Author: Ramchandra Bari
वडाळी येथे एकाच परिवारातील ३ बालकांना डेंग्यू
Posted by Ramchandra Bari | Mar 8, 2021 | आरोग्य, व्हिडीओ |
तहसील कार्यालयात महिला दिन साजरा
Posted by Ramchandra Bari | Mar 8, 2021 | दिनविशेष, शासकीय |
नंदुरबार (जिमाका वृत्तसेवा) : महिला दिनानिमित्त नंदुरबार तहसील कार्यालयात सहायक जिल्हाधिकारी वसुमना पंत यांच्या हस्ते विविध पुरस्काराचे वितरण करण्यात आले. यावेळी तहसीलदार भाऊसाहेब थोरात, पोलीस निरीक्षक सुनिल नंदवाडकर आणि तहसील कार्यालयातील अधिकारी-कर्मचारी उपस्थित होते. श्रीमती पंत यांच्या हस्ते राष्ट्रीय मतदार दिनानिमित्त घेण्यात आलेल्या विविध स्पर्धांमधील यशस्वी विद्यार्थींनींना पुरस्कारांचे वितरण करण्यात आले. उत्तम कामगिरी करणाऱ्या महिला मतदान केंद्रस्तरीय अधिकाऱ्यांना यावेळी गौरविण्यात आले. तसेच विविध क्षेत्रात चांगली कामगिरी करणाऱ्या 8 महिलांचा सत्कार करण्यात आला. महिला मतदारांना मतदार ओळखपत्राचे वाटपदेखील यावेळी करण्यात आले. महिलांनी आपल्या कार्यक्षेत्रात खंबीरपणे वावरण्याची आणि स्वावलंबी होण्याची गरज असल्याचे श्रीमती पंत यांनी यावेळी...
Read Moreजिल्हाधिकारी कार्यालयात महिला कर्मचाऱ्यांसाठी स्वतंत्र कक्ष जिल्हाधिकाऱ्यांकडून महिला दिनाची भेट
Posted by Ramchandra Bari | Mar 8, 2021 | दिनविशेष, शासकीय |
नंदुरबार (जिमाका वृत्तसेवा) :जिल्हाधिकारी कार्यालयात महिला कर्मचाऱ्यांसाठी लवकरच स्वतंत्र कक्ष तयार करण्यात येणार आहे. जिल्हाधिकारी डॉ.राजेंद्र भारुड यांनी महिला दिनानिमित्त जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित कार्यक्रमात ही घोषणा केली. कार्यक्रमाला अपर जिल्हाधिकारी महेश पाटील, सहायक जिल्हाधिकारी वसुमना पंत, निवासी उपजिल्हाधिकारी सुधीर खांदे, तहसीलदार उल्हास देवरे आदी उपस्थित होते. डॉ.भारुड म्हणाले, या कक्षात महिला कर्मचाऱ्यांना भोजनाच्यावेळी एकत्र येऊन विचारांची देवाणघेवाण करता येईल. कक्षात पिण्याचे शुद्ध पाणी व इतर आवश्यक सुविधा देण्यात येतील. कक्षाची रचना महिला कर्मचाऱ्यांच्या सूचनेनुसार करण्यात येईल. कार्यालय स्वच्छ व सुंदर ठेवण्यासाठी महिलांनी पुढाकार घ्यावा, असे आवाहन त्यांनी केले. श्री.पाटील म्हणाले, महिला दिन एक दिवस साजरा न करता वर्षभरात महिला...
Read Moreजिल्ह्यातील 1430 प्राथमिक शाळा सुरू
Posted by Ramchandra Bari | Mar 8, 2021 | शैक्षणिक |
नंदुरबार (जिमाका वृत्तसेवा) :जिल्हाधिकारी डॉ.राजेंद्र भारुड यांनी दिलेल्या निर्देशानुसार जिल्ह्यातील पहिली ते चौथीच्या 1506 शाळांपैकी 1430 शाळा सुरू करण्यात आल्या आहेत. शहरी भागातील 76 शाळा सुरू करण्यात आलेल्या नाहीत. अक्कलकुवा आणि धडगाव तालुक्यातील तसेच जिल्ह्यातील नंदुरबार, शहादा, तळोदा आणि नवापूरचा शहरी भाग वगळता ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये यासाठी शाळा सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. त्यानुसार शिक्षण विभागाने कोरोनाविषयक आवश्यक खबरदारी घेऊन शाळा सुरू करण्यासाठी आवश्यक कार्यवाही केली आहे. नंदुरबार तालुक्यात 14 केंद्रातील 190, नवापूर 19 केंद्रातील 254, शहादा 18 केंद्रातील 242, तळोदा 9 केंद्रातील 132, अक्कलकुवा 19 केंद्रातील 323 आणि धडगाव तालुक्यात 14...
Read More