Author: n7news

कंत्राटी आरोग्य कर्मचार्‍यांचे कामबंद आंदोलन

नंदुरबार (प्रतिनिधी)- गेल्या 15 वर्षापासुन राष्ट्रीय आरोग्य अभियानातील कंत्राटी कर्मचारी तुटपुंज्या मानधनावर काम करीत असुन शासकीय सेवेत सामवुन घेण्यासाठी कंत्राटी कर्मचार्‍यांनी कामबंद आंदोलन सुरु केले आहे. सद्या कोरोना महामारीत स्वत:च्या जीवाची पर्वा न करता एनएचएम कर्मचार्‍यांनी रुग्ण सेवेत झोकुन दिले आहे. मात्र कंत्राटी कर्मचार्‍यांबद्दल शासनाची भुमिका उदासिन आहे. यासाठी राष्ट्रीय आरोग्य अभियान कंत्राटी कर्मचारी व आरोग्य सेवा कर्मचारी संघटना समन्वय समितीमार्फत आंदोलन करण्यात आले आहे. कोरोनाचा संकटात माघार न घेता एनएचएम कर्मचार्‍यांनी स्वत:चा जीव धोक्यात घालुन अखंडपणे रुग्णसेवा सुरु ठेवली आहे. परंतु कोरोनाच्या रुग्णावर उपचार करीत असतांना मास्क, ग्लोज, सॅनिटाईझर व आवश्यक ती सुरक्षेतची साधने उपलब्ध असणे अत्यावश्यक आहे. परंतु असे असतांनाही त्यासाठी या कर्मचार्‍यांना काळ्याफिती लावुन आंदोलन करावे लागत आहे. त्यावरही या आरोग्य कर्मचार्‍यांच्या मागण्याची दखल घेतली जात नाही. या कर्मचार्‍यांचा सेवागाळ 15 वर्षापासुन अधिक झाला आहे. तरी देखील शासनाने त्यांचे शासकीय सेवेत समायोजन केलेले नाही. त्यांना अद्याप अत्यल्प मानधनावर काम करावे लागत आहे. तुलनेने नव्याने झालेल्या कंत्राटी भरतीतील कर्मचार्‍यांनाही त्यांच्या पेक्षा अधिक मानधन देण्यात येते. परंतु याच कोरोना योध्दांची सरकारकडुन दखल घेतली जात नाही. यामुळे कर्मचार्‍यांमध्ये संतापाची लाट पसरली आहे. यामुळे काल 11 जुन पासुन बेमुदत कामबंद राज्यस्तरीय आंदोलन करण्याचा निर्णय राज्यस्तरीय समन्वय समितीने घेतला आहे. याबाबतचे निवेदन राष्ट्रीय आरोग्य अभियान कंत्राटी कर्मचारी व आरोग्य सेवा कर्मचारी संघटना समन्वय समितीमार्फत पालकमंत्री ना.अ‍ॅड.के.सी.पाडवी, खा.डॉ.हिना गावित, आ.डॉ.विजयकुमार गावित, आ.राजेश पाडवी, आ.शिरीष नाईक, जिल्हाधिकारी, मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा आरोग्य अधिकारी, सर्व तालुका आरोग्य अधिकारी, सर्व वैद्यकीय अधिकारी यांना देण्यात आले...

Read More

अखेर नगरसेवक खान विरुद्ध गुन्हा दाखल

नंदुरबार दि.11 : जिल्ह्यातील संचारबंदी आदेश आणि साथ रोग प्रतिबंधक कायदा व राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन कायद्याचा भंग केल्याबद्दल नंदुरबार येथील परवेजभाई करामतभाई खान यांच्याविरुद्ध तहसीलदार भाऊसाहेब थोरात यांनी तालुका पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल केला आहे. परवेज खान यांनी 30 जून 2020 पर्यंत मनाई आदेश लागू असताना सदर आदेशाचा भंग करून मौजे झराळी येथील फार्म हाऊसवर मुलाच्या लग्न समारंभानिमित्त स्नेह भोजनाचे आयोजन केले होते. कार्यक्रमास 50 व्यक्तिंची परवानगी असताना  त्यापेक्षा अधिक व्यक्तिंना आमंत्रित करण्यात आले होते. अशाने कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव होण्याचा धेाका असल्याने आणि संसर्गजन्य आजार पसरून मानवी जिवीतास धोका उत्पन्न होण्याची ही कृती असल्याने प्रकरणाचे गांभिर्य लक्षात घेऊन तहसीलदार थोरात यांनी भारतीय दंड संहितेचे कलम 188, 268, 269, 290, आपत्ती व्यवस्थापन अधिनियम 2005 चे कलम 54 आणि साथीचे रोग अधिनियम 1897 चे कलम 3 नुसार हा गुन्हा दाखल केला आहे. स्नेहभोजन प्रकरणाची माहिती मिळताच जिल्हाधिकारी डॉ.राजेद्र भारुड यांनी उपविभागीय अधिकाऱ्यांना प्रकरणाची चौकशी करण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार तहसीलदार आणि पोलीस निरीक्षक नंदुबार यांची संयुक्त समिती नेमण्यात आली होती.जिल्ह्यात कोविड-19 च्या संसर्गावर बऱ्यापैकी नियंत्रण असल्याने संचारबंदीत शिथीलता देण्यात आली आहे. त्याचा उपयोग केवळ अत्यावश्यक बाबींसाठी नागरिकांनी करावा. कोरोनाचा संसर्ग अधिक प्रमाणात होणार नाही यासाठी प्रशासनाने दिलेल्या सुचनांचे पालन करावे. लग्न समारंभात 50 पेक्षा अधिक व्यक्तिंना आमंत्रित करू नये. रात्री 9 ते पहाटे 5 या कालावधीत घराबाहेर अनावश्यक फिरू नये. बाहेर फिरताना चेहऱ्यावर मास्क घालावा आणि शारिरीक अंतराचे पालन करावे. सार्वजनिक ठिकाणी गर्दी टाळावी, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ.राजेंद्र भारुड यांनी केले...

