नंदुरबार (जिमाका वृत्तसेवा):शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था, नंदुरबार व कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, नंदुरबार यांच्या संयुक्त विद्यमाने विद्यार्थी व पालकांसाठी  शनिवार 13 मे 2023 जिल्हास्तरीय मोफत समुपदेशन मेळाव्यांचे आयोजन करण्यात आल्याची माहिती औद्योगिक प्रशिक्षण संस्थेचे प्राचार्य वाय.एम.पाटील यांनी एका प्रसिद्धी पत्रकान्वये दिली आहे.

            या मेळाव्यात दहावी व बारावी नंतर काय ?, रोजगाराच्या संधी, व्यक्तीमत्व विकास, मुलाखतींचे तंत्र इत्यादी विषयावर विविध क्षेत्रातील तंज्ञ व नामांकित व्यक्तींकडून मार्गदर्शन करण्यात येणार आहे. तरी जिल्ह्यातील सर्व शैक्षणिक संस्थेतील इयत्ता नववी ते पदवीपर्यंतच्या सर्व विद्यार्थी व पालकांनी शनिवार 13 मे 2023 रोजी छत्रपती शिवाजी नाट्यमंदिर, नंदुरबार येथे सकाळी 9 वाजता जिल्हास्तरीय मोफत समुपदेशन मेळाव्यास उपस्थित राहावे, असे आवाहन औद्योगिक प्रशिक्षण संस्थेचे प्राचार्य श्री.पाटील यांनी केले आहे.