नंदुरबार (जिमाका वृत्तसेवा) : शासनाच्या वित्त विभागांमार्फत सहसंचालक, लेखा व कोषागारे, नाशिक विभाग, नाशिक यांच्यावतीने लिलिक वर्गीय कर्मचाऱ्यांसाठी महाराष्ट्र लेखा लिपिक प्रशिक्षण सत्र क्रमांक 100 चे 50 दिवसांचे प्रशिक्षणसत्र 10 डिसेंबर 2021 ते 18 फेब्रुवारी 2022 या कालावधीत आयोजित करण्यात आले आहे.
24 जून 2015 शासन निर्णयानुसार सर्व राज्य शासकीय कर्मचारी व नवनियुक्त कर्मचाऱ्यांसाठी शासकीय सेवेत प्रवेश करतेवेळी पदस्थापनेपूर्वी किंवा पदस्थापनेनंतर 6 महिन्यात पायाभूत प्रशिक्षण घेणे अनिवार्य केले आहे. प्रशिक्षणासाठी संपूर्ण 50 दिवसांच्या अभ्यासक्रमासाठी प्रवेश घेणे आवश्यक आहे. परंतू कर्मचाऱ्यास पूर्णवेळ प्रशिक्षणास पाठविणे शक्य नसल्यास विशिष्ट मोड्यूलसाठी प्रवेश घेण्याची अनुमती दिली जाईल. कार्यालय प्रमुखांनी त्यांच्याकडील प्रशिक्षणास इच्छुक असलेल्या लिपिक वर्गीय कर्मचाऱ्यांचे अर्ज 6 डिसेंबर 2021 पर्यंत सहसंचालक,लेखा व कोषागारे,नाशिक विभाग, वित्त व लेखा प्रशिक्षण केंद्र, लेखा कोष भवन, दुसरा मजला, जिल्हाधिकारी कार्यालय आवार,नाशिक येथे सादर करावे असे आवाहन जिल्हा कोषागार अधिकारी वैशाली जगताप यांनी एका प्रसिध्दीपत्रकान्वये केले आहे.