कोरोना संसर्ग रोखण्यासाठी कार्यवाही करण्याचे जिल्हाधिकाऱ्याचे आदेश
नंदुरबार (जिमाका वृत्तसेवा) : नंदुरबार जिल्ह्यात कोरोना संसर्ग वाढण्याची शक्यता लक्षात घेता त्यावर तात्काळ नियंत्रण करणे आणि विषाणू संसर्गात अधिक वाढ होऊ न देता उपाययोजना राबवणे आवश्यक असल्याने विविध यंत्रणेतील वरीष्ठ अधिकाऱ्यांनी शासनाच्या मार्गदर्शक सूचनेप्रमाणे आवश्यक उपाययोजना कराव्यात असे निर्देश जिल्हाधिकारी तथा जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे अध्यक्ष डॉ.राजेंद्र भारुड यांनी दिले आहेत. सर्व उपविभागीय अधिकारी, शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता, जिल्हा शल्य चिकीत्सक, कार्यकारी अभियंता,जिल्हा आरोग्य अधिकारी, तहसिलदार, मुख्याधिकारी, ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधिक्षक यांनी कोविड रुग्णालय आणि कोविड केअर सेंटर इमारतीची तपासणी करुन त्यामध्ये रुग्णांसाठी आवश्यक साहित्य हे कुठल्याही क्षणी वापरता येतील अशा स्थितीत आणून ठेवण्याबाबत कार्यवाही करावी. ...
Read More
