Author: Ramchandra Bari

योजनेचा लाभ देण्यासाठी अधिकाधिक बँकेच्या शाखा उघडाव्यात केंद्रीय वित्त राज्यमंत्री डॉ.भागवत कराड

नंदुरबार (जिमाका वृत्तसेवा):  केंद्र व राज्य शासनाच्या विविध योजनेचा  लाभ देण्यासाठी नंदुरबार जिल्ह्यात अधिकाधिक बँकेच्या शाखा उघडाव्यात अशा सूचना केंद्रीय वित्त राज्यमंत्री डॉ.भागवत कराड यांनी दिल्यात.             आज जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या आकांक्षित जिल्हा आढावा बैठक तसेच बँक कमिटीच्या  बैठकीत  डॉ.कराड बोलत होते.  या बैठकीस पालकमंत्री तथा राज्याचे आदिवासी विकास मंत्री डॉ.विजयकुमार गावित, जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा डॉ. सुप्रिया गावित, खासदार डॉ. हिना गावित, विधान परिषदेचे आमदार आमश्या पाडवी, आमदार राजेश पाडवी, जिल्हाधिकारी मनिषा खत्री, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी रघुनाथ गावडे, सहायक जिल्हाधिकारी मंदार पत्की, मीनल करनवाल, नगरपरिषदेचे मुख्याधिकारी पुलकित सिंह तसेच विविध यंत्रणांचे प्रमुख तसेच बँकेचे अधिकारी यावेळी उपस्थित...

Read More

सीड प्लॉटसाठी शेतकऱ्यांनी नोंदणी करावी

नंदुरबार (जिमाका वृत्तसेवा): येत्या खरीप हंगाम-2023 मध्ये नंदुरबार जिल्ह्यात महाबीजमार्फत ज्युट, उडिद, मुग, सोयाबीन, तीळ, तुर, नागली पिकांसाठी सीड प्लॉट योजना राबविण्यात येत आहे. यासाठी  जिल्ह्यातील अधिकाधिक शेतकऱ्यांनी नोंदणी करावी, असे आवाहन महाबीजचे जिल्हा व्यवस्थापक बी. जी. कोटकर यांनी एका प्रसिद्धी पत्रकान्वये केले आहे. सीड प्लॉटसाठी आवश्यक असलेले पायाभूत बियाणे बिजोत्पादकांना महाबीजमार्फत योग्य किंमतीत देण्यात येवून पिकाचे उत्पन्न झाल्यावर संपूर्ण उत्पन्न महाबीज परत विकत घेते. सीड प्लॉटसाठी पायाभूत उच्च दर्जाचे बियाणे वापरल्यामुळे उत्पन्नात वाढ होत असून बाजारभावापेक्षा दरही 20 ते 25 टक्के जास्त मिळत असल्याने शेतकऱ्यांना आर्थिक फायदा होतो. तसेच चांगले बियाणे उगवणक्षमता असलेल्या बियाण्यांना गुणवत्ता निकषावर 75 ते 125 रुपये प्रति क्विटल वाढीव भाव दिला जातो. यात महाराष्ट्र शासनाने नवीन वाणांना बियाणे उत्पादनात सबसिडी देण्यात येत असल्याने त्यांचा सुध्दा फायदा बियाणे उत्पादकांना होईल. यासाठी एका गावात सर्व पिके मिळून 25 एकर एवढे सिड प्लॉट असणे आवश्यक आहे. येत्या खरीप हंगामासाठी खासकरुन ज्यूटचे बियाणे उत्पादन प्लॉट देण्याचे महाबीजने निश्चित केलेले आहे. ज्यूट पिकाचे बियाण्यासाठी हमी भाव 4 हजार  व बोनस 4 हजार असे एकूण 8 हजार प्रति क्विटल दर मागील दोन वर्षांपासून महाबीज शेतकऱ्यांना देत आहे.  ज्युट पिकाचे कोणतेही पाळीवप्राणी, वन्यप्राणी, पशु, पक्षी नुकसान करत नाही. ज्यूट पिकाचे चांगले नियोजन करून 5 ते 6 क्विंटल पर्यंत उत्पन्न शेतकऱ्यांनी मिळू शकते तसेच ज्यूट पिकामुळे जमिनीचा पोत सुधारतो. यांत्रिक पद्धतीने सुध्दा मळणी करता येते. सीड प्लॉटची नोंदणी  शंभर रुपये  प्रति एकर भरुन करण्यात येत असून नोंदणीची अंतिम तारीख 10 मे 2023...

