नंदुरबार (जिमाका वृत्तसेवा): माहे जून 2023 देय जुलै,2023 च्या निवृत्तीवेतनासोबत सातव्या वेतन आयोगातील फरकाचा चौथा हप्ता नियमित जमा होणार असल्याची माहिती जिल्हा कोषागार अधिकारी भिमराव महाले यांनी जिल्हा कोषागार कार्यालयात आयोजित निवृत्ती वेतन धारकांच्या मेळाव्यात दिली आहे.

जिल्हा कोषागार कार्यालय,नंदुरबार येथे 27 जून 2023 रोजी सकाळी 11 वाजता राज्यशासकीय निवृत्तीवेतन धारकांचे व कुटूंब निवृत्तीवेतन धारकांचा मेळावा आयोजित करण्यात आला होता त्यावेळी ते बोलत होते. मेळाव्यास अपर कोषागार अधिकारी विजयसिंग पाटील, उपलेखपाल र.च.पवार, लेखा लिपिक, राजेश गांगुर्डे, संदिप अहिरे, राहूल चत्तर, निवृत्ती वेतनधारक संघटनेचे अध्यक्ष रामभाऊ साबळे, सचिव दिलीप पाटील, यांच्यासह मोतीलाल ठाकूर, यु.जी.पिंपरे, लालसिंग परदेशी, काशिनाथ राठोड, केशरसिंग क्षत्रिय उपस्थित होते.

यावेळी श्री.महाले म्हणाले की, राज्यशासकीय निवृत्तीवेतन धारक तसेच कुटूंब निवृत्तीधारकांना जून 2023 देय जुलै 2023 निवृत्ती वेतनासोबत सातव्यावेतन आयोगातील फरकाचा हप्ता देण्यात येईल. तसेच निवृत्तीवेन धारकांचा महागाई भत्ता वाढ, वयाच्या 80 वर्षांनंतर होणारी पेन्शनवाढ, निवृत्ती वेतन धारकांचे अनुज्ञेय लाभ, सातव्या वेतन आयोगाचा हप्ता, हयातीचा दाखला या विषयावर निवृत्ती वेतनधारंकाना येणाऱ्या अडचणीबाबत चर्चा करुन त्यांना मार्गदर्शन करण्यात आले.या मेळाव्यास 40 निवृत्तीवेतनधारक उपस्थित होते.