Author: Ramchandra Bari

राष्ट्रीय शिष्यवृत्तीसाठी दिव्यांगानी अर्ज सादर करण्याचे आवाहन

नंदुरबार (जिमाका वृत्तसेवा): केंद्र सरकारच्या दिव्यांग व्यक्ती सबलीकरण विभागाकडून दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी शालांतपुर्व शिष्यवृत्ती, शालांत परीक्षोत्तर (पोस्ट मॅट्रीक) शिष्यवृत्ती व उच्च श्रेणी शिक्षण शिष्यवृत्ती या योजना राबविण्यात येत असून जिल्ह्यातील शाळा, महाविद्यालय व पात्र दिव्यांग विद्यार्थ्यांनी सन 2022-2023 या शैक्षणिक वर्षांसाठी राष्ट्रीय शिष्यवृत्ती पोर्टलवर विहीत मुदतीत अर्ज सादर करावे असे आवाहन जिल्हा परिषदेचे जिल्हा समाज कल्याण अधिकारी डी.जी.नांदगांवकर यांनी केले आहे. दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी शालांतपुर्व शिष्यवृत्तीसाठी 30 सप्टेंबर 2022 पर्यंत विद्यार्थ्यांनी नोंदणी करावी. सदोष अर्ज पडताळणी व संस्था पडताळणीची तारीख 16 ऑक्टोंबर 2022 असेल. शालांत परीक्षोत्तर (पोस्ट मॅट्रीक ) शिष्यवृत्ती व उच्चश्रेणी शिक्षण शिष्यवृत्तीसाठी 31 ऑक्टोंबर 2022 पर्यत विद्यार्थ्यांनी नोंदणी करावी. सदोष अर्ज पडताळणी व संस्था पडताळणीची तारीख 15 नोव्हेंबर 2022 राहील. तरी अधिकाधिक दिव्यांग विद्यार्थ्यांनी शिष्यवृत्तींचा लाभ घेण्यासाठी www.scholarships.gov.in या संकेतस्थळावर विहीत कालावधीत नोंदणी...

Read More

मौजे जयनगर येथे विशेष ग्रामसभेचे आयोजन

नंदुरबार (जिमाका वृत्तसेवा): शहादा तालुक्यातील मौजे जयनगर येथील ग्रामपंचायतीच्या सरपंच श्रीमती. मिनाबाई अंकुश सोनवणे यांचे विरुद्ध दाखल झालेल्या तसेच 25 जुलै 2022 रोजी तीन चतुर्थश मताने मंजूर झालेल्या अविश्वास प्रस्तावाच्या अनुषंगाने जिल्हाधिकारी यांच्या आदेशान्वये उपविभागीय अधिकारी शहादा यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हा परिषद प्राथमिक शाळा जयनगर,ता. शहादा येथे 4 ऑगस्ट 2022 रोजी सकाळी 9 वाजता विशेष ग्रामसभेचे आयोजन करण्यात आले आहे. विशेष ग्रामसभा घेणेकरीता प्रचलित नियमान्वये सभेची गणपुर्ती आवश्यक राहील. आवश्यकता असल्यास सभेच्या दिवशी अविश्वास ठराव संमत करणेकामी शिरगणना करण्याच्या साध्या पद्धतीने मतदान घेण्यात येईल. यासाठी 1 जानेवारी 2022 या अर्हता दिनांकावर आधारीत मतदार यादी ग्राह्य धरुन 5 जानेवारी 2022 रोजी प्रसिद्ध करण्यात आलेली मतदार यादी ग्राह्य धरण्यात येईल. या दिवशी विशेष ग्रामसभेत फक्त अविश्वास ठरावावर चर्चा होईल इतर विषयांवर चर्चा होणार नाही. विशेष ग्रामसभेत उपस्थित राहून शिरगणना पद्धतीने मतदान केलेल्या सदस्यांच्या साध्या बहुमताने अविश्वास ठराव मंजूर झाला असेल तर सदरचा अविश्वास ठराव संमत झाला आहे असे समजण्यात येईल. विशेष ग्रामसभेमध्ये उपस्थित राहून शिरगणना पद्धतीने मतदान केलेल्या सदस्यांच्या साध्या बहुमताने अविश्वास फेटाळला असेल तर सरपंच पद कायम राहील. विशेष ग्रामसभेत कोरोना विषाणु प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर मतदारांनी मास्क लावणे, सामाजिक अंतराचे पालन तसेच सॅनिटायझरचा वापर व अन्य अनुषंगिक बाबींचे पालन करणे आवश्यक असेल. ग्रामसभेमध्ये येतांना ग्रामपंचायतीच्या मतदारांनी सोबत राज्य निवडणूक आयोगाने विहीत केलेल्यापैकी कोणताही ओळखीचा पुरावा सोबत बाळगणे आवश्यक राहील असे उपविभागीय अधिकारी चेतन गिरासे यांनी  एका प्रसिद्धीपत्रकान्वये कळविले...

