नंदुरबार (जिमाका वृत्तसेवा) : सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग, नंदुरबार आणि सार्वजनिक आरोग्य विभाग, नंदुरबार यांच्या संयुक्त विद्यमाने ‘सेवा पंधरवडा’ विशेष मोहिमेंतर्गत  शनिवार 1 ऑक्टोंबर 2022 रोजी ज्येष्ठ नागरिक दिनाचे औचित्य साधुन नंदुरबार जिल्ह्यात जेष्ठ नागरिकांचे आरोग्य तपासणी शिबीराचे आयोजन करण्यात आले असून या शिबीराचा जिल्ह्यातील सर्व ज्येष्ठ नागरिकांनी लाभ घ्यावा, असे आवाहन समाज कल्याण विभाग आणि सार्वजनिक आरोग्य विभाग, नंदुरबार यांनी केले आहे.

तालुकानिहाय शिबीराचे ठिकाण असे : नंदुरबार तालुक्यात जिल्हा रुग्णालय, नंदुरबार, ग्रामीण रुग्णालय,रनाळा, ग्रामीण रुग्णालय,धानोरा, ग्रामीण रुग्णालय, खोंडामळी येथे. नवापूर तालुक्यात उपजिल्हा रुग्णालय, नवापूर, ग्रामीण रुग्णालय, खांडबारा, ग्रामीण रुग्णालय, विसरवाडी, तळोदा तालुक्यात उपजिल्हा रुग्णालय, तळोदा,तर शहादा तालुक्यात ग्रामीण रुग्णालय, म्हसावद, तसेच धडगांव तालुक्यात ग्रामीण रुग्णालय, धडगांव, ग्रामीण रुग्णालय, मोलगी व ग्रामीण रुग्णालय,जमाना येथे शिबीराचे आयेाजन करण्यात आले आहे.