नंदुरबार (जिमाका वृत्तसेवा) : एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प तळोदा अंतर्गत तळोदा, अक्कलकुवा व धडगाव या कार्यक्षेत्रातील विद्यार्थ्यांसाठी एकलव्य मॉडेल रेसिडेंशियल पब्लिक स्कुलमध्ये प्रवेशासाठी इयत्ता सहावीच्या वर्गात नियमित प्रवेश तसेच इयत्ता सातवी ते नववीच्या वर्गातील विद्यार्थ्यांच्या रिक्त जागा भरण्याकरिता अनुसुचित आणि आदिम जमातीच्या विद्यार्थ्यांकडून ऑनलाईन अर्ज मागविण्यात आले होते.

ऑनलाईन पध्दतीने अर्ज सादर केलेल्या विद्यार्थ्यांची गुणवत्तेवर आधारीत शाळेनिहाय विद्यार्थ्यांची निवड यादी  प्रसिध्द करण्यात आली असून निवड झालेल्या विद्यार्थ्यांच्या पालकांनी 30 नोव्हेंबर 2021 पर्यंत एकलव्य निवासी शाळेत जावून जातीचा दाखला, उत्पन्नाचा दाखला, मागील वर्षांच्या इयत्तेचे गुणपत्रक इत्यादी कागदपत्रे सादर करुन प्रवेश घ्यावा,असे आवाहन  प्रकल्प अधिकारी तथा सहायक जिल्हाधिकारी डॉ.मैनाक घोष यांनी केले आहे.