नंदुरबार (जिमाका वृत्तसेवा) : जनतेच्या तक्रारी व गाऱ्हाणी सोडविण्यासाठी दर महिन्याच्या पहिल्या सोमवारी जिल्हास्तरीय लोकशाही दिनाचे आयोजन करण्यात येते. त्यानुसार माहे जानेवारी महिन्यातील पहिला सोमवार 4 जानेवारी 2021 रोजी जिल्हास्तरीय लोकशाही दिनाचे आयोजन करण्यात आला आहे.
जिल्हास्तरीय लोकशाही दिनात अर्ज सादर करू इच्छिणाऱ्या अर्जदारांनी न्यायप्रविष्ठ प्रकरणे वगळून तक्रार अर्ज नियोजित दिवशी दुपारी 1 वाजता जिल्हाधिकारी कार्यालय नंदुरबार येथे समक्ष उपस्थित राहून सादर करावे. जिल्ह्यातील सर्व नागरीकांनी आपल्या समस्यांचे निरसन करण्यासाठी लोकशाही दिनाचा लाभ घ्यावा, असे आवाहन निवासी उपजिल्हाधिकारी सुधीर खांदे यांनी केले आहे.