नंदुरबार (जिमाका वृत्तसेवा) : नेहरु युवा केंद्रामार्फत स्वातंत्र्य संग्रामातील देशभक्तीची भावना, मुल्ये पुन्हा जागृत करणे, राष्ट्रभक्ती, समता, बंधुत्वाची भावना वृध्दींगत करणे आणि तरुण युवा कलावतांना व्यासपीठ निर्माण करुन देण्यासाठी जिल्हास्तरीय युवा उत्सवाचे रविवार 2 ऑक्टोंबर 2022 रोजी नंदुरबार नगरपालिकेतील अटल बिहारी वाजपेयी सभागृहात सकाळी 10 ते 6 वाजेदरम्यान करण्यात आले आहे. तरी या जिल्हास्तरीय युवा उत्सवात अधिकाधिक विद्यार्थ्यांनी सहभागी व्हावे, असे आवाहन नेहरु युवा केंद्राचे जिल्हा युवा अधिकारी अर्थ कौशिक यांनी केले आहे.