नंदुरबार (जिमाका वृत्तसेवा) :  राज्याचे आदिवासी विकासमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री ॲड.के.सी.पाडवी यांच्या प्रयत्नाने लक्कडकोटमार्गे शहादा-खेतिया बससेवा प्रायोगिक तत्वावर सुरू करण्यात आली आहे. ॲड.पाडवी यांनी परिवहन मंत्री  ॲड.अनिल परब यांना पत्र लिहून  शिरपूर व शहादा येथून लक्कडकोटमार्गे तोरणमाळपर्यंत बससेवा सुरू होण्याबाबत शिफारस केली होती.

विभाग नियंत्रक राज्य परिवहन धुळे यांनी  मंत्री महोदयांच्या कार्यालयास कळविल्यानुसार शहादा येथून  सकाळी 8.30, सकाळी 11.30 आणि  दुपारी 14.30 वाजता बस सुटेल आणि ती अनुक्रमे सकाळी  9.40, दुपारी 12.20 आणि दुपारी 15.40 वाजता खेतिया येथे पोहोचेल.

खेतिया येथून सकाळी 9.50,  दुपारी 12.30 आणि दुपारी 15.50 वाजता बस सुटेल आणि ती अनुक्रमे सकाळी 11.00, दुपारी 13.40 आणि सायंकाळी 17.00 वाजता शहादा येथे पोहोचेल. या दोन्ही बसेस लक्कडकोटमार्गे जातील. बस सुरू झाल्याने या भागातील नागरिकांना वाहतूकीसाठी  चांगली सोय उपलब्ध होणार आहे.