Author: Ramchandra Bari

महाडीबीटी पोर्टलवर शिष्यवृत्ती अर्ज सादर करावे

नंदुरबार (जिमाका वृत्तसेवा)  : जिल्ह्यातील शिष्यवृत्तीसाठी पात्र विद्यार्थ्यांनी महाडीबीटी पोर्टलवर शिष्यवृत्तीचे अर्ज सादर करावेत, असे आवाहन सहायक आयुक्त सुदंरसिंग वसावे यांनी केले आहे. सन 2020-2021 शैक्षणिक वर्षासाठी महाडीबीटी पोर्टल 3 डिसेंबर 2020 पासून सुरु करण्यात आले आहे. प्रवेशित अनुसूचित जाती, इतर मागास प्रवर्ग, विजाभज, विशेष मागास प्रवर्गातील विद्यार्थ्यांनी  तसेच जिल्ह्यातील सर्व महाविद्यालय, विद्यार्थी, पालक यांनी  पात्र विद्यार्थ्यांचे मॅट्रीकोत्तर शिष्यवृत्ती, शिक्षण शुल्क, परिक्षा शुल्क योजनेचे नवीन प्रवेशित व नुतनीकरणाचे परिपूर्ण अर्ज महाविद्यालयांनी तपासून 31 मार्च 2021 पर्यत कार्यालयाकडे ऑनलाईन सादर...

Read More

आरोग्य निर्देशांकात सुधारणेबाबत कार्यशाळा संपन्न

नंदुरबार (जिमाका वृत्तसेवा) :  जिल्हा परिषदेचा आरोग्य विभाग आणि पिरामल स्वास्थ्यच्या संयुक्त विद्यमाने अक्कलकुवा आणि धडगाव तालुक्यासाठी आकांक्षित जिल्हा कार्यक्रमांतर्गत निती आयोगाच्या आरोग्य निर्देशांकात सुधारणा करण्याबाबत कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले. पिरामल स्वास्थ्यच्या राज्य व्यवस्थापक रंजना पांडे यांनी माता मृत्यूदर कमी करणे, बालक आणि गरोदर महिलांचे पोषण, आरोग्य सुविधांची गुणवत्ता याबाबत मार्गदर्शन केले. कार्यशाळेला ग्रामीण भागातील प्रतिष्ठीत नागरिक, दुर्गम पाड्यातील कार्यशील महिला, समाज प्रेरक, आदिवासी युवक-युवती  उपस्थित होते. दोन्ही तालुक्यांच्या 60 गावातील 80 प्रतिनिधी कार्यशाळेला उपस्थित होते. गर्भवती मातेच्या नोंदणीचे महत्व, अतिसाराची कारणे आणि उपचार, संस्थात्मक प्रसूतीचे फायदे आणि स्तनपान या प्रमुख विषयावर यावेळी मार्गदर्शन करण्यात आले. तसेच आरोग्य विभागातील...

Read More

अत्याधुनिक शस्त्रक्रीया कक्षाचे जिल्हाधिकाऱ्यांच्या हस्ते उद्घाटन

नंदुरबार (जिमाका वृत्तसेवा) :  जिल्हा शासकीय रुग्णालय येथे मणक्यांवरील शस्त्रक्रीयेसाठी स्पाईन  फाऊंडेशनतर्फे सामाजिक दायित्व निधीतून तयार करण्यात आलेल्या अत्याधुनिक शस्त्रक्रीया कक्षाचे उद्घाटन जिल्हाधिकारी डॉ.राजेंद्र भारुड यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी जिल्हा शल्य चिकीत्सक डॉ.रघुनाथ भोये, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.नितीन बोडके, स्पाईन फाऊंडेशनचे मुख्य विश्वस्त डॉ.शेखर भोजराज, विश्वस्त डॉ.प्रेमिक नगाड, लायन्स क्लबचे अध्यक्ष डॉ. राजेश कोळी  आदी उपस्थित  होते. स्पाईन फाऊंडेशनतर्फे या शस्त्रक्रीया कक्षासाठी 45 लाख रुपये खर्च करण्यात आला असून त्यात सर्व प्रकारच्या अत्याधुनिक सुविधा आहेत. मोठ्या शहरात उपलब्ध असणारी मणक्यांच्या ऑपरेशनची सुविधा आता नंदुरबार येथे उपलब्ध होणार असून  फाऊंडेशनचे तज्ज्ञ डॉक्टरांची सेवा मोफत उपलब्ध होणार आहे. यावेळी लायन्स...

Read More

शाळाबाह्य मुलांच्या शिक्षणासाठी पालकांचे समुपदेशन करावे-डॉ.राजेंद्र भारुड

नंदुरबार (जिमाका वृत्तसेवा)  :  शाळाबाह्य मुलांचे सर्वेक्षण करून शाळेत न येणाऱ्या मुलांच्या शिक्षणाबाबत पालकांचे समुपदेशन करावे. स्थलांतरीत मुलांची नोंद करून अशी मुले शिक्षणापासून वंचित राहू नये यासाठी विशेष प्रयत्न करावे, असे निर्देश जिल्हाधिकारी डॉ.राजेंद्र भारुड यांनी केले. जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित  शाळाबाह्य, स्थलांतरीत, अनियमित मुलांना शाळेच्या प्रवाहात आणण्यासाठी जिल्हास्तरीय समितीच्या बैठकीत ते बोलत होते. बैठकीस मुख्य कार्यकारी अधिकारी रघुनाथ गावडे, अपर पोलीस अधीक्षक विजय पवार, सहायक जिल्हाधिकारी अविष्यांत पंडा आदी उपस्थित होते. डॉ.भारुड म्हणाले,  वीटभट्टी आणि ऊसतोडणी कामगाराच्या मुलांच्या शिक्षणाबाबत माहिती संकलीत करण्यात यावी. आश्रमशाळेत न आलेल्या मुलांची नोंद घेऊन त्यांच्या पालकांची भेट घेण्याचा प्रयत्न करावा. स्थलांतरीत पालकांची नोंद घ्यावी. त्यांच्याशी संपर्क करून मुलांना शाळेत पाठविण्याबाबत समुपदेशन करावे. 50 टक्क्यापेक्षा कमी उपस्थिती असलेल्या शाळेतील विद्यार्थ्यांच्या पालकांची भेट घेऊन मुलांना शाळेत पाठविण्याबाबत त्यांच्या समस्या जाणून घ्याव्यात. धडगाव आणि अक्कलकुवा तालुक्यातील दुर्गम भागातील  प्राथमिक शाळा सुरु करण्याबाबत नियोजन करण्याचे निर्देश जिल्हाधिकाऱ्यांनी दिले. ते म्हणाले, दुर्गम भागात इंटरनेटची सुविधा नसल्याने मुलांचे ऑनलाईन शिक्षण होऊ शकत नाही. या भागातील मुलांचे शैक्षणिक नुकसान होत आहे. त्यामुळे कोरोनाविषयक नियमांचे पालन करून शाळा सुरू करण्याचे नियोजन करावे. शाळा वर्गखोल्यांची कामे 15 मार्चपर्यंत पूर्ण करावीत. पुढील वर्षासाठी आवश्यक वर्गखोल्यांसाठी तातडीने प्रस्ताव सादर करावे. दुर्गम भागात 50 पेक्षा अधिक विद्यार्थी असूनही वर्गखोली नसलेल्या शाळांना प्राधान्य देण्यात यावे. शाळेच्या इमारती आणि परिसर सुंदर करण्याचा प्रयत्न करावा, असे त्यांनी...

Read More

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

error: Content is protected !!