Author: Ramchandra Bari
बँकांचे खाजगीकरण करन म्हणजे सावकारी प्रकार – माजी मंत्री पद्माकर वळवी यांचा आरोप
Posted by Ramchandra Bari | Mar 18, 2021 | चालू घडामोडी, राजकारण, व्हिडीओ |
वनबंधु कल्याण योजनेची सोडत 22 मार्च रोजी
Posted by Ramchandra Bari | Mar 17, 2021 | शासकीय |
नंदुरबार (जिमाका वृत्तसेवा) : अक्राणी तालुक्यातील 1 लाख रुपयापेक्षा कमी उत्पन्न असलेल्या कुटुंबांना पक्की घरे बांधण्यासाठी वनबंधु कल्याण योजनेंतर्गत सजानिहाय उद्दिष्टानुसार 196 लाभार्थ्यांपैकी 73 लाभार्थ्यांची ईश्वर चिठ्ठीद्वारे अंतिम निवड सोमवार 22 मार्च 2021 रोजी सकाळी 11 वाजता प्रकल्प कार्यालय तळोदा जि.नंदुरबार येथे होणार आहे. सोडतीदरम्यान कोरोना विषाणू संसर्गाच्या पार्श्वभूमीवर सामाजिक अंतराचे पालन करावे. मास्क परिधान करुन निवड झालेल्या पात्र लाभार्थ्यांनी उपस्थित राहावे असे आवाहन एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प अधिकारी तथा सहाय्यक जिल्हाधिकारी अविषांत पंडा (तळोदा) यांनी केले...
Read Moreजिल्ह्यात शस्त्रबंदी व जमावबंदी आदेश जारी
Posted by Ramchandra Bari | Mar 17, 2021 | इतर |
नंदुरबार (जिमाका वृत्तसेवा) : जिल्ह्यातील कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी जिल्हादंडाधिकारी डॉ.राजेंद्र भारुड यांनी मुंबई पोलिस अधिनियम 1951 चे 37 (1) (3) अन्वये 19 मार्च 2021 रोजी सकाळी 6 वाजेपासून ते 2 एप्रिल 2021 रोजीच्या रात्री 12 वाजेपर्यंत शस्त्र व जमावबंदी आदेश जारी केला आहे. सदरचे आदेश लग्नकार्य, मिरवणुका, तालुका आठवडे बाजार किंवा प्रेतयात्रेच्या जमावास लागू राहणार नाहीत. तसेच हा आदेश पोलीस अधिकारी, कामावर असलेल्या इतर शासकीय अधिकारी, कर्मचारी यांना, सभा अगर मिरवणूका काढण्यास रितसर परवानगी घेतली असलेल्या व्यक्तींना लागू नाही. आदेशाचा भंग करणाऱ्याविरोधात कारवाई करण्यात...
Read Moreगुणवंत खेळाडुंसाठी आर्थिक सेवावृत्ती
Posted by Ramchandra Bari | Mar 17, 2021 | क्रीडा |
नंदुरबार (जिमाका वृत्तसेवा) : भारत सरकार युवा आणि क्रीडा मंत्रालयातर्फे गुणवंत खेळाडूकरिता क्रीडा पेन्शनसाठी सुरक्षा पूर्ववत करणे आणि सक्रीय क्रीडा करियरमधून अतिरिक्त आर्थिक सेवानिवृत्ती प्रदान करणे ही एक महत्वाची योजना आहे. ऑलिम्पिक, कॉमनवेल्थ गेम्स, एशियन गेम्स आणि जागतिक स्तरावरील स्पर्धेत उत्कृष्ट कामगिरी केलेल्या खेळाडूंना प्रामुख्याने मदत करणे हा या योजनेचा हेतू आहे. योजनेसाठी अर्जदार खेळाडू हा भारताचा रहिवाशी असावा व त्याने ऑलिम्पिक, पॅराऑलिम्पिक गेम्स, कॉमनवेल्थ गेम्स, एशियन गेम्स व वर्ल्डकप (ऑलिम्पिक व एशियन गेम्स स्पर्धेत समाविष्ट खेळ प्रकार) स्पर्धेत सुवर्ण, रौप्य व कास्य पदक प्राप्त केलेले असावे. या स्पर्धेतील प्राविण्य प्राप्त, गुणवंत खेळाडूस मानधन देण्याची तरतूद केली आहे. तसेच 30 वर्षे किंवा सक्रिय क्रीडा पासून सेवानिवृत्तीची तारीख यापैकी नंतरच्या दिवसापासून पेन्शन देय असेल आणि त्याच्या,तिच्या आयुष्या दरम्यान कायम राहील, परंतु अशी पेन्शन लागू करतांना खेळाडू सक्रिय क्रीडा करियरमधून निवृत्त झाले असतील. ऑलिम्पिक किंवा पॅराऑलिम्पिक स्पर्धेतील प्राविण्य धारक खेळाडूस 20 हजार, सुवर्ण पदक विश्वचषक किंवा विश्व अजिक्यपदस्पर्धेसाठी (ऑलिम्पिक व एशियन गेम्स स्पर्धात समाविष्ट असलेले खेळ प्रकार) 16 हजार, रौप्य व कास्य पदक विश्व चषक स्पर्धेसाठी (ऑलिम्पिंक व एशियन गेम्स स्पर्धात समाविष्ट असलेले खेळ प्रकार 14 हजार, कॉमनवेल्थ गेम्स, एशियन गेम्स, पॅराएशियन गेम्समध्ये सुवर्ण पदकासाठी 14 हजार आणि कॉमनवेल्थ गेम्स, एशियन गेम्स, पॅराएशियन गेम्समधील रौप्य व कास्य पदकासाठी 12 हजार रुपये दरमाह मानधन रक्कम असेल. दर चार वर्षानी आयोजित होणाऱ्या विश्वचषक / विश्व अजिक्यं पदस्पर्धाकरिता सदरची योजना लागू राहील. याबाबत संबधित पात्र खेळाडूंनी आवश्यक त्याकागदपत्रांसह प्रस्ताव केंद्र शासनास सादर करावयाचा...
Read More