नंदुरबार (जिमाका वृत्तसेवा) : जिल्हाधिकारी कार्यालयात संविधान दिन साजरा करण्यात आला. निवासी उपजिल्हाधिकारी सुधीर खांदे यांच्या उपस्थितीत भारतीय संविधानाच्या उद्देशिकेचे सामूहिक वाचन करण्यात आले.

यावेळी उपजिल्हाधिकारी कल्पना निळ-ठुबे, तहसिलदार उल्हास देवरे, नायब तहसिलदार रामजी राठोड, राजेंद्र चौधरी तसेच जिल्हाधिकारी कार्यालयातील अधिकारी आणि कर्मचारी उपस्थित होते.