नंदुरबार (जिमाका वृत्तसेवा) राज्यातील युवक-युवतींना उद्योगाच्या मागणीवर आधारीत कौशल्य प्रशिक्षण पुरविण्यासाठी 31 जुलै 2023 पर्यंत “कौशल्याची मागणी सर्व्हेक्षण” मोहीम राबविण्यात येत असल्याची माहिती कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता सहाय्यक आयुक्त विजय रिसे यांनी प्रसिद्धी पत्रकान्वये दिली आहे.

राज्यातील युवक-युवतींना आवश्यक असलेले आणि त्यांनी मागणी केलेले कौशल्य प्रशिक्षण प्रदान केल्यास उमेदवारांच्या प्रशिक्षणादरम्यान स्वरस्यामध्ये वृद्धी करून अनुपस्थितीचे प्रमाण कमी करण्यासाठी तसेच प्रशिक्षणामध्ये यशस्वी उमेदवारांना रोजगार-स्वयंरोजगाराच्या अधिक प्रमाणात संधी उपलब्ध होण्यासाठी सदर मोहीमेंतर्गत सर्व्हेक्षणासाठी गुगल फॉर्म https://:forms.gle/kYtSxbhrZ2s7z6q8 या लिंकवर उपलब्ध करून दिला आहे. हा फॉर्म जिल्ह्यातील शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था, तंत्रनिकेतन, कनिष्ठ व वरिष्ठ महाविद्यालयातील विविध शाखेतील विद्यार्थी शालेय/महाविद्यालयीन शिक्षणातुन गळती झालेले/शिक्षण सोडलेले/नोकरीच्या शोधात असलेले उमेदवार,समाजातील वंचित घटकातील उमेदवारांनी भरावयाचा आहे.

सर्व उमेदवार/लाभार्थी/विद्यार्थी यांना आवाहन करण्यात येते की, आपल्याला आवश्यक असलेल्या कौशल्याची माहिती वरील गुगल फॉर्म लिंक भरण्यात यावी. अधिक माहितीसाठी जिल्हा कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता कार्यालय नंदुरबार येथे प्रत्यक्ष किंवा दूरध्वनी क्र.02564-295801 वर संपर्क साधावा, असेही विजय रिसे यांनी कळविले आहे.