Author: Ramchandra Bari
‘शासन आपल्या दारी’ मोहिमेतर्गत पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर स्त्री शक्ती समाधान शिबीराचे आयोजन
Posted by Ramchandra Bari | May 20, 2023 | आरोग्य, दिनविशेष |
नंदुरबार (जिमाका वृत्तसेवा): जिल्ह्यातील महिलाकरिता शासनाच्या विविध विभागामार्फत राबविण्यात येत असलेल्या योजनांची माहिती महिलांना उपलब्ध करुन त्यांच्या स्थानिक समस्यांचे निराकरणासाठी एक व्यासपीठ उपलब्ध करुन देण्यासाठी तालुकास्तरावर सर्व तहसिल कार्यालयात ‘शासन आपल्या दारी’ मोहिमेतंर्गत पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर स्त्री शक्ती समाधान शिबीराचे आयोजन करण्यात येणार असल्याची माहिती जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी राजेंद्र बिरारी यांनी एका प्रसिद्धी पत्रकान्वये दिली आहे. या शिबीरास तालुकास्तरावरील नगरपालिका, नगरपरिषदा, महसुल,कृषी, महिला आर्थिक विकास महामंडळ, बचतगट, अन्न व नागरीपुरवठा ,जिल्हा ग्रामिण विकास यंत्रणा, शिक्षण,पोलीस, पाणीपुरवठा व स्वच्छता, सार्वजनिक बांधकाम, महावितरण, विधी सेवा प्राधिकरण यासह अन्य विभागाचे अधिकारी उपस्थित राहून संबंधीत विभागांच्या योजना, तक्रार व समस्या विषयी महिलांना मार्गदर्शन करणार आहे. या ठिकाणी होणार शिबीर नंदुरबार, तळोदा, अक्कलकुवा, धडगांव (अक्राणी) गुरुवार 25 मे 2023 रोजी. नवापूर येथे मंगळवार 23 मे 2023, तसेच शहादा येथे शुक्रवार 26 मे 2023 रोजी सकाळी 11 वाजता आयोजित करण्यात आला आहे. शिबीरासाठी यांच्याशी संपर्क करा नंदुरबार साईनाथ वंगारी (8087923659), नवापूर संजय कोडार (9766869442), शहादा व तळोदासाठी रणजीत कुऱ्हे (9922111401 ), अक्कलकुवा अभिजित मोलाणे (7387654185) तर धडगांव (अक्राणी ) किशोर पगारे ( 9766294906 ) या संपर्क अधिकाऱ्यांशी संपर्क साधावा. या शिबीराचा अधिकाधिक महिलांनी लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी श्री.बिरारी यांनी केले...
Read Moreहुमणी अळीचा प्रादूर्भाव नियंत्रणात ठेवण्यासाठी शेतकऱ्यांना आवाहन
Posted by Ramchandra Bari | May 19, 2023 | कृषी |
नंदुरबार (जिमाका वृत्तसेवा): जून महिन्यामध्ये पहिला पाऊस पडल्यानंतर हुमणी अळीचे भुंगेरे जेव्हा जमिनीतून बाहेर पडतील त्यावेळी कडूनिंब, बोर, बाभळी यासारख्या झाडाशेजारी प्रकाश सापळे लावून भुंगेरे वेळीच नष्ट केल्यास किडींचा प्रादूर्भाव नियंत्रणात ठेवण्यास मोठ्या प्रमाणात मदत होते. त्यामुळे शेतकऱ्यांनी भुंगेरे नष्ट करण्याचे काम मोहीम स्वरुपात राबविण्याचे आवाहन कृषी विभागामार्फत करण्यात येत आहे. खरीप हंगामात ज्वारी, भात, ऊस इत्यादी पिके तर रब्बी हंगामात गहू, हरभरा इत्यादी पिके घेतली जातात. या पिकांवर हुमणी अळीचा उपद्रव बऱ्याच प्रमाणात वाढ होते. या किडीच्या उपद्रवामुळे सर्वसाधारणपणे ३० ते ८० टक्के नुकसान होते. शाश्वत पाणीपुरवठयाच्या जमिनीत घेतल्या जाणाऱ्या पिकांमध्ये ओलावा आणि पाणीपुरवठा जास्त होत असल्याने हुमणी अळीचा प्रादुर्भाव वाढत आहे. भुंगेरा व अळी हुमणीच्या अळीच्या दोन अवस्था असून भुंगेरा झाडाची पाने खातात, तर अळ्या पिकांची मुळे खातात. अळी अवस्था पिकास अत्यंत हानीकारक आहे. त्यामुळे पिक वाळून जाते. जास्त प्रदुर्भाव झाल्यास शेतातील संपूर्ण पीक नाश पावते. वळवाचा पहिला पाऊस चांगला झाल्यास सुप्तावस्थेत असलेले भुंगेरे सुर्यास्तानंतर बाभूळ, कडुनींब, बोर या झाडांवर गोळा होतात. अगोदर मादी भुंगेरे जमिनीतून बाहेर येतात. त्यापाठोपाठ नर भुंगेरे बाहेर पडतात. झाडावर बसून ते पाला खातात. झाडावरच नर-मादीचे मिलन होवून नंतर नर मादी वेगळे होतात आणि पुन्हा झाडाचा पाला खाऊ लागतात. सुर्योदयापूर्वी थोडावेळ अगोदर भुंगेरे परत जमिनीत जावून लपतात. भुंगेरे फक्त रात्रीच्या वेळीच जमिनीतून मिलनासाठी बाहेर पडतात. २ ते ३ दिवसांनी मादी जमिनीत अडी घालण्यास सुरूवात करते. हा नियंत्रणासाठी योग्य कालावधी आहे. पहिला पाऊस झाल्यावर भुंगेरे सुर्यास्तानंतर बाभूळ, बोर, लिंब या झाडांवर पाने खाण्यासाठी गोळा...
