महिलांनी सक्षम झाले पाहिजे जिल्हाधिकारी डॉ. भारुड यांचे प्रतिपादन
नंदुरबार (प्रतिनिधी):- “एक चांगली महिला स्वतःच्या परिवार घडवू शकते आणि सर्वच महिला सक्षम झाल्या तर गाव, तालुका, जिल्हा, राज्य आणि देश घडू शकतो, याची जाणीव ठेवून महिलांनी सक्षम झाले पाहिजे”, असे प्रतिपादन नंदुरबारचे जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भारूड यांनी केले. महिलादिन सप्ताहानिमित्त डाएट व शिक्षण विभागातर्फे आयोजित कार्यक्रमप्रसंगी ते बोलत होते.येथील जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था (डाएट) तसेच प्राथमिक व माध्यमिक शिक्षण विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने युट्युब वाहिनीवरून लाईव्ह वेबिनारचे आयोजन करण्यात आले. या वेबिनार मालिकेचे उद्घाटन राज्य शैक्षणिक संशोधन संस्था महाराष्ट्र राज्य पुणेचे उपसंचालक श्री. विकास गरड यांच्या हस्ते करण्यात आले. शबरी मातेच्या जीवनातील श्रीरामभेटीचा प्रसंग वर्णन करून महिला...
Read More
