपणाचा फटका बसला. दोन वर्षापूर्वी हातात आलेले उत्पन्न गेले आणि त्यांना...
Read More
