Author: Ramchandra Bari

न्युक्लीअस बजेट अंतर्गत आदिवासी लाभार्थ्यांसाठी योजना

नंदुरबार (जिमाका वृत्तसेवा): एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प नंदुरबार कार्यक्षेत्रातील नंदुरबार,नवापूर व शहादा तालुक्यातील आदिवासी लाभार्थ्यांना वर्ष 2023-24 या आर्थिक वर्षात केंद्रवर्ती अर्थसंकल्प न्यूक्लिअस बजेट योजनेअंतर्गत विविध योजनांचा लाभ देण्यात येणार असल्याचे एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प,नंदुरबार प्रकल्प अधिकारी तथा सहाय्यक जिल्हाधिकारी मीनल करनवाल यांनी एका प्रसिध्दीपत्रकान्वये कळविले आहे. अ गटात-उत्पन्न निर्मितीच्या किंवा उत्पन्न वाढीच्या योजनेत  अनुसूचित जमातीच्या लाभार्थ्यांना बिगर यांत्रिकी बोट व मत्स्यजाळेसाठी अर्थसहाय्य, युवकांना सामुहिक युवक गटाना बॅन्ड संच व इतर साहित्य, तसेच अनुसूचित जमातीच्या शेतकऱ्यांना पॉवर विडर मशिन घेण्यासाठी 85 टक्के अर्थसहाय्य देण्यात येईल. क गटात- मानव साधन संपत्ती विकासाच्या व आदिवासी कल्याणात्मक योजनेत अनुसूचित जमातीच्या ग्रामपंचायती व बचतगट यांना सार्वजनिक कार्यक्रमासाठी भांडी संच उपलब्ध करून देणे,  युवकांना क्रिकेट खेळ खेळण्यासाठी क्रिकेट साहित्य संच, ग्रामपंचायतीना सार्वजनिक कार्यक्रमासाठी भजनी साहित्य तसेच ग्रामपंचायतीना सार्वजनिक कार्यक्रमासाठी मंडप, खुर्ची, व इतर साहित्य उपलब्ध करुन देणे, तसेच अनुसूचित जमातीच्या पंरपरागत कलापथक व प्रबोधनकारांना समाजात जनजागृती करण्यासाठी साहित्य उपलब्ध करुन देण्यात येतील. या योजनांसाठी इच्छुक आदिवासी लाभार्थ्यांकडून विहित नमुन्यातील अर्ज मागविण्यात येत असून याबाबतचा विहित नमुना फॉर्म प्रकल्प अधिकारी तथा सहाय्यक जिल्हाधिकारी, एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प,नंदुरबार येथे 3 जुलै 2023 ते 14 जुलै 2023 या कालावधीत रविवार आणि शासकीय सुट्टी वगळून इतर दिवशी कार्यालयीन वेळेत वाटप केले जातील व स्विकारले जातील.  मुदतीनंतर फॉर्म वाटप अथवा स्विकारले जाणार नाहीत. पात्र आदिवासी लाभार्थ्यांनी योजनेच्या आवश्यकतेनुसार जातीचा दाखला, उत्पन्नाचा दाखला, दारिद्रय रेषेखालील दाखला, ग्रामसभा ठराव, रहिवासी दाखला, आधारकार्ड, बँक पासबुक, योजनेच्या अनुसरून कागदपत्र तसेच यापूर्वी सदर योजनेतून...

Read More

निवृत्ती वेतनासोबत सातव्या वेतन आयोगाचा चौथा हप्ता जमा होणार -भिमराव महाले

नंदुरबार (जिमाका वृत्तसेवा): माहे जून 2023 देय जुलै,2023 च्या निवृत्तीवेतनासोबत सातव्या वेतन आयोगातील फरकाचा चौथा हप्ता नियमित जमा होणार असल्याची माहिती जिल्हा कोषागार अधिकारी भिमराव महाले यांनी जिल्हा कोषागार कार्यालयात आयोजित निवृत्ती वेतन धारकांच्या मेळाव्यात दिली आहे. जिल्हा कोषागार कार्यालय,नंदुरबार येथे 27 जून 2023 रोजी सकाळी 11 वाजता राज्यशासकीय निवृत्तीवेतन धारकांचे व कुटूंब निवृत्तीवेतन धारकांचा मेळावा आयोजित करण्यात आला होता त्यावेळी ते बोलत होते. मेळाव्यास अपर कोषागार अधिकारी विजयसिंग पाटील, उपलेखपाल र.च.पवार, लेखा लिपिक, राजेश गांगुर्डे, संदिप अहिरे, राहूल चत्तर, निवृत्ती वेतनधारक संघटनेचे अध्यक्ष रामभाऊ साबळे, सचिव दिलीप पाटील, यांच्यासह मोतीलाल ठाकूर, यु.जी.पिंपरे, लालसिंग परदेशी, काशिनाथ राठोड, केशरसिंग क्षत्रिय उपस्थित होते. यावेळी श्री.महाले म्हणाले की, राज्यशासकीय निवृत्तीवेतन धारक तसेच कुटूंब निवृत्तीधारकांना जून 2023 देय जुलै 2023 निवृत्ती वेतनासोबत सातव्यावेतन आयोगातील फरकाचा हप्ता देण्यात येईल. तसेच निवृत्तीवेन धारकांचा महागाई भत्ता वाढ, वयाच्या 80 वर्षांनंतर होणारी पेन्शनवाढ, निवृत्ती वेतन धारकांचे अनुज्ञेय लाभ, सातव्या वेतन आयोगाचा हप्ता, हयातीचा दाखला या विषयावर निवृत्ती वेतनधारंकाना येणाऱ्या अडचणीबाबत चर्चा करुन त्यांना मार्गदर्शन करण्यात आले.या मेळाव्यास 40 निवृत्तीवेतनधारक उपस्थित...

Read More

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

error: Content is protected !!