Author: Ramchandra Bari

ज्येष्ठ नागरिक दिनानिमित्त आरोग्य शिबीराचे आयोजन

नंदुरबार (जिमाका वृत्तसेवा) : सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग, नंदुरबार आणि सार्वजनिक आरोग्य विभाग, नंदुरबार यांच्या संयुक्त विद्यमाने ‘सेवा पंधरवडा’ विशेष मोहिमेंतर्गत  शनिवार 1 ऑक्टोंबर 2022 रोजी ज्येष्ठ नागरिक दिनाचे औचित्य साधुन नंदुरबार जिल्ह्यात जेष्ठ नागरिकांचे आरोग्य तपासणी शिबीराचे आयोजन करण्यात आले असून या शिबीराचा जिल्ह्यातील सर्व ज्येष्ठ नागरिकांनी लाभ घ्यावा, असे आवाहन समाज कल्याण विभाग आणि सार्वजनिक आरोग्य विभाग, नंदुरबार यांनी केले आहे. तालुकानिहाय शिबीराचे ठिकाण असे : नंदुरबार तालुक्यात जिल्हा रुग्णालय, नंदुरबार, ग्रामीण रुग्णालय,रनाळा, ग्रामीण रुग्णालय,धानोरा, ग्रामीण रुग्णालय, खोंडामळी येथे. नवापूर तालुक्यात उपजिल्हा रुग्णालय, नवापूर, ग्रामीण रुग्णालय, खांडबारा, ग्रामीण रुग्णालय, विसरवाडी, तळोदा तालुक्यात उपजिल्हा रुग्णालय, तळोदा,तर शहादा तालुक्यात ग्रामीण रुग्णालय, म्हसावद, तसेच धडगांव तालुक्यात ग्रामीण रुग्णालय, धडगांव, ग्रामीण रुग्णालय, मोलगी व ग्रामीण रुग्णालय,जमाना येथे शिबीराचे आयेाजन करण्यात आले...

Read More

2 ऑक्टोंबर रोजी जिल्हास्तरीय युवा उत्सवाचे आयोजन युवा उत्सवात अधिकाधिक विद्यार्थ्यांनी सहभागी होण्याचे आवाहन

नंदुरबार (जिमाका वृत्तसेवा) : नेहरु युवा केंद्रामार्फत स्वातंत्र्य संग्रामातील देशभक्तीची भावना, मुल्ये पुन्हा जागृत करणे, राष्ट्रभक्ती, समता, बंधुत्वाची भावना वृध्दींगत करणे आणि तरुण युवा कलावतांना व्यासपीठ निर्माण करुन देण्यासाठी जिल्हास्तरीय युवा उत्सवाचे रविवार 2 ऑक्टोंबर 2022 रोजी नंदुरबार नगरपालिकेतील अटल बिहारी वाजपेयी सभागृहात सकाळी 10 ते 6 वाजेदरम्यान करण्यात आले आहे. तरी या जिल्हास्तरीय युवा उत्सवात अधिकाधिक विद्यार्थ्यांनी सहभागी व्हावे, असे आवाहन नेहरु युवा केंद्राचे जिल्हा युवा अधिकारी अर्थ कौशिक यांनी केले...

Read More

अन्न व औषध प्रशासनाने केली जिल्ह्यातील विविध आस्थापनाची तपासणी

नंदुरबार (जिमाका वृत्तसेवा) : अन्न सुरक्षा व मानके कायद्यातंर्गत सहायक आयुक्त संतोष कांबळे, अन्न सुरक्षा अधिकारी आनंद पवार यांनी नवरात्रोत्सवात उपवासाच्या काळात बहुतांश भाविक साबुदाणा, भगरीचे सेवन मोठया प्रमाणात करत असल्याने यापुर्वी घडलेल्या विषबाधेसारख्या घटना टाळण्यासाठी अन्न व औषध प्रशासनामार्फत जिल्ह्यातील विविध विक्रेत्या व दुकानाची तपासणी करण्यात आली त्यात मे.महालक्षमी किराणा,विसरवाडी, मे.शाम प्रोव्हीजन, विसरवाडी, मे.संतोष किरणा भांडार, नवापूर, मे.अग्रवाल सूपर शॉप, नंदुरबार मे.शांती डिस्ट्रीब्युटर्स, नंदुरबार, मे.रवी सुपर शॉप, नंदुरबार तसेच मे.महेंद्र प्रोव्हीजन,तळोदा, मे.जैन सुपर शॉप,तळोदा येथील दुकाने आस्थापनाची तपासणी करुन भगर,साबुदाणा, तेल,तुपाचे अन्न पदार्थाचे नमुने प्रयोगशाळेत विश्लेषणाकरीता पाठविण्यात आले आहे. विश्लेषण अहवाल प्राप्त झाल्यानंतर त्यांच्यावर कार्यवाही करण्यात येईल. सणासुदीच्या...

Read More

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

error: Content is protected !!