Author: Ramchandra Bari

नंदुरबार,शहादा शहरांसाठी मंजूर करण्यात आलेला निधी वेळेत खर्च करावा -पालकमंत्री डॉ.विजयकुमार गावित

नंदुरबार(जिमाका वृत्तसेवा): नंदुरबार व शहादा नगरपालिकांना महाराष्ट्र सुवर्णजयंती नगरोत्थान महाअभियान व जिल्हा वार्षिंक योजनेतून मंजूर झालेला निधी विहीत वेळेत खर्च करण्याच्या सूचना राज्याचे आदिवासी विकास मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ.विजयकुमार गावित यांनी आज दिल्या आहेत. नंदुरबार नगरपरिषदेत आज पालकमंत्री डॉ.गावित यांनी नंदुरबार व शहादा नगरपरिषद व पालिकांच्या नविन प्रस्तावित कामांचा आढावा घेतला, त्यावेळी ते बोलत होते. या बैठकीस खासदार डॉ.हिना गावित, नंदुरबार न.प. मुख्याधिकारी पुलकित सिंह, शहादा नगरपालिकेचे स्वप्नील मुधलवाडकर आदी उपस्थित होते.             यावेळी मंत्री डॉ.गावित म्हणाले की, राज्य शासनाकडून तसेच जिल्हा वार्षिंक योजनेतून नगरपरिषदांना 115 कोटी रुपयांचा निधी विविध विकासकामांसाठी मंजूर करण्यात आला असून मंजूर कामांचे अंदाजपत्रके,...

Read More

सैनिकी मुलांच्या वसतिगृहात प्रवेश घेण्याचे आवाहन

नंदुरबार (जिमाका वृत्तसेवा): धुळे शहरात मध्यवर्ती बसस्थाकालगत असलेल्या सैनिकी मुलांचे वसतिगृह,धुळे येथे प्रवेश प्रक्रियेस सुरवात झाली आहे, असे जिल्हा सैनिक अधिकारी मेजर डॉ.निलेश पाटील यांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकान्वये कळविले आहे.             या वसतिगृहात आजी-माजी सैनिकांच्या आठवीपासून पुढील अभ्यासक्रमाचे शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना माफक शुल्क आकारुन प्रवेश दिला जातो. या वसतीगृहात निवास, भोजन, 24 तास पाण्याची व्यवस्था, वायफाय, जिम, पुस्तकालय व मनोरंजनाची साधने उपलब्ध आहेत. वसतिगृहात कार्यरत कर्मचारी मुख्यत्वे सैनिकी सेवेतून सेवा निवृत्त झालेले अधिकारी व कर्मचारी आहेत. त्यामुळे वसतिगृहातील विद्यार्थ्यांना शिस्तीविषयी मार्गदर्शन केले जाते. सन 2023-2024 मध्ये आठवी वा पुढील शिक्षण घेत असलेल्या धुळे व नंदुरबार जिल्ह्यातील  माजी सैनिक, दिवंगत सैनिक, माजी सैनिकाच्या विधवा पत्नींनी त्यांच्या पाल्यांसाठी वसतिगृहाचा लाभ घेण्यासाठी 31 मे 2023 पुर्वी संपर्क साधुन प्रवेश निश्चित करावा. अधिक माहितीसाठी दूरध्वनी क्रमांक 02562-237607,237264 भ्रमणध्वनी क्रमांक 9765333488/ 9270208408/ 7020264940 येथे संपर्क साधावा, असे आवाहन जिल्हा सैनिक अधिकारी मेजर डॉ.निलेश पाटील यांनी केले...

