Author: Ramchandra Bari

शासकीय वसतीगृहासाठी प्रवेश प्रक्रीया सुरू

नंदुरबार (जिमाका वृत्तसेवा) : राज्य शासनाच्या सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग व सहायक आयुक्त समाज कल्याण कार्यालय नंदुरबार यांच्यामार्फत जिल्ह्यात गुणवंत मागासवर्गीय मुलांचे शासकीय वसतीगृह नंदुरबार, होळ तर्फे हवेली येथील मागासवर्गीय मुलींचे वसतीगृह आणि शहादा येथील मागासवर्गीय मुलांच्या वसतीगृहासाठी प्रवेश प्रक्रीया सुरू करण्यात आली आहे.             वसतीगृहात मागासवर्गीय विद्यार्थी-विद्यार्थीनींना विनामुल्य प्रवेश देण्यात येतो. प्रवेशित विद्यार्थ्यांना दोन वेळेचे जेवण, सकाळी नाश्ता, मोफत वह्या व पुस्तके आणि शासनामार्फत दरमहा 600 रुपये निर्वाह भत्ता अदा करण्यात येतो.             प्रवेश घेऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांनी संबंधित वसतीगृहाच्या ठिकाणी कार्यालयीन वेळेत अर्ज उपलब्ध करून घ्यावा. परिपूर्ण भरलेल्या अर्जासह शाळा सोडल्याचा दाखला, गुणपत्रक, उत्पन्नाचा दाखला, जातीचा...

Read More

विसरवाडी ग्रामपंचायतीला जिल्हास्तरीय आर.आर.पाटील सुंदरगाव पुरस्कार

नंदुरबार (जिमाका वृत्तसेवा) : राज्याचे माजी उपमुख्यमंत्री स्व.आर.आर.(आबा) पाटील यांच्या पुण्यतिथीचे औचित्य साधून जिल्हा परिषद अध्यक्षा ॲड.सीमा वळवी यांच्या हस्ते स्व.आर.आर.(आबा) पाटील जिल्हास्तरीय सुंदरगाव पुरस्कार 2019-2020 चे वितरण  करण्यात आले. विसरवाडी ग्रामपंचायतीला जिल्हास्तरीय पुरस्कार  प्रदान करण्यात आला. कार्यक्रमाला मुख्य कार्यकारी अधिकारी रघुनाथ गावडे, समाज कल्याण  सभापती रतन पाडवी, शिक्षण व आरोग्य सभापती जयश्री पाटील, महिला व बालविकास सभापती निर्मला राऊत, कृषि व पशुसंवर्धन सभापती अभिजित पाटील, पंचायत समिती सभापती रतिलाल कोकणी, बायजाबाई भील, उपमुख्य कार्यकारी अधिकारी शेखर रौंदळ आदी उपस्थित होते. लोकसहभागातून चांगले कामे केल्यास सुंदर गावे निर्माण करता येतील. गावात स्वच्छता अभियान राबवून गाव सुंदर करण्याचा प्रयत्न करावा,...

Read More

शिवजयंती साजरी करण्यासाठी मार्गदर्शक सूचनांचे पालन करण्याचे आवाहन

नंदुरबार (जिमाका वृत्तसेवा) : कोविड-19 मुळे उद्भवलेल्या संसर्गजन्य परिस्थितीचा विचार करता छत्रपती शिवाजी महाराज जयंती साध्या पद्धतीने साजरी करावी आणि शासनाने दिलेल्या मार्गदर्शक सूचनांचे काटेकोरपणे पालन करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भारुड यांनी केले आहे.             19 फेब्रुवारी रोजी छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती महाराष्ट्रभर मोठ्या प्रमाणात साजरी केली जाते. या दिवशी विविध कार्यक्रमांचे आयोजन केले जाते. परंतु यावर्षी कोरोनाच्या प्रार्श्वभूमीवर शिवजयंती साजरी करतांना कोणत्याही प्रकारे सार्वजनिक ठिकाणी पोवाडे, व्याख्यान, गाणे, नाटक इत्यादींचे सादरीकरण अथवा सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येऊ नये. त्याऐवजी सदर कार्यक्रमाचे केबल नेटवर्क अथवा ऑनलाईन प्रेक्षपण उपलब्ध करुन देण्याबाबत व्यवस्था करण्यात यावी.             यादिवशी कोणत्याही...

