Author: Ramchandra Bari

भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त  ‘उज्ज्वल भारत- उज्ज्वल भविष्य’ महोत्सवातंर्गत प्रधानमंत्री नरेंद्र मोदी साधणार ऊर्जा विभागाच्या विविध योजनांच्या लाभार्थ्यांशी संवाद

नंदुरबार (जिमाका वृत्तसेवा) : भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त केंद्र शासनाच्या ऊर्जा मंत्रालय व राज्य ऊर्जा विभागाच्या वतीने आजादी का अमृत महोत्सव अंतर्गत “उज्ज्वल भारत उज्ज्वल भविष्य” पॉवर २०४७ या ऊर्जा महोत्सवाचे आयोजन करण्यात येत आहे. त्यानिमित्त देशाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हे शनिवार 30 जुलै 2022 रोजी सकाळी 11 वाजता देशभरातील ऊर्जा विभागाच्या विविध योजनांच्या लाभार्थ्यासमवेत व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे संवाद साधणार आहेत. या कार्यक्रमाचे बिरसा मुंडा सभागृह, जिल्हाधिकारी कार्यालयात NIC द्वारे थेट प्रक्षेपण केले जाणार आहे. या कार्यक्रमात पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी हे ऊर्जा विभागाच्या विविध योजनांचा लाभ घेतलेल्या देशभरातील निवडक लाभार्थ्यासमवेत व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे संवाद साधणार आहेत. यामध्ये महाराष्ट्रातील नंदूरबार,...

Read More

‘हर घर तिरंगा’ उपक्रमात जिल्हावासियांनी सहभागी व्हावे, जिल्हाधिकारी मनीषा खत्री यांचे आवाहन

नंदुरबार (जिमाका वृत्तसेवा) : भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त जिल्ह्यात 13 ते 15 ऑगस्ट 2022 या कालावधीत ‘हर घर तिरंगा’ उपक्रम राबविण्यात येणार आहे. या उपक्रमांतर्गत जिल्ह्यातील प्रत्येक नागरिकांने आपले घर, इमारतीवर तिरंगा फडकवावा. तसेच सर्व शासकीय, निमशासकीय कार्यालये, विद्यापीठ, महाविद्यालय, शाळा, सर्व दुकाने, आस्थापनांनी या उपक्रम स्वयंस्फूर्तीने सहभागी होऊन हा उपक्रम यशस्वी करावा, असे आवाहन जिल्हाधिकारी मनीषा खत्री यांनी केले आहे. ‘स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव’ अंतर्गत केंद्र व राज्य सरकारच्या सूचनेनुसार ‘घरोघरी तिरंगा’ हा उपक्रम राबविण्याच्या सूचना देण्यात आल्या असून उच्च व तंत्र शिक्षण विभागांतर्गत शासकीय निमशासकीय कार्यालये, विद्यापीठ, महाविद्यालये, वसतिगृह, निवासस्थान, दुकाने, आस्थापनावर 13 ते 15 ऑगस्ट 2022...

Read More

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

error: Content is protected !!