नंदुरबार (जिमाका वृत्तसेवा):  जिल्ह्यातील महिलाकरिता शासनाच्या विविध विभागामार्फत राबविण्यात येत असलेल्या योजनांची माहिती महिलांना उपलब्ध करुन त्यांच्या स्थानिक समस्यांचे निराकरणासाठी एक व्यासपीठ उपलब्ध करुन देण्यासाठी तालुकास्तरावर सर्व तहसिल कार्यालयात ‘शासन आपल्या दारी’ मोहिमेतंर्गत पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर स्त्री शक्ती समाधान शिबीराचे आयोजन करण्यात  येणार असल्याची माहिती जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी राजेंद्र बिरारी यांनी एका प्रसिद्धी पत्रकान्वये दिली आहे.

या शिबीरास तालुकास्तरावरील नगरपालिका, नगरपरिषदा, महसुल,कृषी, महिला आर्थिक विकास महामंडळ, बचतगट, अन्न व नागरीपुरवठा ,जिल्हा ग्रामिण विकास यंत्रणा, शिक्षण,पोलीस, पाणीपुरवठा व स्वच्छता, सार्वजनिक बांधकाम, महावितरण, विधी सेवा प्राधिकरण यासह अन्य विभागाचे अधिकारी उपस्थित राहून संबंधीत विभागांच्या योजना, तक्रार व समस्या विषयी महिलांना मार्गदर्शन करणार आहे.

या ठिकाणी होणार शिबीर

            नंदुरबार, तळोदा, अक्कलकुवा, धडगांव (अक्राणी) गुरुवार 25 मे 2023 रोजी. नवापूर येथे मंगळवार 23 मे 2023, तसेच शहादा येथे शुक्रवार 26 मे 2023 रोजी सकाळी 11 वाजता आयोजित करण्यात आला आहे.

शिबीरासाठी यांच्याशी संपर्क करा

नंदुरबार साईनाथ वंगारी (8087923659), नवापूर संजय कोडार (9766869442), शहादा व तळोदासाठी रणजीत कुऱ्हे (9922111401 ), अक्कलकुवा अभिजित मोलाणे  (7387654185)  तर धडगांव (अक्राणी ) किशोर पगारे ( 9766294906 ) या संपर्क अधिकाऱ्यांशी  संपर्क साधावा.  या शिबीराचा अधिकाधिक महिलांनी लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी श्री.बिरारी यांनी केले आहे.