नंदुरबार (जिमाका वृत्तसेवा) : राज्याचे आदिवासी विकासमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री ॲड.के.सी.पाडवी जिल्हा दौऱ्यावर असून त्यांचा दौरा कार्यक्रम पुढीलप्रमाणे आहे.
शनिवार 13 फेब्रुवारी 2021 रोजी असली ता. धडगांव येथे राखीव, रविवार 14 फेब्रुवारी 2021 रोजी सकाळी 11 वाजता मुख्यमंत्री, ग्रामसडक योजनेअंतर्गत नकट्यादेव, गौऱ्यामाळ ते तळोदा रस्त्याचे भूमिपुजन. असली ता. धडगांव येथून सोईनुसार नंदुरबारकडे प्रयाण व नंदुरबार येथे मुक्काम. सोमवार 15 फेब्रुवारी 2021 रोजी सकाळी 11 वाजता जिल्हाधिकारी कार्यालय, नंदुरबार येथे अधिकाऱ्यांची आढावा बैठक. दुपारी 4 वाजता नंदुरबार येथून शासकीय वाहनाने नाशिककडे प्रयाण.