नंदुरबार (जिमाका वृत्तसेवा)  :  विशेष केंद्रीय सहाय्य योजना 2014-15 अंतर्गत महिला बचत गटांना  शेळी गटाचा पुरवठा करण्यात येणार असून नोंदणीकृत आदिवासी महिला बचत गटांकडून अर्ज मागविण्यात आले आहे.

महिला बचत गट अनुसूचित जमातीचा आणि नोंदणीकृत असावा.  अर्जासोबत बचत गट स्थापनेचा ठराव, सदस्यांची यादी, यापूर्वी इतर योजनेतून लाभ न घेतल्याचा दाखला, वाड्यासाठी जागा उपलब्ध असल्याचा दाखला, ग्रामसभा ठराव,  प्रत्येक सदस्याचे पासपोर्ट छायाचित्र, आधार क्रमांक, गटाचे बँक खाते क्रमांक, गटातील सदस्यांचे दारिद्र्य रेषेखालील असल्याचा दाखला, जातीचा दाखला जोडणे आवश्यक आहे. एका सदस्याच्या नावे जागेचा सातबारा असणे आवश्यक आहे.

इच्छुक गटांनी एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प कार्यालय नंदुरबार येथे  5 मार्च 2021 पर्यंत कार्यालयीन वेळेत अर्ज सादर करावा, असे आवाहन  प्रकल्प अधिकारी वसुमना पंत यांनी केले आहे.