नंदुरबार (जिमाका वृत्तसेवा) :  सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अखत्यारीतील रस्ता पाळधी-अमळनेर-शिंदखेडा-दोडांईचा-नंदुरबार-धानोरा ते गुजरात राज्य हद्द हा राज्यमार्ग क्रमांक सहावरील 165/650 मधील धानोरा गावाजवळील पुल आज सकाळी 9.30 वाजता कोसळल्यामुळे या मार्गावरील वाहतूक ही पुर्णत: बंद करण्यात आली आहे.

यामार्गावरील वाहतूक नवापूरकडे जाणारी अवजड वाहतुक करणखेडा गावाजवळून धुळवद गावाकडे (रामा-11) वरुन वळविण्यात आली आहे. तर गुजरातकडे जाणारी वाहतुक धानोराकडून नटावद-आर्डीतारा (प्रजिमा-49) मार्गे तर इतर लहान वाहनांसाठी वाहतुक धानोरा गावातून पर्यायी पुलावरुन वळविण्यात आली आहे.

रंका नदीवर करण्यात आलेल्या पुलाचे बांधकाम स्तंभ हे दगडी बांधकामाचे होते. त्यावर आरसीसी स्लॅबचे बांधकाम करण्यात आले होते. दगडी बांधकामातील स्तंभ कोसळल्याने सदर पुल क्षतिग्रस्त झाल्याचे प्रथमदर्शनी आढळुन आले आहे. असे कार्यकारी अभियंता सार्वजनिक बांधकाम विभाग, नंदुरबार यांनी एका प्रसिद्धी पत्रकान्वये कळविले आहे.