Read More

22 एप्रिल साठी नंदुरबार शहरातील राष्ट्रीय व राज्य महामार्गावरील वाहतुकीत अंशत: बदल

नंदुरबार (जिमाका वृत्तसेवा):  नंदुरबार शहरात शनिवार 22 एप्रिल, 2023 रोजी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तसेच आंतरराष्ट्रीय कथा प्रवचनकार पंडीत प्रदिप मिश्रा हे नंदुरबार येथे श्री.छत्रपती मल्टीस्पेशालिटी हॉस्पीटल इमारतीच्या उद्धटन कार्यक्रमास उपस्थित राहणार आहेत. या दरम्यान नंदुरबार जिल्ह्याचे सिमेलगत जिल्ह्यातून तसेच गुजरात व मध्यप्रदेश राज्यातून मोठ्या प्रमाणावर भाविक तसेच कार्यकर्ते वाहनांनी नंदुरबार येथे येण्याची शक्यता असल्याने शनिवार 22 एप्रिल, 2023 रोजी  सकाळी 6 ते सायंकाळी 18 वाजेपर्यंत नियमनाचे अनुषंगाने राष्ट्रीय व राज्य महामार्गावरील रहदारी अंशत: वळविण्याचे आदेश जिल्हादंडाधिकारी मनीषा खत्री यांनी एका प्रसिद्धी पत्रकान्वये दिले आहे. उक्त कालावधीत  दोंडाईचा कडून येणारी लहान मोठी चारचाकी वाहने, बसेस, अवजड वाहने ही चौपाळा फाटाकडून चौपाळे गावातून सरळ उमर्दे रोड ओलांडून होळ तफे हवेली मार्गे पुढे नंदुरबार शहराकडे शहराबाहेरील उड्डाणपुला खालून करण चौफुली मार्गे जातील. साक्री , नवापूर कडून येणारी व शहादा किंवा गुजरात राज्याकडे जाणारी वाहने ढेकवद येथून पाचोराबारी, करणखेडा, वाकाचार रस्ता मार्गे शहादा ,गुजरात राज्यात जातील. करण चौफुली कडून येणारी वाहने शहराबाहेरील उड्डाणपुला खालून होळ हवेली गावातुन उमर्दे गाव पुढे वावद मार्गे दोडाईचाकडे तसेच साक्रीकडे जाणारे वाहने नंदुरबार शहरातील धुळे चौफुली मार्ग साक्री व नवापूरकडे जातील. प्रकाशा चौफुली कडून नंदुरबारकडे येणारी वाहने शहादामार्गे दोंडाईचा व पुढे धुळेकडे जातील. वाका चार रस्ता कडून येणारी वाहने वाका चार रस्ता ते सरळ प्रकाशामार्गे शहादाकडे जातील असे आदेशात नमूद केले...

Read More

समता पर्वा निमित्त आज ज्येष्ठ नागरिक व तृतीयपंथीसाठी शिबीराचे आयोजन

नंदुरबार (जिमाका वृत्तसेवा): भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीचे औचित्य साधून सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागामार्फत समता पर्वा निमित्त ज्येष्ठ नागरिक व तृतीयपंथीयांसाठी गुरुवार 20 एप्रिल,2023 रोजी सकाळी 11 वाजता सामाजिक न्याय भवन, टोकर तलाव रोड, नंदुरबार येथे आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.  तसेच तृतीयपंथीयांना उद्योजक होऊन आत्मनिर्भर व्हावे याकरीता जिल्हा उद्योग केंद्र यांच्या संयुक्त विद्यमाने उद्योजकता शिबीराचे आयेाजन केले आहे. तरी या शिबीराचा ज्येष्ठ नागरिक व तृतीय पंथीयांनी  लाभ घ्यावा, असे आवाहन समाज कल्याणचे सहायक आयुक्त देविदास नांदगावकर यांनी एका प्रसिद्धी पत्रकान्वये केले...

Read More

दुचाकी वाहनांकरीता नवीन नोंदणी मालिका सुरु

नंदुरबार (जिमाका वृत्तसेवा): उप प्रादेशिक परिवहन कार्यालय, नंदुरबार येथे दुचाकी वाहनांसाठी वाहन 4.0 या संगणक प्रणालीवर स्वंयचलित नविन नोंदणी मालिका सुरु होणार असल्याची माहिती उप प्रादेशिक परिवहन अधिकारी किरण बिडकर यांनी एका प्रसिद्धी पत्रकान्वये दिली आहे. ज्या वाहनधारकांना त्यांच्या दुचाकी वाहनांकरीता आकर्षक अथवा पसंतीचा नोंदणी क्रमांक घेवू इच्छितात अशा वाहनधारकांनी 24 एप्रिल 2023 पर्यंत कार्यालयीन वेळेपर्यंत विहित नमुन्यात अर्ज सादर करावे. ‘प्रथम अर्ज प्रथम प्राधान्य’ या धर्तीवर अर्जदारास त्यांच्या पसंतीचा क्रमांक देण्यात येईल. एका क्रमांकासाठी जास्त अर्ज प्राप्त झाल्यास लिलावाद्वारे तो नोदणी क्रमांक संबधीतास देण्यात येईल. नागरीकांनी या सुविधेचा लाभ घ्यावा, असे आवाहन उप प्रादेशिक परिवहन अधिकारी श्री. बिडकर यांनी केले...

Read More

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

error: Content is protected !!