Author: Ramchandra Bari

ग्राहक जागृतीचे विधायक उपक्रम राबवावे-महेश पाटील

नंदुरबार दि. (जिमाका वृत्तसेवा) :  जिल्हा ग्राहक संरक्षण परिषदेच्या सदस्यांनी ग्राहक जागृतीचे विधायक उपक्रम राबवावेत. ग्राहकांची फसवणूक टाळण्यासाठी त्यांना कायद्यातील तरतुदींची माहिती द्यावी, असे आवाहन अपर जिल्हाधिकारी महेश पाटील यांनी केले. जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित जिल्हा ग्राहक संरक्षण परिषदेच्या बैठकीत ते बोलत होते.  बैठकीस अपर पोलीस अधिक्षक विजय पवार, जिल्हा पुरवठा अधिकारी महेश शेलार, सहाय्यक उप प्रादेशिक परिवहन अधिकारी उत्तम जाधव तसेच परिषदेचे अशासकीय सदस्य उपस्थित होते.  बैठकीत व्यापाऱ्यांकडून होणारी शेतकऱ्यांची फसवणूक, वीज देयकाबाबतच्या तक्रारी आणि नंदुरबार शहारातील वाहतुक समस्येविषयी चर्चा करण्यात आली.  व्यापाऱ्यांना शेतमाल विक्री करतांना घ्यावयाच्या खबरदारीबाबत शेतकऱ्यांना जागरुक करावे असेही श्री. पाटील यावेळी म्हणाले. बैठकीत सदस्य वासुदेव...

Read More

लोकशाही दिनाचे आयोजन नाही

नंदुरबार (जिमाका वृत्तसेवा) :जिल्ह्यात कोरोनाचा वाढता संसर्ग लक्षात घेता प्रतिबंधात्मक उपाय म्हणून 1 मार्च 2021 रोजीचा जिल्हास्तरीय लोकशाही दिन जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित होणार नाही.  लोकशाही दिनात अर्ज करावयाचा असल्यास अर्जदारांनी प्रत्यक्ष उपस्थित न राहता आपले तक्रार अर्ज estnandurbar@gmail.com  या ईमेलवर किंवा 9403644685 या व्हॉट्सॲप क्रमांकावर पाठविण्यात यावेत, असे निवासी उपजिल्हाधिकारी सुधीर खांदे यांनी कळविले...

Read More

मतदान व मतमोजणीच्या दिवशी मद्यविक्री अनुज्ञप्त्या बंद

नंदुरबार (जिमाका वृत्तसेवा) : नर्मदा-राजपिपला (गुजरात राज्य) जिल्ह्यात 2021 मध्ये मुदत संपणाऱ्या तसेच नव्याने स्थापित होणाऱ्या जिल्हा पंचायत, तालुका पंचायत तसेच नगरपालिका निवडणुक-2021 कार्यक्रमाच्या अनुषंगाने नंदुरबार जिल्ह्यातील गुजरात राज्यास सिमेलगत असलेल्या  मौजे गव्हाली, पोरंबी, खडकापाणी, उदयपुर, कोराई व खापर ता.अक्क्लकुवा या ठिकाणी  मतदान व मतमोजणीच्या दिवशी मद्य विक्री अनुज्ञप्त्या बंद ठेवण्याचे निर्देश जिल्हाधिकारी डॉ.राजेंद्र भारुड यांनी दिले आहेत. मतदानाच पूर्वीचा एक दिवस 26 फेब्रूवारी 2021 संध्याकाळ 6 वाजेपासून (मतदानाचा दिवस) 28 फेबूवारी संपूर्ण दिवस आणि मतमोजणीचा दिवस 2 मार्च 2021 रोजी संपूर्ण दिवस महाराष्ट्र दारुबंदी कायदा-1949 मधील तरतुदीनुसार नंदुरबार जिल्ह्यातील गुजरात सिमेलगत असलेली वरील गावातील सर्व मद्य विक्री अनुज्ञप्त्या बंद ठेवाव्यात.  आदेशाचे उल्लंघन केल्यास कठोर कारवाई करण्यात येईल, असे आदेशात नमूद करण्यात आले...