Read More‘शासन आपल्या दारी’ मोहिमेसाठी योजना व लाभार्थ्यांची माहिती सादर करावी – जिल्हाधिकारी मनीषा खत्री
Posted by Ramchandra Bari | May 19, 2023 | आरोग्य, शासकीय |
नंदुरबार (जिमाका वृत्तसेवा): ‘शासन आपल्या दारी’ योजनेची प्रभावी अंमलबजावणीसाठी सर्व विभागानी योजना व लाभार्थ्यांची माहिती त्वरीत सादर करावी, असे निर्देश जिल्हाधिकारी मनीषा खत्री यांनी आज दिले आहेत. ‘शासन आपल्या दारी’ उपक्रम जिल्ह्यात राबविण्यासंदर्भात आज जिल्हाधिकारी श्रीमती खत्री यांच्या अध्यक्षतेखाली बिरसा मुंडा सभागृहात बैठक पार पडली त्यावेळी त्या बोलत होत्या. बैठकीस जि.प. मुख्य कार्यकारी अधिकारी रघुनाथ गावडे, अपर जिल्हाधिकारी धनंजय निकम, निवासी उपजिल्हाधिकारी सुधीर खांदे, उपवनसरंक्षक कृष्णा भवर, लक्ष्मण पाटील, सहायक जिल्हाधिकारी तथा प्रकल्प अधिकारी मीनल करनवाल, पोलीस उपअधिक्षक सचिन हिरे, यांच्यासह विविध विभागाचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. यावेळी श्रीमती खत्री म्हणाल्या की, सर्व विभागाच्या शासकीय योजना लोकाभिमुख करुन...
Read Moreमहाबीजची बियाणे रास्त दरानेच खरेदी करावीत
Posted by Ramchandra Bari | May 19, 2023 | कृषी |
नंदुरबार (जिमाका वृत्तसेवा): खरीप-२०२३ हंगामासाठी महाबीज बियाणेची मागणी शेतकऱ्यांकडून मोठ्या प्रमाणात होत आहे. या हंगामासाठी महाबीजकडून पुरेश्या प्रमाणात बियाणे उपलब्ध करुन दिले जाणार असल्याने शेतकऱ्यांनी बियाणे रास्त दरानेच खरेदी करावेत. असे आवाहन महाराष्ट्र राज्य बियाणे महामंडळ, नंदुरबार जिल्हा व्यवस्थापक, बाबासाहेब कोटकर यांनी एका प्रसिद्धी पत्रकान्वये केले आहे. बियाण्याचे दर पुढीलप्रमाणे पिक, उपलब्ध वाण व बॅगची साईज (किलोमध्ये) तर विक्री दर प्रति बॅग (रु.)- सोयाबीन- जेएस-335, जेएस-9305, डीएस-228, एमऐयूएस-71-30 किलो बॅग, 2730 रु. दर, फुले संगम, फुले किमया, एमऐयूएस -612, 162-20 किलो बॅग 2040 रु. दर, एमएसीएस-1188,1281, एमयूएस -158- 30 किलो, 3060 रु. आहे. भात-इंद्रायणी-10 किलो बॅग 660 रु. दर, 25 किलो 1600 रु. दर, कोईमतूर-51-25 किलो, 1075 रु. दर, मुग-उत्कर्षा, पीकेव्हीएम-4, बी.एम-2003-2 व इतर वाण-2 किलो, 360 रु. दर, 5 किलो, 875 रु. दर, तुर- बीडीएसन-716, फुले राजेश्वर पीकेव्ही तारा -2 किलो, 390 रु. दर, बीडीएन-711, बीएसएमआर-736, मारुती, आयसीपीएस-87119 (आशा)- 2 किलो, 360 रु. दर, उडिद-एकेयु 10-1 (बॅल्क गोल्ड), टीएक्यू-1, 2 किलो बॅग 350 रु. दर, 5 किलो, 850 रु. दर, संकरित ज्वारी- सीएसएच-9, महाबीज-7, सीएसएच -14, भाग्यलक्ष्मी-२९६- 3 किलो, 420 रु. दर, संकरीत बाजरी- महाबीज 1005- 1.5 किलो, 240 रु. दर, सुधारित बाजरी- धनशक्ती- 1.5 किलो, 165 रु. दर, नागली- फुले नाचणी- 1 किलो, 110 रु. दर, संकरित- सुर्यफूल- 500 ग्रॅम, 150 रु. दर याप्रमाणे असतील. तरी सर्व शेतकरी बांधवानी महाबीज बियाणे रास्त दरानेच खरेदी करावे. कोठेही जास्त दराने विक्री होत असेल तर मोबाईल क्रमांक 8669642726 वर संपर्क...
Read More