जात प्रमाणपत्र पडताळणीचे प्रस्ताव त्वरीत सादर करावे
नंदुरबार (जिमाका वृत्तसेवा) : नंदुरबार जिल्ह्यातील सन 2022-2023 शैक्षणिक वर्षांत 12 वी विज्ञान शाखेतील विद्यार्थ्यांना जात वैधता प्रमाणपत्र सादर करणे अनिवार्य असून त्यासाठी विद्यार्थ्यांनी जात प्रमाणपत्र पडताळणीचे प्रस्ताव त्वरीत जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समितीस सादर करावे, असे प्रतिपादन जिल्हा जात पडताळणी समितीचे अध्यक्ष तथा अपर जिल्हाधिकारी डॉ.अर्जुन चिखले यांनी केले. राष्ट्रनेता ते राष्ट्रपिता सेवा पंधरवडा विशेष मोहिम निमित्त ज.ग.नटावदकर कनिष्ठ महाविद्यालय,नंदुरबार येथे झालेल्या कार्यक्रम प्रसंगी बोलत होते. या कार्यक्रमास समाज कल्याण विभागाचे उपायुक्त राकेश पाटील, पोलीस उपअधिक्षक (दक्षता पथक ) संजय सांगळे, प्राचार्या सौ.सुहासिनी नटावदकर, प्रा.एस.के.चौधरी, प्रा.डी.आर.तांबोळी, प्रा.पी.डी.पाटील आदी उपस्थित होते. यावेळी डॅा.चिखले म्हणाले की, जात वैधता प्रमाणपत्र देण्यासाठी समितीस पुरेसा अवधी मिळावा यासाठी बारावी विज्ञान शाखेतील मागासवर्गीय विद्यार्थ्यांनी पडताळणी समितीकडे अर्ज सादर करावे. विद्यार्थ्यांना जातपडताळणीसाठी आता कार्यालयात येण्याची गरज नसून यासाठी ऑनलाईन अर्ज सादर करुन कागदपत्राच्या पूर्ततेनंतर जातप्रमाणपत्र घरपोच टपालाद्वारे मिळते यासाठी महाविद्यालयातील प्राचार्यांनी व प्राध्यापकांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करावे अशा सूचना त्यांनी दिल्यात. यावेळी त्यांनी विद्यार्थ्यांना ऑनलाईन अर्ज भरतांना ईमेल व मोबाईल नंबर तसेच जातीच्या दाखल्यासंबंधी येणाऱ्या अडचणी व इतर तांत्रिक बाबीसंदर्भात मार्गदर्शन केले. श्री. पाटील यांनी विद्यार्थ्यांना ऑनलाईन अर्ज कसा भरावा,पडताळणी अर्जासोबत कोणते पुरावे व कागदपत्रे जोडावीत याबाबत सखोल मार्गदर्शन केले. यावेळी मान्यवराच्या हस्ते 12 विद्यार्थ्यांना जात वैधता प्रमाणपत्राचे वाटप करण्यात आले. समितीमार्फत आजपर्यंत 5 हजार 118 ऑनलाईन जात वैधता प्रमाणपत्र वितरीत करण्यात आल्याची माहितीही त्यांनी यावेळी दिली. कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रा.गिरीश पवार तर आभार प्रदर्शन प्रा.वर्षा घातकडबी यांनी केले. सेवा पंधरवडानिमित्त दादासाहेब माणिकराव गावीत,सार्वजनिक कनिष्ठ महाविद्यालय, विसरवाडी...
Read More