Read More

महिला बचत गटांना शेळी गटासाठी अर्ज करण्याचे आवाहन

नंदुरबार (जिमाका वृत्तसेवा)  :  विशेष केंद्रीय सहाय्य योजना 2014-15 अंतर्गत महिला बचत गटांना  शेळी गटाचा पुरवठा करण्यात येणार असून नोंदणीकृत आदिवासी महिला बचत गटांकडून अर्ज मागविण्यात आले आहे. महिला बचत गट अनुसूचित जमातीचा आणि नोंदणीकृत असावा.  अर्जासोबत बचत गट स्थापनेचा ठराव, सदस्यांची यादी, यापूर्वी इतर योजनेतून लाभ न घेतल्याचा दाखला, वाड्यासाठी जागा उपलब्ध असल्याचा दाखला, ग्रामसभा ठराव,  प्रत्येक सदस्याचे पासपोर्ट छायाचित्र, आधार क्रमांक, गटाचे बँक खाते क्रमांक, गटातील सदस्यांचे दारिद्र्य रेषेखालील असल्याचा दाखला, जातीचा दाखला जोडणे आवश्यक आहे. एका सदस्याच्या नावे जागेचा सातबारा असणे आवश्यक आहे. इच्छुक गटांनी एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प कार्यालय नंदुरबार येथे  5 मार्च 2021 पर्यंत कार्यालयीन वेळेत अर्ज सादर करावा, असे आवाहन  प्रकल्प अधिकारी वसुमना पंत यांनी केले...

Read More

आदिवासी बचत गटांना पोल्ट्री फार्म व्यवसायासाठी अर्ज सादर करण्याचे आवाहन

नंदुरबार (जिमाका वृत्तसेवा)  : विशेष केंद्रीय सहाय्य योजना 2017-18 अंतर्गत आदिवासी पुरुष व महिला बचत गटांकडून पोल्ट्री फार्म व्यवसायासाठी अर्थसहाय्य योजनेचा लाभ देण्यासाठी अर्ज मागविण्यात आले आहेत.  पोल्ट्री फॉर्म व्यवसायासाठी बचत गटातील सर्व सदस्य अनुसूचित जमातीचे असावे. बचत गट नोंदणीकृत असावा. अर्जासोबत बचत गट स्थापनेचा ठराव, सदस्याची यादी, गटातील सदस्याचे जातीचे दाखले, रहिवासी दाखले, फोटो, आधार कार्ड, सर्व सदस्यांचा दारिद्र्य रेषेखालील उत्पन्न दाखला (2 लाखाच्या आतील) जमीनीचा सातबारा उतारा, बचत गटाच्या बॅंक पासबुकाची झेरॉक्स प्रत, बँकेचे 6 महिन्याचे स्टेटमेंट, बचत गटास जमीन 5 वर्षेसाठी वापरण्यास देत असल्याबाबत जमीन मालक व बचत गटातील सदस्य यांचे 100 रुपये स्टॅम्प पेपरवर हमीपत्र, तसेच यापूर्वी इतर कोणत्याही योजनेचा लाभ घेतला नसल्याचे ग्रामपंचायतीचा दाखला किंवा स्वयंघोषणापत्र, पोल्ट्री फॉर्म भाड्याने देणार नाही किंवा विकणार नसल्याचे हमीपत्र, देखभाल दुरुस्तीबाबत हमीपत्र सादर करावे.  गटातील किमान एका लाभार्थ्यांकडे स्वत:च्या नावे किमान अर्धा एकर जमीन, बारमाही पाणी, वीज आणि चार चाकी मोठे वाहन जाईल असा रस्ता इत्यादी सुविधा असणे आवश्यक राहील. पात्र लाभार्थ्यांनी 5 मार्च 2021 पर्यंत (कार्यालयीन वेळ 10 ते 6 वाजेपर्यंत ) एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प कार्यालय, नवापूर रोड नंदुरबार येथे अर्ज सादर करावे, असे आवाहन प्रकल्प अधिकारी वसुमना पंत यांनी केले...

Read More

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

error: Content is protected !!