नंदुरबार (जिमाका वृत्तसेवा) : महिला दिनानिमित्त नंदुरबार  तहसील कार्यालयात सहायक जिल्हाधिकारी वसुमना पंत यांच्या हस्ते विविध पुरस्काराचे वितरण करण्यात आले.

यावेळी तहसीलदार भाऊसाहेब थोरात, पोलीस निरीक्षक सुनिल नंदवाडकर आणि तहसील कार्यालयातील अधिकारी-कर्मचारी उपस्थित होते.

श्रीमती पंत यांच्या हस्ते राष्ट्रीय मतदार दिनानिमित्त घेण्यात आलेल्या विविध स्पर्धांमधील यशस्वी विद्यार्थींनींना पुरस्कारांचे वितरण करण्यात आले. उत्तम कामगिरी करणाऱ्या महिला मतदान केंद्रस्तरीय अधिकाऱ्यांना यावेळी गौरविण्यात आले. तसेच विविध क्षेत्रात चांगली कामगिरी करणाऱ्या 8 महिलांचा सत्कार करण्यात आला. महिला मतदारांना मतदार ओळखपत्राचे  वाटपदेखील यावेळी करण्यात आले.

महिलांनी आपल्या कार्यक्षेत्रात खंबीरपणे वावरण्याची आणि स्वावलंबी होण्याची गरज असल्याचे श्रीमती पंत यांनी यावेळी सांगितले.