Read More

सामाजिक उत्तरदायित्व निधीतून जिल्ह्यासाठी 5 रुग्णवाहिका प्राप्त

नंदुरबार (जिमाका वृत्तसेवा) : माझगाव डॉकच्या सामाजिक दायित्व निधीतून जिल्ह्याच्या ग्रामीण भागासाठी 5 रुग्णवाहिका प्राप्त झाल्या आहेत. या रुग्णवाहिका जिल्हाधिकारी डॉ.राजेंद्र भारुड आणि माझगाव डॉकच्या सामाजिक दायित्व निधीचे उपव्यवस्थापक रोहीत पांन्ड्या यांच्या उपस्थितीत जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागाकडे सुपूर्द करण्यात आल्या.             यावेळी जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.नितीन बोडके, जिल्हा नियोजन अधिकारी योगेंद्र चौधरी, अतिरिक्त जिल्हा नियोजन अधिकारी राहुल पवार आदी उपस्थित होते.             यावेळी बोलताना डॉ.भारुड म्हणाले, आकांक्षित जिल्हा कार्यक्रमांतर्गत जिल्ह्यातील आरोग्यसुविधा अधिक सक्षम करण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे. सामाजिक दायित्व निधीतून यापूर्वी 11 रुग्णवाहिका देण्यात आल्या असून या 5 रुग्णवाहिकांमुळे ग्रामीण भागातील रुग्णांना चांगली सेवा देता येईल. दुर्गम भागातील...

Read More

अनुसूचित जमातीच्या विद्यार्थ्यांसाठी पहिली व दुसरीसाठी प्रवेश प्रक्रिया

नंदुरबार (जिमाका वृत्तसेवा) : एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प तळोदा अंतर्गत येणाऱ्या तळोदा, अक्कलकुवा व धडगाव या तीन तालुक्यातील अनुसूचित जमातीच्या विद्यार्थ्यांना 2021-2022 या शैक्षणिक वर्षांत शहरातील इंग्रजी माध्यमाच्या नामांकित निवासी शाळेत पहिली व दुसरीच्या वर्गात प्रवेशासाठी 16 फेब्रुवारी 2021 पासून प्रवेश अर्ज वितरित करण्यात येत आहेत. एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प तळोदा, गट शिक्षणाधिकारी, गटसाधन केंद्र पंचायत समिती तळोदा, अक्कलकुवा व धडगांव या ठिकाणी सुट्टीचे दिवस वगळून कार्यालयीन वेळेत विनामुल्य मिळतील. प्रवेश अर्ज 5 मार्च 2021 पर्यंत स्विकारण्यात येतील, त्यानंतर आलेले अर्ज स्विकारले  जाणार नाहीत. विद्यार्थी अनुसूचित जमातीचा असावा. रहिवासी दाखला, उत्पन्नाचा दाखला, पालक किंवा विद्यार्थ्याच्या नावे सक्षम अधिकाऱ्याने दिलेल्या जातीचा दाखल्याची साक्षांकित प्रत जोडावी. दारिद्र्यरेषेच्या दाखल्याची सत्यप्रत, अनाथ,अपंग, असल्यास सक्षम दाखला जोडावा.  विद्यार्थ्याचे पालक शासकीय,निमशासकीय सेवेत नसल्याबाबत पालकांचे प्रतिज्ञापत्र जोडावे. महिला पालक विधवा,घटस्फोटीत, निराधार, परितक्त्या असल्यास ग्रामपंचायतीचा दाखला. विद्यार्थी अनाथ असल्यास आई व वडीलांचे मृत्यू प्रमाणपत्र, पहिलीत प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्याचे वय  6 वर्ष  पुर्ण असावे त्याचा जन्म 1 ऑक्टोंबर 2014 ते 30 सप्टेंबर 2015 या दरम्यान झालेला असावा.  अर्जासोबत 2 पासपोर्ट फोटो आणि जन्म तारखेचा पुरावा म्हणुन ग्रामसेवक, नगरपालिका यांचा (ऑनलाईन) दाखला जोडावा. अर्जासोबत विद्यार्थ्याचे, वडीलांचे व आईचे आधार कार्डची साक्षांकित प्रत जोडावी. अर्जासोबत विद्यार्थ्याचे वैद्यकिय प्रमाणपत्र जोडण्यात यावे. विद्यार्थी व पालक यांच्यावर या अटी शर्ती व नियम बंधनकारक राहतील. कागदपत्राची अपुर्णता असल्यास अर्ज अपात्र करण्यात येईल. तसेच शासकीय, निमशासकीय, स्थानिक स्वराज्य संस्था, महामंडळ इत्यादी आस्थापनावर सेवेत असणाऱ्या कर्मचाऱ्यांनी या योजनेचा लाभ घेवू नये. भविष्यात लाभ घेतल्याचे निदर्शनास आल्यास...

Read More

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

error: Content is protected !!