Read More

कापूस खरेदी सकाळी लवकर सुरू करा-डॉ.राजेंद्र भारुड

नंदुरबार : अधिकाधीक शेतकऱ्यांचा कापूस खरेदी करता यावा यासाठी सकाळी लवकर कापूस खरेदी सुरू करावी, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ.राजेंद्र भारुड यांनी केले. नंदुरबार येथील गजानन जिनींग मिलला जिल्हाधिकाऱ्यांनी भेट देऊन कापूस खरेदीची माहिती घेतली. यावेळी ते बोलत होते. त्यांच्यासमवेत सहायक जिल्हाधिकारी वसुमना पंत, तृप्ती धोडमिसे, तहसीलदार भाऊसाहेब थोरात, सीसीआयचे अधिकारी आदी उपस्थित होते.  पावसाळा सुरू होणार असल्याने कापूस खरेदी लवकर पुर्ण करावी. खरेदीच्या ठिकाणी नगर पालिकेच्या अग्निशमन यंत्रणेचे सहकार्य घेण्यात यावे. दिवसभरात जास्तीत जास्त शेतकऱ्यांचा कापूस खरेदी करण्याचे नियेाजन करावे, असे निर्देशही जिल्हाधिकाऱ्यांनी...

Read More

अनुसूचित जमातीच्या विद्यार्थ्यांच्या इंग्रजी शाळा प्रवेशास स्थगिती

नंदुरबार :   आदिवासी  विकास विभागाच्या 22 मे 2020 च्या शासन निर्णयानुसार सन 2020-2021 या शैक्षणिक वर्षांत अनुसूचित जमातीच्या विद्यार्थ्यांना इंग्रजी माध्यमाच्या नामांकित निवासी शाळांमध्ये शिक्षण देणे या योजनेस स्थगिती देण्यात आली आहे.  एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प नंदुरबार कार्यक्षेत्रातील नंदुरबार, नवापूर व शहादा या तीन तालुक्यातील अनुसूचित जमातीच्या विद्यार्थ्यांसाठी इयत्ता 1 व इयत्ता 2 करीता सन 2020-2021 या शैक्षणिक वर्षांसाठी शहरातील इंग्रजी माध्यमाच्या नामांकित निवासी शाळेत प्रवेश देण्याकरीता अनुसूचित जमातीच्या विद्यार्थ्यांच्या पालकांकडून विहित नमुन्यात प्रवेश अर्ज मागविण्यात आले होते.  मात्र सदर प्रक्रीयेस स्थगिती देण्यात आल्याने पालकांनी इयत्ता 1 ली आणि 2 रीतील आपल्या पाल्यांचा प्रवेश कार्यक्षेत्रातील इतर शाळांमध्ये आपल्या इच्छेनुसार घ्यावा, असे  प्रकल्प अधिकारी तथा सहायक जिल्हाधिकारी वसुमना पंत  यांनी कळविले...

Read More

शेतकऱ्यांना पीक कर्ज त्वरीत उपलब्ध करुन द्या -डॉ.राजेंद्र भारुड

नंदुरबार दि.26 :  महात्मा ज्योतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेसाठी पात्र लाभार्थ्यांच्या अंतिम यादीत नाव असलेल्या तसेच नवीन पीक कर्ज घेऊ इच्छिणाऱ्या शेतकऱ्यांना त्वरीत खरीप पीक कर्ज उपलब्ध करुन द्यावे ,असे निर्देश जिल्हाधिकारी डॉ.राजेंद्र भारुड यांनी दिले. जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित बँक प्रतिनिधींच्या बैठकीत ते बोलत होते. यावेळी बैठकीस सहायक जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे, ‘नाबार्ड’ चे जिल्हा व्यवस्थापकीय संचालक प्रमोद पाटील, जिल्हा अग्रणी बँकेचे व्यवस्थापक जयंत देशपाडे उपस्थित...

Read More

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

error: Content is protected !!