Author: Ramchandra Bari

दोन बालविवाह थांबविण्यास बाल संरक्षण समितीस यश

नंदुरबार (जिमाका वृत्तसेवा) :  जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी नंदुरबार अंतर्गत जिल्हा बाल सरंक्षण कक्षाला निनावी सुचनेनूसार शहादा तालुक्यातील प्रकाशा येथील अल्पवयीन मुलीचा बालविवाह मु.पाष्टी ता.शिंदखेडा जि.धुळे येथे 12 मे  रोजी तर  नवापूर तालुक्यातील बालाहाट येथील अल्पवयीन मुलीचा बाल विवाह 13 मे होणार असल्याची तक्रार प्राप्त झाली होती त्यावर त्वरीत कार्यवाही करुन या दोन्ही अल्पवयीन मुलीचा बाल विवाह  रोखण्यात जिल्हा बाल संरक्षण समितीस यश आले आहे. प्राप्त सुचनेनूसार जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी साईनाथ वंगारी, जिल्हा बाल संरक्षण अधिकारी उमेश पाडवी, बाल संरक्षण अधिकारी संस्थात्मक गौतम वाघ, यांनी प्रत्यक्ष पालकांची भेट घेऊन त्यांना बालविवाहाचे दुष्पपरिणाम व बालविवाह प्रतिबंधक अधिनियम 2006 याबाबत माहिती देऊन समुपदेशन केले. पालकांकडून ‘मुलगी जोपर्यंत 18 वर्ष वयाची होत नाही तोपर्यंत तिचा विवाह करणार नाही’  तसेच आवश्यकतेनुसार मुलीस समितीसमोर सादर करण्याचे हमीपत्र लिहून सदर मुलीचा बालविवाह थांबविण्यात आला. तसेच दोन्ही पक्षातील वधु व वर माता पिता यांना विश्वासात घेऊन त्यांचे समुपदेशन केले व बालविवाह प्रतिबंध कायद्यातील शिक्षेच्या तरतूदीबाबत माहिती दिली. यावेळी बाल संरक्षण अधिकारी संस्थाबाह्य रेणूका मोघे, जन साहस संस्थेचे जिल्हा समन्व्यक विकास मोरे, संतोष निकुभे, समुपदेशिका अनिता गावीत, ग्रामसेवक, अंगणवाडी सेविकास तसेच गावातील पोलीस पाटील, सरंपच यांनी मोलाचे सहकार्य...

Read More

नवापूर तालुक्यात  25 मे पासून हत्तीरोग दुरीकरण मोहिमेचे आयोजन

नंदुरबार (जिमाका वृत्तसेवा) : जिल्ह्यातील नवापूर तालुक्यात 25 मे ते 5 जून 2022 या कालावधीत हत्तीरोगाच्या दुरीकरणासाठी सामुहिक औषधोपचार मोहिम राबविण्यात येणार असून या मोहिमेचे आरोग्य विभागाने सूक्ष्म नियोजन करून प्रत्येक नागरिकाला डी.ई.सी व अलबेंन्डाझॉलची गोळी देवून मोहिम प्रभावीपणे राबवावी, अशा सूचना जिल्हाधिकारी मनीषा खत्री  यांनी जिल्हा समन्वय समितीची बैठकीत दिल्या. हत्तीरोग प्रतिबंध कार्यक्रमांतर्गत आयोजित मोहिमेनिमित्त जिल्हा समन्वय समितीची बैठक आज संपन्न झाली. त्यावेळी त्या बोलत होत्या. बैठकीस, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ.चारुदत्त शिंदे, अतिरिक्त जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.एन.एल.बावा, जिल्हा हिवताप अधिकारी अपर्णा पाटील, मुख्याधिकारी स्वप्निल मुघलवाडकर, वैद्यकिय अधिक्षक डॉ.शशीकांत  वसावे, उप शिक्षणाधिकारी चंद्रकांत पाटील, तालुका आरोग्य अधिकारी डॉ.मनीषा वळवी, अतिरिक्त...

Read More

जिल्हा परिषद व पंचायत समिती पोटनिवडणूक, आदर्श आचारसंहितेचे काटेकोरपणे पालन करावे : जिल्हाधिकारी मनीषा खत्री

नंदुरबार (जिमाका वृत्तसेवा) : नंदुरबार जिल्हा परिषद आणि पंचायत समिती पोटनिवडणूक 2022 करीता राजकीय पक्षांसह निवडणूक लढविणाऱ्या उमेदवारांनी आदर्श आचारसंहितेचे काटेकोर पालन करावे, असे निर्देश जिल्हाधिकारी मनीषा खत्री यांनी दिले आहेत. जिल्हाधिकारी कार्यालयात पोटनिवडणुकीबाबत संनियंत्रण समितीच्या आयोजित आढावा बैठकीत त्या बोलत होत्या. निवासी उपजिल्हाधिकारी सुधीर खांदे, उपजिल्हाधिकारी नितीन सदगीर, पोलीस निरीक्षक भरत जाधव तसेच विविध विभागाचे अधिकारी व कर्मचारी आदी उपस्थित होते. जिल्हाधिकारी श्रीमती खत्री म्हणाल्या, की संपूर्ण निवडणुकीदरम्यान निवडणूक आचारसंहितेचे कटाक्षाने पालन होईल याकडे सर्व विभागांनी लक्ष द्यावे. यावेळी त्यांनी सोशल मिडिया सेल, पेड न्यूज समिती, सनियंत्रण समिती, शस्त्र जमा करणे आदी विविध विषयांचा आढावा घेतला. जिल्हास्तरावर आचारसंहिता...

Read More

कुटुंब सर्वेक्षणात जैन समाजाची बदनामी, नव्याने सर्वेक्षणाची नंदुरबारात मागणी

नंदुरबार (प्रतिनिधी) – केंद्र शासनाकडून करण्यात आलेल्या कुटुंब आरोग्य सर्वेक्षणात आलेल्या आकडेवारीने जैन समाजाच्या भावना दुखावल्या असून, ही आकडेवारी समाजाची बदनामी करणारी आहे. त्यामुळे नव्याने सर्वेक्षण करून खरी माहिती समोर आणावी, अशी मागणी जैन समाज बांधवांनी केली आहे.याबाबत नंदुरबार जिल्हाधिकारी कार्यालयात देण्यात आलेल्या निवेदनात म्हटले आहे की, केंद्राकडुन राष्ट्रीय कुटूंब आरोग्य सर्वेक्षण ५ चा अहवाल नुकताच जाहीर करण्यात आला. त्यात जैन धर्मीयांत १४.९ % पुरुष, ४.३ % महिला मासांहारी असल्याचे दर्शविण्यात आले आहे. जैन समाज हा शाकाहाराचा पुरस्कर्ता आहे. हे सर्वेक्षण चुकीच्या माहीतीवर आधारीत आहे. जैन समाजाचा त्यावर विश्वास नाही. आमच्यापर्यंत कधीच कोणी माहिती विचारण्यासाठी आलेले नाही. हा जैन...

Read More

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

error: Content is protected !!