Read More

विद्युत निरीक्षक कार्यालय नंदुरबार येथे स्थंलातर

नंदुरबार जिमाका वृत्तसेवा): उद्योग उर्जा व कामगार विभागाचे विद्युत निरीक्षक कार्यालय, नंदुरबार हे कार्यालय धुळे येथून 1 जून 2022 पासून नंदुरबार येथे स्थंलातरीत झाले असून या विभागाशी निगडीत कामकाजाकरीता संबंधितांनी खालील पत्त्यावर संपर्क साधावा, असे आवाहन विद्युत निरीक्षक हे.ना.गांगुर्डे यांनी एका प्रसिद्धीपत्रकान्वये केले आहे. संपर्कासाठी कार्यालयाचा पत्ता: विद्युत निरीक्षक यांचे कार्यालय, उद्योग उर्जा व कामगार विभाग नंदुरबार, दुसरा मजला, आशादीप शॉपिंग कॉम्प्लेक्स, लालबाग कॉलनी, धुळे चौफुली, नंदुरबार 424001 ईमेल [email protected] असा...

Read More

सैनिक कल्याण निधीसाठी मदतीचे जिल्हाधिकारी मनीषा खत्री यांचे आवाहन

नंदुरबार, दि.2 (जिमाका वृत्तसेवा) : नंदुरबार जिल्ह्यातील सर्व शाळा, महाविद्यालये, शासकीय, निमशासकीय कार्यालयप्रमुखांनी सैनिक कल्याण निधीस सढळ हाताने मदत करावी, असे आवाहन जिल्हाधिकारी तथा जिल्हा सैनिक कार्यालयाचे अध्यक्षा मनीषा खत्री यांनी प्रसिद्धीस दिलेल्या शासकीय पत्रकान्वये केले आहे. जिल्हाधिकारी श्रीमती.खत्री यांनी म्हटले आहे, देशाला स्वातंत्र्य मिळवून देण्यात स्वातंत्र्य सैनिकांचे योगदान मोलाचे आहे. स्वातंत्र्य प्राप्तीनंतरही देशाच्या संरक्षणासाठी भारतीय सैनिक भूदल, नौदल आणि हवाई दलात कार्यरत असून वेळप्रसंगी प्राणाची आहुती देतात. अशातच सैनिक सेवानिवृत्त होतात. देशातील माजी सैनिकांसाठी विविध कल्याणकारी योजना राबविण्यात येतात. त्यासाठी सात डिसेंबर हा दिवस ध्वज दिन म्हणून पाळण्यात येतो. यानिमित्त 7 डिसेंबर ते 30 नोव्हेंबर या कालावधीत ध्वजनिधी...

Read More

भारतीय लष्कराच्या भरतीसाठी 3 ऑगस्ट पर्यंत अर्ज सादर करण्याचे आवाहन

नंदुरबार (जिमाका वृत्तसेवा) : मुंबई, मुंबई शहर, ठाणे, रायगड,पालघर,नाशिक, नंदुरबार आणि धुळे या आठ जिल्ह्यासाठी आर्मी रिक्रुटमेंट ऑफिस, मुंबई यांच्याकडून 20 सप्टेंबर ते 10 ऑक्टोबर 2022 या कालावधीत लष्कर भरती मेळाव्याचे आयोजन अब्दुल कलाम आझद स्पोर्ट स्टेडियम,कौसा व्हॅली मुंब्रा ठाणे येथे करण्यात आले  आहे. तरी इच्छुक उमेदवारांनी 3 ऑगस्ट 2022 पूर्वी www.joinindianarmy.nic.in  या संकेतस्थळावर अर्ज सादर करावेत,असे अपर जिल्हादंडाधिकारी तथा निवासी उपजिल्हाधिकारी सुधीर खांदे यांनी प्रसिद्धी पत्रकान्वये कळविले...

Read More

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

error: Content is protected !!