सिकलसेल आजारावरील उपचारासाठी निधीची तरतूद- ॲड.के.सी.पाडवी
नंदुरबार – जिल्ह्यातील सातपुडा परिसरात आढळणाऱ्या सिकलसेल आजरावरील उपचारासाठी आवश्यक निधी देण्याविषयीचा प्रस्ताव तयार करण्यात आला असून या आजाराच्या शस्त्रक्रीयेसाठी आवश्यक आर्थिक मदत देण्यासाठी तरतूद करण्यात आली आहे, असे प्रतिपादन राज्याचे आदिवासी विकास मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री ॲड.के.सी.पाडवी यांनी केले. अक्कलकुवा तालुक्यातील जमाना येथे ग्रामीण रुग्णालय आणि आरोग्य विभागातर्फे आयोजित आरोग्य शिबिराच्या उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते. कार्यक्रमाला जि.प.अध्यक्षा सीमा वळवी, माजी मंत्री पद्माकर वळवी, महिला व बालकल्याण सभापती निर्मलाताई राऊत, समाजकल्याण सभापती रतन पाडवी, जि.प.सदस्य सी.के.पाडवी, जान्या पाडवी, जिल्हा शल्य चिकीत्सक डॉ.रघुनाथ भोये, वैद्यकीय अधीक्षक डॉ.शंकर वळवी, वैद्यकीय अधिकारी डॉ.ओंकार वळवी आदी उपस्थित होते. पालकमंत्री पाडवी म्हणाले, सिकलसेल...
Read More
