Author: Ramchandra Bari

जिल्हास्तर युवा पुरस्कारासाठी अर्ज करण्याचे आवाहन

नंदुरबार (जिमाका वृत्तसेवा) :    जिल्ह्यातील युवांनी केलेल्या समाजहिताच्या कार्याचा गौरव व्हावा व युवा विकासाचे कार्यकरण्यासाठी प्रोत्साहन मिळावे यासाठी शासनामार्फत जिल्हास्तरावर एक युवक, एक युवती, एक नोंदणीकृत संस्थेला जिल्हा युवा पुरस्कार देण्यात येतो. सन 2018-2019, 2019-2020 व 2020-2021 या तीन वर्षाकरीता जिल्हा युवा पुरस्कार देण्यात येणार असून पुरस्कारासाठी अर्जदार युवक, युवतीचे वय पुरस्कार वर्षातील 1 एप्रिल रोजी 13 वर्ष पूर्ण व 31 मार्च रोजी 35 वर्ष पर्यंत असावे. दोन्ही पुरस्कारासाठी अर्ज करणाऱ्या युवक,युवती व युवा विकासाचे कार्य करणाऱ्या संस्थांची 1 एप्रिल ते 31 मार्च कालावधीतील गत तीन वर्षाची कामगिरी विचारात घेतली जाईल. अधिक माहिती क्रीडा व युवक सेवा संचालनालयाच्या http://sports.maharashtra.gov.in  या संकेतस्थळावर उपलब्ध असून विहित नमुन्यातील अर्ज 8 ते 18 मार्च 2021 या कालावधीत जिल्हा क्रीडा कार्यालय, जिल्हा क्रीडा संकुल परिसर, खामगांव रोड, साक्री नाका, नंदुरबार येथे कार्यालयीन वेळेत उपलब्ध आहे.( महेंद्र वसावे 7588737628 ). विहित नमुन्यात भरलेला अर्ज व आवश्यक त्या छायांकित कागदपत्रे साक्षांकित करुन , पासपोर्ट फोटो, कार्याची पीपीटी तयार करुन पुस्तिकेच्या स्वरुपात एकत्रित बंद लिफाप्यात 24 मार्च 2021 पर्यंत सादर करावे, असे आवाहन जिल्हा क्रीडा अधिकारी सुनंदा पाटील यांनी केले...

Read More

जिल्हा परिषदेच्या 11 आणि पंचायत समितीच्या 14 सदस्यांचे सदस्यत्व रद्द जिल्हाधिकारी डॉ.राजेंद्र भारुड यांचे आदेश

नंदुरबार (जिमाका वृत्तसेवा) :  सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाप्रमाणे  आणि राज्य निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार मागासवर्ग प्रवर्गामधून निवडून आलेल्या 11 जिल्हा परिषद सदस्यांचे आणि 14 पंचायत समिती सदस्यांचे सदस्यत्व तसेच सदस्यत्व या नात्याने धारण करीत असलेले जिल्हा परिषद, पंचायत समिती व त्याअनुषंगाने इतर प्राधिकरणावरील सदस्यत्व जिल्हाधिकारी डॉ.राजेंद्र भारुड यांनी 4 मार्च 2021 पासून  पूर्वलक्षी प्रभावाने रद्द केले आहे. जिल्हा परिषदेमधुन निवडून आलेले सदस्य कामे भूषण रमेश (8-खापर), चौधरी कपिलदेव  भरत (9-अक्कलकुवा), पाटील अभिजीत मोतीलाल (24-म्हसावद ), पाटील जयश्री दिपक (29-लोणखेडा), पाटील धनराज काशिनाथ (31-पाडळदे बु), सनेर शालिनीबाई भटू (35-कहाटुळ), भारती योगिनी अमोल (38-कोळदे), पाटील शोभा शांताराम (39-खोंडामळी), ॲड. राम चंद्रकांत रघुवंशी (40-कोपर्ली),...

Read More

महासमृद्धी महिला सक्षमीकरण अभियान

नंदुरबार (जिमाका वृत्तसेवा) : ग्रामविकासामध्ये महिला सक्षमीकरण हा महत्त्वाचा विषय असून महिलांना समाजाच्या मुख्य प्रवाहात आणून त्यांचे सामाजिक, आर्थिक, शैक्षणिक, सांस्कृतिक, राजकीय असे सर्वांगीण सक्षमीकरण करणे गरजेचे आहे.  यासाठी शासनामार्फत विविध योजनांच्या माध्यमातून प्रयत्न करण्यात येत आहेत.             ग्रामीण भागातील गरीब व जोखीमप्रवण महिलांच्या शाश्वत उपजीविकेच्या संधी प्राप्त होण्याच्या दृष्टीने पोषक वातावरणाची निर्मिती करण्यासाठी महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान राबविण्यात येत आहे. जागतिक महिला दिनानिमित्त या अभियानांतर्गत स्वयंसहाय्यता समुहांच्या चळवळीची यशस्वी वाटचाल साजरी करण्यासाठी 8 मार्च 2021 ते जागतिक पर्यावरण दिन 5 जून 2021 या कालावधीत महासमृद्धी महिला सक्षमीकरण अभियान राबविण्यात येत आहे.             राज्यातील ग्रामीण महिलांना स्वयं सहाय्यता समूहांद्वारे...

Read More

वंदना राऊत यांच्यामुळे आश्रमशाळेतील मुलींना मिळाली आईची माया

नंदुरबार  – ‘लॉकडाऊन काळात घरी असताना बाईंची खूप आठवण यायची. अशावेळी मोबाईलवर बोलायचो. त्यांच्या सहवासात असल्यावर घरची आठवण येत नाही’….नंदुरबार तालुक्यात कोठली शासकीय आश्रमशाळेतील विद्यार्थीनी वसतीगृह अधीक्षिका वंदना राऊत यांच्या विषयी भरभरून बोलतात. आश्रमशाळेतील वसतीगृहाला त्यांच्यामुळे संस्कारकेंद्राचे स्वरुप प्राप्त झाले आहे.  वंदना राऊत मुळच्या यवतमाळ जिल्ह्यातील पूसद  येथील आहेत. गेल्या 7 वर्षापासून त्या कोठली  येथे कार्यरत आहेत. तशी अधिक्षिकेची भूमिका वसतीगृहातील शिस्त आणि तेथील व्यवस्थेपुरती मर्यादीत असते. मात्र त्यांना आपल्या संवेदनशीलतेची जोड देऊन वंदना यांनी ती अधिक व्यापक केली आहे. त्यांनी सामाजिक कार्य क्षेत्रातील आपल्या अभ्यासाचा कार्यक्षेत्राच्या ठिकाणी चांगला उपयोग केला आहे. कोठली आश्रमशाळेतील 681 विद्यार्थींनींपैकी 560 निवासी असतात....

Read More

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

error: Content is protected !!