Read More

विद्यार्थी व पालकांसाठी मोफत समुपदेशन मेळाव्याचे आयोजन

नंदुरबार (जिमाका वृत्तसेवा):शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था, नंदुरबार व कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, नंदुरबार यांच्या संयुक्त विद्यमाने विद्यार्थी व पालकांसाठी  शनिवार 13 मे 2023 जिल्हास्तरीय मोफत समुपदेशन मेळाव्यांचे आयोजन करण्यात आल्याची माहिती औद्योगिक प्रशिक्षण संस्थेचे प्राचार्य वाय.एम.पाटील यांनी एका प्रसिद्धी पत्रकान्वये दिली आहे.             या मेळाव्यात दहावी व बारावी नंतर काय ?, रोजगाराच्या संधी, व्यक्तीमत्व विकास, मुलाखतींचे तंत्र इत्यादी विषयावर विविध क्षेत्रातील तंज्ञ व नामांकित व्यक्तींकडून मार्गदर्शन करण्यात येणार आहे. तरी जिल्ह्यातील सर्व शैक्षणिक संस्थेतील इयत्ता नववी ते पदवीपर्यंतच्या सर्व विद्यार्थी व पालकांनी शनिवार 13 मे 2023 रोजी छत्रपती शिवाजी नाट्यमंदिर, नंदुरबार येथे सकाळी 9 वाजता जिल्हास्तरीय मोफत समुपदेशन मेळाव्यास उपस्थित राहावे, असे आवाहन औद्योगिक प्रशिक्षण संस्थेचे प्राचार्य श्री.पाटील यांनी केले...

Read More

मधमाशी मित्र पुरस्कारासाठी अर्ज सादर करण्याचे आवाहन

नंदुरबार (जिमाका वृत्तसेवा): राज्यात मध उद्योगाला चालना व गती देण्यासाठी संचालक, मधसंचालनालय, महाबळेश्वर तसेच महाराष्ट्र राज्य खादी व ग्रामोद्योग मंडळामार्फत सन 2023-2024 पासून मधमाशी मित्र पुरस्कार वितरीत केला जाणार आहे. यासाठी मधपाळ, प्रगतीशील मधपाळ, ब्रॅन्ड धारक मधपाळ शेतकरी, सातेरी, मेलीफेरा, आग्या मधमाशीपालन, मध संकलनात कार्यरत असणाऱ्या घटकांनी 5 मे 2023 पर्यंत मधमाशी मित्र पुरस्कारासाठी अर्ज करण्याचे आवाहन जिल्हा ग्रामोद्योग अधिकारी आर.एल.चव्हाण यांनी एका प्रसिद्ध पत्रकान्वये केले आहे.             मधमाशी मित्र पुरस्कारासाठी अर्जदार महाराष्ट्र राज्यातील रहिवासी असावा, व्यक्तीं किंवा संस्थेने मध उद्योग प्रशिक्षण घेऊन किमान 10 वर्ष मध उद्योगांचे कार्य केलेले असावे. सर्वात जास्त मधोत्पादन व वसाहती असल्यास प्राधान्य देण्यात येईल. मध उद्योगात विस्तार, प्रशिक्षण, प्रजननाद्वारे वसाहत संख्या वाढविणे, संशोधन, मधोत्पादन, मेनउत्पादन, साहित्य निर्मिती, प्रयोग, मधप्रक्रिया व उप उत्पादनांचे संकलन, रॉयल जेली, पराग, विष ,प्रोपोलिस इत्यादी क्षेत्रात काम केलेले असावे. स्वत:चा ब्रॅन्ड व वसाहत विकसित करुन विक्री करण्यास प्राधान्य देण्यात येईल. अर्जदार शासनाच्या उपक्रमांत सहभागी असावा. मंडळाकडे मध पुरवठा करण्यास प्राधान्य देण्यात येईल.             पुरस्काराची अधिक माहिती व विहीत नमुन्यातील अर्ज  जिल्हा ग्रामोद्योग अधिकारी, महाराष्ट्र राज्य खादी व ग्रामोद्योग मंडळ, दुसरा मजला, रुम नंबर 222, नवीन प्रशासकीय इमारत,  जिल्हाधिकारी कार्यालय, टोकरतलाव रोड, नंदुरबार (दूरध्वनी क्रमांक 02564-210053 ) येथे संपर्क साधावा. तरी जिल्ह्यातील मधमाशी पालन उद्योग करणाऱ्या शेतकऱ्यांनी  परिपूर्ण अर्ज भरुन 5 मे 2023 पर्यंत जिल्हा कार्यालयात सादर करावेत असे आवाहन श्री.चव्हाण यांनी केले...

Read More

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

error: Content is protected !!